कोरोनाग्रस्तांचे पडतायेत दात; CORONA चं नवं लक्षण तर नाही ना?

तुमच्या दातांमध्ये (teeth) किंवा हिरड्यांमध्ये समस्या जाणवत असतील तर वेळीच सावध व्हा.

तुमच्या दातांमध्ये (teeth) किंवा हिरड्यांमध्ये समस्या जाणवत असतील तर वेळीच सावध व्हा.

  • Share this:
    वॉशिंग्टन, 28 नोव्हेंबर : ताप, खोकला, श्वास घ्यायला त्रास यानंतर तोंडाची चव जाणं, कशाचाही वास न येणं अशी लक्षणं कोरोनामध्ये दिसून येतात. मात्र आता काही कोरोना रुग्णांमध्ये दात आणि हिरड्यांशी संबंधित लक्षणं दिसू लागली आहे. दात तुटणं आणि संवेदनशील हिरड्या हे कोरोनाचं लक्षण असू शकतं, असं अनेक प्रकरणांवरून दिसून आलं आहे. कोरोना झालेल्या रुग्णांना अशा समस्येचा सामना करावा लागतो आहे. या लोकांनी स्वत: आपला अनुभव मांडला आहे. न्यूयॉर्कमध्ये कोरोनाची लागण झालेल्या एका महिलेचा दात तुटला. तिला दातांचा कोणताही त्रास नव्हता. यानंतर तिच्याप्रमाणेच कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या बहुतेकांमध्ये अशी समस्या दिसून आली. असं वृत्त न्यूयॉर्क टाइम्सनं दिलं आहे. न्यूयॉर्कमधील 43 वर्षीय फराह खेमिलीनं सांगितलं, तिनं एक विंटरग्रीन ब्रेथ मिंट तोंडात टाकलं आणि तिच्या दातांमध्ये ठणके मारायला लागले. तिनं दाताला हात लावून पाहिला तर दात हलत होता. ब्रेथ मिंटमुळे असं होत असावं असं तिला वाटलं. पण दुसऱ्या दिवशीच सकाळी खेमिलीचा हलणारा दात तुटला आणि तिच्या हात आला. विचित्र म्हणजे जेव्हा तिचा दात तुटला तेव्हा ना हिरड्यातून रक्त आला ना तिला वेदना झाल्या. दात तुटल्यानंतर जेव्हा ती डेन्टिस्टकडे गेली तेव्हा त्यांनी तिला तिच्या हिरड्यांमध्ये कोणतंही इन्फेक्शन झालं नसल्याचं सांगितलं. स्मोकिंगमुळे तिच्या दातांजवळील भाग कमजोर झाला होता असं सांगण्यात आलं आणि मग तज्ज्ञांकडे जाण्याचा सल्ला देण्यात आला. हे वाचा - भारतासह अनेक देशात कोरोना रुग्णांमध्ये उद्भवतेय ही भयंकर समस्या; मृत्यूचा धोका कोरोना संक्रमणामुळे दात तुटू शकतात असे ठोस पुरावे सापडले नाही. मात्र काही दिवसांपूर्वीच खेमिला कोरोनाच्या विळख्यात सापडली तेव्हापासून खेमिला एका ऑनलाइन सपोर्ट ग्रुपला फॉलो करू लागली. जिथं लोक या आजाराबाबत आपली लक्षणं सांगतात, आपला अनुभव मांडतात. या सपोर्ट ग्रुपवर तिला अशी अनेक प्रकरणं दिसली ज्यांचे कोरोना संक्रमणानंतर दात तुटले आहेत, हिरड्यांमध्ये ठणके बसत होते. खेमिलीचा जोडीदारानं सोशल मीडियावर सर्व्हाइव्हर कॉर्प नावाच्या पेजला फॉलो केलं आहे. या पेजची फाऊंजर डायना बॅरेंटच्या 12 वर्षीय मुलादेखील खेमिलीसारखी समस्या झाली. मुलामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं होती आणि त्यानंतर त्याचा एक दात तुटला. ऑर्थोडॉन्टिस्टनी सांगितलं की मुलाला याआधी दातांची कोणतीच समस्या नव्हती. हे वाचा - रुग्णाला वाचवणाऱ्या CORONA WARRIORS ची अवस्था; PHOTO पाहून अंगावर येईल काटा कोरोनाचा आणि दातांच्या समस्येचा काही संबंध आहे, याचा ठोस पुरावा नसला करी काही डेन्टिस्टनीदेखील कोविड-19 मध्ये दातांसंबंधी लक्षण असू शकतं, असं मानतात.  युनिव्हर्सिटी ऑफ उटाहचे पीरियडॉन्टिस डॉ. डेव्हिड ओकानो यांनी सांगितलं, एखाद्या व्यक्तीचा दात सॉकेटमधून अचानक बाहेर येणं हे आश्चर्यकारक आहे. दातांसंबंधी ही समस्या आणखी गंभीर होऊ शकते. कोरोनातून बरं झाल्यानंतरदेखील लोकांमध्ये याचा दीर्घकालीन परिणाम राहतो.
    Published by:Priya Lad
    First published: