Home /News /lifestyle /

100% प्रभावी नसतानाही कोरोना लस घेणं किती योग्य? तज्ज्ञ काय म्हणाले वाचा

100% प्रभावी नसतानाही कोरोना लस घेणं किती योग्य? तज्ज्ञ काय म्हणाले वाचा

अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, कॅनडा या देशांनी लोकसंख्येच्या तुलनेत लशींची पुरेसी तरतूद केली असल्याचं बोललं जात आहे.

अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, कॅनडा या देशांनी लोकसंख्येच्या तुलनेत लशींची पुरेसी तरतूद केली असल्याचं बोललं जात आहे.

WHO नं कोरोना लशीसाठी (corona vaccine) 50% मर्यादा ठरवली आहे. तरी काही लशी 90 टक्क्यांहून जास्त प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. पण कोणतीच लस 100% प्रभावी नाही त्यामुळे ही लस घेणं योग्य होईल का असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

    नवी दिल्ली, 05 डिसेंबर : जगभरात कोरोना लशीची (covid 19 vaccine ) चाचणी अंतिम टप्प्यात आहे. 2021 च्या सुरुवातीपर्यंत एकतरी लस (corona vaccine) बाजारात येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र इतक्या मोठ्या लोकसंख्येला एकत्र लस देणं शक्य नाही. यानंतर आता आरोग्य सचिव राजेश भूषण यांनीदेखील संपूर्ण जनतेला कोरोना लस देण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे. कोरोनाची(covid 19) साखळी तोडण्यासाठी ज्याला गरज असेल त्याला लस दिल्यानंतर संपूर्ण नागरिकांना लशीकरणाची गरज नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यावर विविध स्तरातून प्रतिक्रिया येत असून मेडिकल वैज्ञानिक डॉ. गगनदीप कांग यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. सीईपीआयच्या उपाध्यक्ष (Coalition for Epidemic Preparedness Innovations) डॉ. गगनदीप कांग यांनी न्यूज 18 शी बोलताना लशीची कार्यक्षमता आणि लशीच्या चाचण्यांच्या स्वयंसेवकांबद्दल देखील भाष्य केलं. त्याचबरोबर जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) मर्यादित केलेल्या 50 टक्के प्रभावी लशीच्या मुद्द्याबाबतही त्यांनी आपलं मत मांडलं आहे. सर्व नागरिकांना लशीकरण केलं जाईल असं सरकारने यापूर्वी स्पष्ट केलं होतं. पण आता प्रत्येकाला लशीची गरज नसल्याचं सरकार म्हणत आहे. याचा काय अर्थ होतो सर्व वयोगटातील लोकांना कोरोनाची बाधा होताना दिसते आहे. सध्या आपल्याला जी माहिती मिळत आहे ती खूप महत्त्वाची आहे. भारतातील प्रत्येकाला आपण लशीकरण करण्याचा प्रयत्न केला तरीदेखील ते शक्य नाही. इतक्या कमी कालावधीत मोठ्या संख्येला लशीकरण शक्य नाही. सध्या सरकार प्राधान्य ठरवत असून जसजशी लस उपलब्ध होईल त्याप्रमाणे सरकार निर्णय घेईल. सध्या भारताकडे कोणतीही लस उपलब्ध नाही. त्याचबरोबर ही लस कधी बाजारात येणार यासंदर्भात देखील आपल्याकडे काहीही माहिती नाही. सध्या आपल्याला प्राधान्यक्रम ठरवण्याची गरज असून सध्या आपण सरकारकडून तेच ऐकत आहोत. सर्वांना लशीकरणाची गरज आहे, जर कुणाला कोरोना झाला तर काय? यासाठी डेटा अद्याप उपलब्ध नाही. सध्या बरेच व्हायरल इन्फेक्शन आहेत.  SARS CoV2 हा काही सामान्य व्हायरस नाही आणि एकदा एखाद्या व्यक्तीस संसर्ग झाल्यास त्याच्या शरीरात काही प्रमाणात प्रतिकारक्षमता असते. लस दिली तरी ते संरक्षण किती मजबूत आहे? हे संरक्षण किती काळ आहे? या गोष्टी आपल्याला सध्या माहीत नाहीत. जगभरातील लशीकरण तज्ज्ञांनुसार इन्फेक्शन झाल्यास लस घेणं कधीही प्रभावी आहे. लस आपल्याला नैसर्गिक संसर्गापासून कितीतरी अधिक प्रतिकारशक्ती प्रतिसाद देते. त्याचबरोबर प्रत्येकाला लशीची गरज आहे की नाही हे एपिडेमिओलॉजिस्ट पहात आहेत. नागरिकांच्या आरोग्यबद्दल विचार केल्यास आपण देशाच्या 70 ते 75 टक्के भागात जरी लशीकरण करण्यास यशस्वी ठरलो तर आपण कोरोनाचं संक्रमण कमी करण्यात यशस्वी होऊ. त्याचबरोबर वैयक्तिक पातळीवरील संरक्षण हवे असेल तर लस मिळाल्यास त्या व्यक्तीचे संरक्षण होण्याची शक्यता जास्त असते. प्राधान्य यादीत नसणाऱ्या नागरिकांबद्दल काय? प्राधान्य यादीत न येणार्‍या नागरिकांबद्दल पुढच्या काही दिवसांमध्ये अधिक स्पष्टता येईल. सध्या सीईपीआयचे अंदाज आशावादी आहेत. मात्र भारत किंवा इतर काही देशांमध्ये प्राधान्य यादीत नसलेल्या नागरिकांना 2021 च्या अखेरीस ही लस मिळेल किंवा कदाचित 2022 देखील उजडू शकतो. लशींशी संबंधित प्रतिकूल घटनांबद्दल काय आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीशी सामना कसा करावा?