लशीनेही कोरोनाला कायमचं हरवणं अशक्य; 50 दिवसांत पुन्हा होऊ शकतो कोरोना

लशीनेही कोरोनाला कायमचं हरवणं अशक्य; 50 दिवसांत पुन्हा होऊ शकतो कोरोना

कोरोनाविरोधात शरीरातील अँटिबॉडीज (corona antibody) 50 दिवसच राहतात. त्यामुळे कोरोना लशीचा (corona vaccine) एक डोस कोरोनाला कायमचं रोखण्यासाठी पुरेसा नसल्याचं संशोधकांनी म्हटलं आहे.

  • Share this:

मुंबई, 28 ऑगस्ट : नुकतंच हाँगकाँगमध्ये कोरोनामुक्त (coronavirus) रुग्णाला पुन्हा कोरोनाची लागण झाल्याचं प्रकरण समोर आलं. याआधीदेखी अशी काही प्रकरणं समोर आली आहेत. त्यामुळे आता संपूर्ण जगाचं लक्ष कोरोना लशीकडे (corona vaccine) लागून राहिलं आहे. मात्र कोरोना लशीनेही कोरोनाला कायमचं हरवणं शक्य होणार नाही कारण कोरोनाविरोधातील शरीरातील अँटिबॉडीज (corona antibody) 50 दिवसांतच कमी होत आहेत. त्यामुळे पुन्हा संक्रमण होऊ शकतं.

मुंबईतल्या जेजे रुग्णालयाने (JJ hospital) आयबीट्स फाऊंडेशनसह मिळून कोरोनाव्हायरसची लागण झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा अभ्यास केला.  जेजे रुग्णालय, जीटी रुग्णालय आणि सेंट जॉर्ज हॉस्पिटलमधील  801 आरोग्य कर्मचाऱ्यांची अँटिबॉडी टेस्ट केली. यामध्ये  कोरोनाव्हायरसविरोधातील अँटिबॉडीज 50 दिवसांनंतर नष्ट होत असल्याचं संशोधकांना दिसून आलं.

सात आठवड्यांपूर्वी म्हणजे एप्रिल आणि मे महिन्यात  कोरोनाव्हारसची लागण झालेल्या 28  आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी एकाच्याही रक्तात जूनमध्ये कोरोनाविरोधात अँटिबॉडीज सापडल्या नाहीत. तर ज्यांना तर पाच आठवड्यांपूर्वी संक्रमित झालेल्यांमध्ये 38.5 % आणि तीन आठवड्यांपूर्वी संक्रमित झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये 90% अँटिबॉडीज सापडल्या.

हे वाचा - मुंबईत Coronavirus चा धोका पुन्हा वाढला; Doubling Rate कमी झाल्याने चिंताकोरोनाव्हायरसची लागण झाल्यानंतर त्याला प्रतिकार करणाऱ्या अँटिबॉडीज शरीरात तयार होतात.  शरीरात अँटिबॉडीज तयार झाल्यास त्या व्यक्तीला कोरोनाची पुन्हा लागण होण्यापासून आणि ज्यांना कोरोना लस दिली जाईल त्यांना कोरोनाचं संक्रमण होण्यापासून संरक्षण देऊ शकतात. मात्र शरीरातील अँटिबॉडीज कमी होत असतील तर कायम स्वरूपात या आजाराला हरवणं अशक्य आहे.  रुग्णांना पुन्हा कोरोनाव्हायरसची लागण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, या संशोधनाचे अभ्यास डॉ. निशांत कामत म्हणाले, कोरोना लशीच्या धोरणावरही पुन्हा काम करणं गरजेचं आहे हे आम्ही केलेल्या अभ्यासातून हे अधोरेखित होतं. लशीच्या एका डोसऐवजी लोकांना सातत्याने डोस घेण्याची गरज भासेल असंही शास्त्रज्ञ म्हणालेत.

हे वाचा - मास्क लावूनही गुदमरणार नाही श्वास; आता आला SMART MASK

हे संशोधन अद्याप प्रकाशित झालेलं नाही. सप्टेंबरमध्ये 'इंटरनॅशनल जर्नल ऑफ कम्युनिटी मेडिसीन अँड पब्लिक हेल्थ'मध्ये प्रकाशित केलं जाणार आहे.

दरम्यान या संशोधनाबाबत काही तज्ज्ञांनी साशंकता व्यक्त केली आहे. पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडियाचे गिरीधर आर बाबू म्हणाले, या अभ्यासात जे 28 रुग्ण आहेत ज्यांच्यामध्ये अँटिबॉडीज सापडल्या नाहीत ते लक्षणं विरहित होते की लक्षण असलेले रुग्ण होते हे माहिती नाही. कारण ज्या रुग्णांमध्ये लक्षणं असतात त्यांच्यामध्ये तीन ते चार महिने अँटिबॉडीज सापडतात.

तज्ज्ञांच्या मते, जरी शरीरातील कोरोनाविरोधीत अँटिबॉडीज नष्ट झाल्या तरी रोगप्रतिकारक प्रणालीतील टी-सेल्स व्हायरसविरोधात इम्युनिटी देऊ शकतात.

Published by: Priya Lad
First published: August 28, 2020, 8:50 PM IST

ताज्या बातम्या