वॉशिंग्टन, 01 मे : वेगात लसीकरण (Corona Vaccination) करणं ही कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेवरील प्रमुख उपाययोजना असल्याचं सांगितलं जात आहे. परंतु केवळ भारतातच नाहीतर अमेरिका आणि जगभरातील अनेक देशांमधील नागरिकांत लस घेण्याबाबत द्विधा मनस्थिती असल्याचं दिसून येत आहे. नागरिक लस घेण्याबाबत संकोच (Corona vaccine hesitancy) का करत आहेत. पण असं का होतं आहे, असा प्रश्न आता उपस्थित होताना दिसत आहे.
एका सर्व्हेनुसार अमेरिकेत (America) 3 लशी उपलब्ध असून त्यापैकी 1 लस घेण्याबाबतही तेथील लोकांमध्ये द्विधा मनस्थिती आहे. ही स्थिती केवळ अमेरिकेतच नाही भारतासह अनेक देशांमध्ये आहे. एक वर्षांपूर्वी आरोग्य तज्ज्ञ लसीबाबत जे दावे करीत होते ,त्या तुलनेत लशी अधिक प्रभावी आणि सुरक्षित ठरूनदेखील हे घडत आहे. याबाबत अमेरिकेतील संशोधकांनी अभ्यास केला आहे.
लशीची जोखमी
लशीविषयी लोकांची मानसिकता जोखीम (Risk) या घटकाशी निगडीत आहे. जीवनात जोखीम ही सर्वसामान्य गोष्ट आहे. परंतु काही जोखीम या फायदेशीर असतात. अशा गणना केलेल्या जोखमींची यादी लांब असते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही जोखीम घेतल्याने धोका फारसा नसतो. त्याचे फलितही चांगले असते परंतु तरीही लोक ही जोखीम घेत नाहीत. कोरोना प्रतिबंधक लशींबाबत असंच काहीसं होताना दिसत आहे.
यामागे राजकीय कारण
अमेरिकेत लस घेण्याबाबत काही प्रमाणात राजकीय (Political) विरोधही होता. मेडिकल एक्सप्रेस डॉट कॉमच्या वृत्तानुसार,एका सर्व्हेमध्ये 40 टक्के रिपब्लिकन्सनी कामगारांना सातत्याने सांगितलं की आम्ही लसीकरणासाठी कोणतीही योजना आखलेली नाही.
हे वाचा - तुम्हीच ठरवा कोणती कोरोना लस योग्य? मोदी सरकारने सर्वसामान्यांवर सोपवला निर्णय
भारतात देखील लसीकरणाच्या सुरुवातीला राजकीय कारणं दिसून आली. परंतु ही कारणं काही राजकारणी व्यक्तींपर्यंतच मर्यादित राहिली. या संदर्भात अद्याप कोणतेही संकेत पाहिले नसल्याचं वक्तव्य समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केले होते.
मानवी स्वैराचार
कोरोना महासाथीचं भीषण रुप पाहणाऱ्या निम्म्याहून अधिक फ्रंटलाईन वर्कर्सला अद्याप लस दिली गेलेली नाही. परंतु ही स्थिती भारतात नव्हती. न्यूयॉर्क टाईम्सचे लेखक डेविड लियोहार्ट याबाबत लिहितात,ही जोखीम मानवी स्वैराचाराचं (Human liberty) उत्तम उदाहरण आहे. आपण अनेकदा कार अपघात किंवा रासायनिक प्रदूषण यासारख्या मोठ्या गंभीर धोक्यांना कमी लेखतो तर हवाई अपघात आणि शार्क हल्ल्यांसारख्या छोट्या जोखमींना फार महत्त्व देतो. लसी प्रती असलेली शंका किंवा संशय हे यामागील मोठं कारण आहे. कारण या गोष्टी लोकांनी कुठेतरी ऐकलेल्या असतात, परंतु त्यास कुठलाही आधार नसतो.
हे वाचा - तुम्हाला गंभीर कोरोना तर नाही ना? फक्त लघवीतूनच होणार निदान
इतिहास साक्षीदार आहे की, लशीबद्दलचा संशय हा लशीइतकाच जुना आहे. त्यामुळे द्विधा मनस्थिती समजू शकतो. परंतु याचा अर्थ असा नाही की हे योग्य आहे. सर्वच लशींची ट्रायल्सनंतरची आकडेवारी पाहता लशी त्यापेक्षा अधिक फायदेशीर ठरत आहेत. त्यानंतर लशीचा दुष्परिणाम हा कमी लोकांमध्ये आणि फार कमी काळ दिसून आला आहे.
लस हाच इलाज?
कोरोनामुळे भारतातील सुमारे 2 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे तर अमेरिकेत 5.7 लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसंच अनेक देशांमधील लाखो लोक या आजारातून बरे झाले असले तरी त्यांना दीर्घकाळ या आजाराच्या दुष्परिणामांना सामोरं जावं लागत आहे. यामुळे त्यांची मृत्यूची जोखीम वाढत आहे. मात्र लस (Vaccine) हाच यावर प्रभावी उपाय असल्याचं संशोधक वारंवार सांगत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.