Home /News /lifestyle /

Corona Warrior ते Beggar; विनापगार काम आता रस्त्यावर येण्याची वेळ, डॉक्टरांची दयनीय अवस्था

Corona Warrior ते Beggar; विनापगार काम आता रस्त्यावर येण्याची वेळ, डॉक्टरांची दयनीय अवस्था

कोव्हिड-19 (covid 19) ड्युटीवर तैनात डॉक्टर (doctor) दिवसरात्र एक करून कोरोना रुग्णांची (corona patient) सेवा करत आहेत. मात्र आता त्यांच्यावर आता कशी परिस्थिती ओढावली आहे, याची व्य़था त्यांनी मांडली आहे.

    गुवाहाटी, 29 ऑक्टोबर :  "मेडिकल कॉलेजमधून पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण घेतल्यानंतर एका महिन्यातच कोव्हिड-19 ड्युटीवर डॉक्टर म्हणून रुजू झालो. आमच्या प्रोफेशनमधली ही आमची पहिली नोकरी आहे आणि आम्ही याबद्दल उत्साही आहोत. covid-19 आव्हानामुळे आम्हाला अजून नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळाली. आम्ही आमच्या परीने योग्य ती सेवा देत आहोत. दुर्दैवाने आम्हाला 89 दिवसांपासून आमचा पगार मिळालेला नाही.  आम्हाला विनावेतन काम करावं लागत आहे", जनरल सर्जरीमध्ये एमएस केलेले आसाममधील (aasam)  डॉक्टर प्रत्युष महंत यांनी मांडलेली ही व्यथा फक्त त्यांच्या एकट्याची नाही. तर त्यांच्यासारख्या शेकडो डॉक्टर्सची आहेत. आसाम मेडिकल कॉलेज हॉस्पिटल (AMCH) हे आसाममधील आणि पूर्वोत्तर राज्यांमधील सर्वांत जुनं रुग्णालय आहे. तसंच हे हॉस्पिटल आसामची अग्रगण्य वैद्यकीय संस्था म्हणून मानली जाते. इथं  काम करणाऱ्या आणि नुकतीच पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री घेतलेल्या डॉक्टरांना विनावेतन काम करावं लागत असल्यानं हातात पैसा नाही. त्यातच वसतिगृहे रिकामी करायला सांगितल्यामुळे हातचे घरही जाणार त्यामुळे डॉक्टरांनी सोशल मीडियावर आपली व्यथा मांडली. 'COVID Warriors to COVID Beggars' अशा आशयाचं पोस्टर त्यांनी ट्विटरवर शेअर केलं. गुवाहाटी मेडिकल कॉलेज रुग्णालयासोबत आसाममधील सात महाविद्यालयातील पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले 350 डॉक्टर लगेच कामावरती रुजू झाले. पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर दर महिन्याला 65 हजार रुपये पगार घेतात.मात्र या डॉक्टरांना अजूनही त्यांचा तीन महिन्याचा पगारसुद्धा दिला गेलेला नाही. त्यात आता त्यांना वसतिगृहं रिकामी करण्याचेही आदेश देण्यात आलेत. हे वाचा - याला म्हणतात परिवर्तन.. 20 वर्षांपासून सुरु असलेल्या बिअर बारचं झालं हॉस्पिटल AMCH डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार 22 ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या कार्यालयीन आदेशानुसार आसाम सरकारने नियुक्त केलेल्या सर्व डॉक्टरांना तातडीने त्यांची वसतिगृहे रिकामी करावी लागणार आहेत आणि नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात त्यांना बाहेर घर शोधायला सांगितलं आहे.‌ नोव्हेंबर महिन्यापासून पुढचे मेडिकल कोर्स सुरू होत असून त्या विद्यार्थ्यांना राहायला जागा हवी म्हणून वसतिगृह खाली करावी असं सरकारी आदेशात म्हटलं आहे. डॉ. प्रत्युष महंता म्हणाले, "आम्ही ड्युटी जॉईन केल्यापासून वसतिगृहावर गेलोच नाही. शिवाय आम्ही जवळपास 65 जण आहोत, इतक्या लगेच आम्ही दुसरं घर कसं शोधणार? तसंच बहुतेक लोक कोव्हिड डॉक्टरांना त्यांचं घर भाड्यानं देण्यास तयार होत नाही. आमच्यात मुलीसुद्धा आहेत ज्यांना अजूनही पगार मिळालेला नाही अशात आम्ही या परिस्थितीला कसं सामोरं जाणार आहोत? जेव्हा हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी निर्माण होईल तेव्हा ज्युनिअर डॉक्टरपेक्षा आम्ही अधिक उपयोगी पडू. आम्ही दूर 10-12 किलोमीटरवर राहायला गेलो तर इमर्जन्सीत काहीच उपयोग होणार नाही" हे वाचा - अरे देवा! आता कोरोना रुग्णांमधील Antibody व्हायरसऐवजी शरीरावरच करतायेत अटॅक AMCH च्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार पदवीधरांची परीक्षा झाल्यानंतर पुढील बॅचसाठी वसतिगृहं रिकामं करणं गरजेचं आहे. त्याशिवाय हे डॉक्टर पगारदार लोक आहेत जे आपल्या स्वतःच्या निवासस्थानासाठी पैसे देऊ शकतात. "आम्ही सरकारच्या विविध अधिकाऱ्यांशी बोलत आहोत आणि राज्यातील विविध मेडिकल कॉलेजमध्ये काम करणाऱ्या आमच्या सहकाऱ्यांशीही बोलत आहोत. सरकारने आमच्या विनंत्या मान्य केल्या नाहीत तर आम्ही हाताला काळ्या पट्ट्या बांधून काम करू", असा इशारा डॉ. महंत यांनी दिला आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या