सीरमच्या चाचणीदरम्यान घडलेल्या प्रकारामुळे काही प्रमाणात भीती निर्माण झाली आहे. ती भीतीयोग्य आहे का आणि त्या भीतीचा सामना कसा करावा? खरंतर कोणतीही भीती अवास्तव नसते. सर्वसाधारणपणे औषधं आणि लस घेतली जाते तेव्हा अशी परिस्थिती उद्भवत असेल आणि शक्यता काय आहे हे आपल्याला माहिती नसते. त्यावेळी आपल्याकडे केवळ नकारात्मकता आणि प्रश्न असतात. त्यावेळी  वैज्ञानिक, धोरण तयार करणारे  आणि  औषधं आणि लस तयार करणार्‍यांची प्रश्न आणि समस्या दूर करण्याची जबाबदारी आहे. एखाद्या चाचणीमध्ये भाग घेतल्यानंतर किंवा प्रतिकूल घटनेनंतर कोणी संभाव्यत: आजारी पडल्याचे समजल्यानंतर आपल्याला  काळजी वाटते. त्यामुळे आपण लस घेतल्यानंतर काय परिस्थिती होऊ शकते याचा अंदाज आपल्याला येतो. यामध्ये सहभागी स्वयंसेवक ज्यावेळी या साईड इफेक्टचे वर्णन करतो त्यावेळी तो योग्य स्थितीत आहे की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरते. त्याचबरोबर तो माहिती देताना काही चुकीची माहिती तर देत नाही ना हेदेखील पडताळून पाहणे गरजेचे आहे. याचबरोबर कोणतीही लस ही 100 टक्के प्रभावी नसते हेदेखील त्यांनी स्पष्ट केले. हे वाचा - मोजक्याच लोकांना मोफत कोरोना लस; मोदी सरकारच्या विनामूल्य लशीकरण यादीत कोण? हे समजून घेणे खूप आवश्यक असल्याचे देखील त्यांनी यावेळी म्हटले. त्याचबरोबर या लसीच्या चाचण्यांमध्ये सहभागी होणाऱ्या स्वयंसेवकांकडे नीट लक्ष दिले जाते की नाही हे तपासणे देखील महत्त्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले. त्यांचे योगदान विसरता कामा नये असेदेखील त्यांनी आवर्जून सांगितले. प्रत्येक स्वयंसेवक हा उज्ज्वल भविष्यासाठी काम करत असतो. त्यामुळे त्याच्या समस्येकडे देखील नीट पहिले पाहिजे. चाचणी दरम्यान त्यांना काही झाले तर ते नीट होईपर्यंत त्यांची काळजी घेणे जबाबदारी असल्याचे देखील त्या यावेळी म्हणाल्या. कोणतीही लस 100% प्रभावी नाही. त्यातच डब्ल्यूएचओने 50% टक्के प्रभावी लसदेखील चालेल म्हटल्यानंतर देखील नागरिकांचा आत्मविश्वास वाढलेला नाही. त्यामुळे अनेकजण ही लस घेणे योग्य होईल का असा प्रश्न उपस्थित करत आहेत. आपण आपल्या मुलाला बालरोगतज्ज्ञांकडे लशीकरणासाठी नेलं असता तो आपल्याला ही लस 90% किंवा 60% प्रभावी असल्याचं सांगत  नाही. पण प्रत्यक्षात तसंच आहे. आपण दररोज वापरत असलेल्या अनेक लस यापैकी 100 टक्के प्रभावी  नाहीत.  गोवर आणि रोटाव्हायरससाठीच्या लशी अत्यंत प्रभावी आहेत. भारतात रोटाव्हायरसची लस ही चाचण्यांमध्ये  55% प्रभावी आढळली होती. पण भारतात याचा आजही वापर केला जातो. ही लस 55 टक्केच प्रभावी असूनही सुरुवातीच्या तुलनेत ही लस घेतल्यानंतरही डायरिया झालेल्या केसेस खूप कमी येतात. त्यामुळे वैयक्तिक पातळीवर लसीचा प्रभाव आणि सार्वजनिक आरोग्यावर परिणाम होण्याची संभाव्यता यांच्यात फरक आहे. योग्य चर्चा करून हा गुंता सोडवणं गरजेचं असल्याचंदेखील त्यांनी यावेळी म्हटलं. हे वाचा - कोरोनातून बरा झाल्यानंतर 3 दिवसांनी माजी IPS च्या मुलाचा मृत्यू; डॉक्टर म्हणाले 50 % प्रभावी असणारी लसदेखील कोरोनाच्या या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यास मोठी फायदेशीर होणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ही सर्वोच्च पातळी सेट केली आहे. यूएसएफडीएनंदेखील हे मान्य केलं असून श्वसन संसर्गास उपयुक्त ठरणारी ही लस 50 टक्के देखील खूप प्रभावी असल्याचं माझं मत आहे, असं त्यांनी यावेळी म्हटलं. आजही अनेक तापांवरील लस योग्य कार्यक्षम नाहीत. मात्र अजूनही आपण त्यांचा वापर करत आहोत. सध्या बातम्यांमध्ये ज्या पद्धतीने 90 ते 95 टक्के प्रभावी असल्याची आकडेवारी येत आहे ती उत्तमच आहे. मात्र इतक्या लवकर अंदाज बांधणं चुकीचं होईल असंदेखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. प्रत्येक लशीची चाचणी ही विविध पातळीवर घेण्यात आली आहे. आतापर्यंत कोणतीही लस फेल गेली नसल्याने हीदेखील आपल्यासाठी एक आनंदाची गोष्ट असल्याचे यावेळी म्हटलं.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Corona vaccine, Corona virus in india, Coronavirus

    पुढील बातम्या