मसाल्यांचा वास घेऊन समजणार तुम्हाला कोरोना आहे की फ्लू?

मसाल्यांचा वास घेऊन समजणार तुम्हाला कोरोना आहे की फ्लू?

38 देशांतील 500 पेक्षा जास्त शास्त्रज्ञांनी कोरोनाव्हायरससंबंधित (CoronaVirus) प्रश्नावली तयार केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 एप्रिल : सर्दी, खोकला ही सामान्य फ्लूची (Flu) लक्षणं ही कोरोनाव्हायरसची (CoronaVirus) लक्षणं आहेत. त्यामुळे अशी लक्षणं दिसल्यास हा सामान्य फ्लू आहे की कोरोनाव्हायरस हे आपल्याला समजणं अशक्य होतं. मात्र आता लवकरच तुम्हाला घरबसल्या हे समजू शकणार आहे, तेदेखील तुमच्या स्वयंपाकघरातील मसाल्यांवरून (Spices).

रिपोर्टनुसार 38 देशांतील 500 पेक्षा जास्त शास्त्रज्ञांनी कोरोनाव्हायरससंबंधित काही प्रश्नांची यादी तयार केली आहे. हा एक प्रकारचा सर्व्हे आहे, ज्यामध्ये तुम्हाला काही प्रश्नांची तुम्हाला उत्तरं द्यावी लागतील. मसाल्यांचा वास घेऊन किंवा चाखून सामान्य सर्दी-खोकला आहे की कोरोना याची माहिती मिळेल. यात हळद, जिरं, दालचिनी, बडीशेप, वेलची, काळी मिरी, लवंग अशा मसाल्यांचा समावेश आहे.

पोलीस चौकीवर RSS कार्यकर्ते तैनात? व्हायरल झालेल्या फोटोवरून वाद चिघळला

एखाद्या व्यक्तीला सामान्य फ्लू आहे की कोरोना आहे? त्या व्यक्तीला कोरोना टेस्ट करण्याची गरज आहे का? हे यावरून समजू शकणार आहे. अद्याप याला भारतात परवानगी मिळालेली नाही. मात्र परवानगी मिळाल्यानंतर ही प्रश्नावळी आरोग्य सेतूसह जोडली जाईल.

खूशखबर! आता 90 दिवसांत कोरोनावर लस मिळणार, 'या' देशाने केला दावा

भारताच्या सेंट्रल सायंटिफिक इन्स्ट्रूमेंट ऑर्गेनाइझेशनचे (सीएसआयओ) डॉ. रितेश कुमार, डॉ. अमोल पी. भोंडकर आणि डॉ. रिशमजीत सिंह यांचाही या ग्रुपमध्ये समावेश आहे. टाटा इन्स्टिट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्च, नेशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस आणि आयआयटी दिल्लीचे शास्त्रज्ञही याचा भाग आहेत. जे श्वासासंबंधी आजारामुळे वास आणि चवीची क्षमता कमी होण्याच्या थिएरीवर काम करत आहेत.

संकलन, संपादन - प्रिया लाड

First published: April 13, 2020, 1:22 PM IST

ताज्या बातम्या