Home /News /lifestyle /

कोरोना व्हायरसमुळे 93 टक्के मानसिक आरोग्य सेवांना फटका-WHO

कोरोना व्हायरसमुळे 93 टक्के मानसिक आरोग्य सेवांना फटका-WHO

जगभरातील 10 पैकी एकाला मानसिक आरोग्याचे प्रश्न भेडसावत आहेत. यापैकी बहुतेक प्रश्न खूप कमी खर्चात सोडवले जाऊ शकतात. जगभरातील एक चतुर्थांश लोकं अशा देशांमध्ये आता राहतात, ज्या देशांत 1 लाख माणासांमागे केवळ एक सायकॅट्रिस्ट उपलब्ध आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर : South East आशियातील मानसिक आरोग्य सेवांची गरज असलेल्या पाच रुग्णांपैकी चौघांना या सेवा उपलब्ध होत नाहीत. कोरोना महामारीच्या आधीपासून या विभागातील मानसिक आरोग्य क्षेत्रातील सेवा आणि रुग्ण हे प्रमाण व्यस्तच आहे. पण कोरोना महामारीमुळे या सेवांना जबरदस्त फटका बसला आहे. जगभरातील 93 टक्के देशांतील अत्यंत महत्त्वाच्या मानसिक आरोग्य सेवा कोलमडून पडल्या आहेत, असं मत जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) South East विभागाच्या संचालिका डॉ. पूनम खेत्रपाल यांनी व्यक्त केलं. दरवर्षी 10 ऑक्टोबरला जागतिक मानसिक आरोग्य दिन पाळला जातो. ज्याच्या माध्यमातून मानसिक आरोग्याबाबत जनजागृती केली जाते. जागतिक स्तरावर मानसिक आरोग्याबद्दल शिक्षण दिलं जातं. त्यानिमित्त शनिवारी आयोजित कार्यक्रमात डॉ. खेत्रपाल बोलत होत्या. 'अग्नेय आशियात प्रत्येक माणसामागे मानसिक आरोग्य कर्मचाऱ्यांची उपलब्धता सर्वात कमी आहे. मानसिक आरोग्य आणि काळजी घेण्याच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून या भागातील देश तिथली मानसिक आरोग्याची स्थिती चांगल्या पद्धतीने बदलू शकतात', असं त्या म्हणाल्या. 'जगभरातील 10 पैकी एकाला मानसिक आरोग्याचे प्रश्न भेडसावत आहेत. यापैकी बहुतेक प्रश्न खूप कमी खर्चात सोडवले जाऊ शकतात. जगभरातील एक चतुर्थांश लोकं अशा देशांमध्ये आता राहतात, ज्या देशांत 1 लाख माणासांमागे केवळ एक सायकॅट्रिस्ट उपलब्ध आहे. या भागातील सर्वच देशांनी दर्जेदार मानसिक आरोग्य सेवा पुरवण्यासाठी आर्थिक गुंतवणूक करणं अत्यंत गरजेचं असल्याचं, या कोविड-19 च्या सामाजिक आणि आर्थिक परिणामांनंतर अधोरेखित झालं आहे. या गुंतवणुकीमुळे या भागातील लोकांच्या आरोग्य स्थितीत सुधारणा होईल,' असंही डॉ. खेत्रपाल म्हणाल्या. कोविडचा फटका आधीपासूनच मानसिक आरोग्याच्या सेवांचं प्रमाण कमी असताना कोविडचा प्रादुर्भाव झाल्यामुळे, मानसिक आजारांवरील औषधांसह इतर मानसिक आरोग्याशी संबंधित सेवा कोलमडल्या आहेत. डब्ल्युएचओने टेलिमेडिसीन तसंच घरपोच औषधं पोहोचवणं अशा उपक्रमांच्या माध्यमातून आपल्या सदस्य देशांमध्ये मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या 'ट्रिपल बिलियन' उपक्रमाअंतर्गतही मदत केली जाणार आहे. 'आणिबाणीच्या काळात मानसिक आरोग्य आणि पाठिंबा देणाऱ्या सेवा उपलब्ध करून देण्यामध्ये अग्नेय आशिया जगात आघाडीवर आहे. यासाठी WHO च्या mhGAP कार्यक्रमाचा खूप उपयोग झाला आहे. या आपत्तीमुळे मानसिक आरोग्य सेवा किती महत्त्वाच्या आहेत हे जगाच्या लक्षात आलं आहे ही गोष्ट सकारात्मक आहे. त्यामुळे तिच संधी समजून याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत,' असंही डॉ. खेत्रपाल यांनी सांगितलं.
    Published by:Karishma Bhurke
    First published:

    Tags: Health

    पुढील बातम्या