मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Corona vaccine for Animal : आता प्राण्यांनाही दिली जाणार कोरोना लस; लवकरच होणार लसीकरण

Corona vaccine for Animal : आता प्राण्यांनाही दिली जाणार कोरोना लस; लवकरच होणार लसीकरण

जगभरात माणसांच्या कोरोना लसीकरणाला (Corona vaccination) वेग आला आहे. पण काही प्राण्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची प्रकरणं समोर आली आहे. आता या प्राण्यांनाही कोरोना लस (Corona vaccine for animal) दिली जाणार आहे.

मॉस्को, 31 मार्च : कोरोनाविरोधातील (Coronavirus) लढ्याच्या दिशेने शास्त्रज्ञांनी आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. माणसांसाठी कोरोना लस (Corona vaccine) उपलब्ध करून दिल्यानंतर आता प्राण्यांसाठीही कोरोना लस (Corona vaccine for animal) तयार केली आहे. जगात कोरोनाची पहिली लस (Covid 19 vaccine) तयार करणाऱ्या रशियानेच (Russia) प्राण्यांसाठीही जगातील पहिली कोरोना लस (Covid 19 vaccine for anmial) तयार केली आहे.

जगभरात काही प्राण्यांनाही कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे. प्राण्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची प्रकरणं कमी आहेत. पण तरी त्यांनाही कोरोनापासून संरक्षण देण्यासाठी तयारी करण्यात आली आहे. रशियातील  Rosselkhoznadzor (Federal Service for Veterinary and Phytosanitary Surveillance) मार्फत प्राण्यांसाठी कोरोना लस विकसित करण्यात आली आहे. Carnivac-Cov असं या लशीचं नाव आहे. रशियात या लशीची नोंदणीही झाली आहे. पुढील महिन्यातच या लशीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जाणार आहे, असं वृत्त रॉयटर्सने दिल्याच लाइव्ह मिंटनं म्हटलं आहे.

हे वाचा - Vaccine alert : आता या तारखेपूर्वी जन्मलेल्यांनाच मिळणार कोव्हिडची लस

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये या लशीचं क्लिनिक ट्रायल सुरू झालं होतं. कुत्रे, मांजर, कोल्हे यांच्यासह इतर प्राण्यांवर या लशीची चाचणी झाली. या लशीचा प्राण्यांवर कोणताही दुष्परिणाम झाला नाही आणि 100% प्रकरणात प्राण्यांमध्ये कोरोनाविरोधी अँटिबॉडीज तयार झाला, त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली.

रशियाने याआधी माणसांसाठी तीन कोरोना लशी तयार केलेल्या आहेत.  Sputnik V, EpiVacCorona, CoviVac या त्या लशी आहेत आणि आता Carnivac-Cov  जगातील ही पहिली कोरोना लस आहे जी प्राण्यांसाठी तयार झाली आहे, असं सांगितलं जातं आहे.

First published:

Tags: Corona vaccination, Corona vaccine, Coronavirus, Other animal, Russia