प्रभावी आणि सुरक्षित कोरोना लस तयार; पण मोदी सरकारसमोर आता नवं आव्हान

प्रभावी आणि सुरक्षित कोरोना लस तयार; पण मोदी सरकारसमोर आता नवं आव्हान

कोरोना लस (corona vaccine) लवकरच उपलब्ध होण्याची आशा पल्लवित झालेल्या असताना आता सरकारसमोर मोठं आव्हान उभं ठाकलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली: कोरोनाव्हायरस (coronavirus) महासाथीला आता जवळजवळ एक वर्ष पूर्ण होणार आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाचे डोळे कोरोना लशीकडे (corona vaccine) लागले आहेत. काही कोरोना लशीच्या (covid 19 vaccine) तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे निकाल सकारात्मक आले आहेत.  त्यामुळे कोरोना लशीबाबत (coronavirus vaccine) आशा आता अधिक पल्लवित झाल्या आहेत. लवकरच लस मिळेल अशी शक्यता आहे. मात्र आता मोदी सरकारसमोर (modi government) नवं आव्हान आहे.

अमेरिकेलीत फायझर कंपनीची लस आणि रशियातील स्पुतनिक V लशीचा तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचा प्राथमिक अहवाल जारी करण्यात आला. या दोन्ही लशी 90 टक्क्यांपेक्षा अधिक प्रभावी आणि सुरक्षित असल्याचा दावा करण्यात आला आहे. शिवाय भारतात सध्या सुरू असलेल्या ऑक्सफोर्डच्या कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीची महत्त्वपूर्ण अशी प्रक्रियाही पार झाली आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे, मात्र  भारतात कोरोना लस साठवण्यासाठी कोल्ड स्टोरेजचं मोठं आव्हान आहे.

कोरोना लस साठवण्यासाठी उणे 70 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान आवश्यक आहे. दिल्ली एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं, लशीसाठी एवढे तापमान तयार करणं हे भारतासाठी एक मोठं आव्हान आहे. ग्रामीण भागात एवढ्या कमी तापमानाची कोल्ड स्टोरज उभी करणं हे अधिक मोठं आव्हान आहे.

हे वाचा - अरे देवा! कोरोनाचं संकट त्यात आता उलटला 200 वर्षे जुना आजार; दोघांचा घेतला जीव

देशात कोल्ड चेन उभी करण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही सरकारच्या लस साठवणुकीच्या तयारीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. लस व्यवस्थित राहण्यासाठी उणे 70 डिग्री तापमान आवश्यक आहे आणि देशात अशी कुठलीही सुविधा उपलब्ध नाही, असा दावा राहुल गांधींनी केला आहे.

हे वाचा - कोरोनामुळे OCD ग्रस्त व्यक्तींना अधिक धोका; अशी घ्या काळजी !

देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढून 86 लाख 83 हजार 917 पर्यंत पोहोचली असून एकूण मृतांचा आकडा 1 लाख 28 हजार 121 पर्यंत पोहोचला आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या अनुसार 11 नोव्हेंबरपर्यंत एकूण 12 कोटी 19 लाख 62 हजार 509 नमुन्यांच्या चाचण्या घेण्यात आलेल्या आहेत.

Published by: Priya Lad
First published: November 12, 2020, 10:24 PM IST

ताज्या बातम्या