सरकारी नाही पण वैयक्तिकरीत्या कोरोना लस हवी असल्यास किती पैसे मोजावे लागणार? Serum नं सांगितली किंमत

सरकारी नाही पण वैयक्तिकरीत्या कोरोना लस हवी असल्यास किती पैसे मोजावे लागणार? Serum नं सांगितली किंमत

मोदी सरकारच्या कोरोना लसीकरणाच्या (corona vaccination) यादीत जर तुम्ही नसाल तर तुम्हाला कोरोना लस (corona vaccine) किती किमतीत मिळणार ते पाहा.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 जानेवारी : भारतात 16 जानेवारीला कोरोना लसीकरण (corona vaccination) मोहीम सुरू होणार आहे. केंद्र सरकारनं लसीकरणासाठी प्राधान्यक्रम ठरवला आहे. या प्राधान्यक्रमामध्ये तुम्ही येत नसाल पण तुम्हाला कोरोना लस (corona vaccine) हवी आहे तर मग काय? सर्वसामान्यांसाठी या लशीची किंमत किती असेल?  असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं (pune serum institute of india) आपली कोरोना लस कोव्हिशिल्डची (covishield) किंमत जारी केली आहे.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मोदी सरकारला कोविशिल्ड लसीचा एक डोस 200 रुपयांना देणार आहे. तर बाजारात ही लस प्रति डोस 1000 रुपयांना उपबल्ध होईल.

सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पूनावाला (adar poonawalla) यांनी सांगितलं की, "सरकारच्या विनंतीनुसार आम्ही सुरुवातीचे 100 दशलक्ष डोस 200 रुपयांना देणार आहोत. आम्ही आमच्या लशीची किंमत परवडणारीच ठेवली आहे. 200 रुपये या मूळ किंमतीपेक्षा किंचितच जास्त किंमत असेल. आम्हाला यातून कोणताही नफा कमवायचा नाही. आम्हाला देश आणि सरकारला मदत करायची आहे.  जेणेकरून आरोग्य कर्मचारी, सर्वसामान्य, कोरोनाचा अधिक धोका असलेले आणि गरीब नागरिकांना लस मिळेल. त्यानंतर आम्ही बाजारात ही लस 1000 रुपयांना देणार आहोत"

हे वाचा - कोरोनाचा परिणाम! आरोग्य क्षेत्रासाठी सरकार आणणार नवी फंड योजना

"बहुतेक देशांनी पंतप्रधान मोदींकडे कोव्हिशिल्ड लशीची मागणी केली आहे. दर महिन्याला आम्ही 70-80 दशलक्ष डोस बनवणार आहोत. त्यापैकी भारत आणि इतर देशांना किती डोस द्यायचे याची योजना तयार करत आहोत. आम्हाला प्रत्येकाला आनंदी ठेवायचं आहे. पण आपल्या देशातील नागरिकांची काळजी सर्वात आधी घ्यायची आहे. लशींच्या वाहतुकीसाठी सरकारनं तयारी केलेली आहे. शिवाय आम्हीही खासगी ट्रक, व्हॅन्स, कोल्ड स्टोरेजशी भागीदारी केली आहे", असंही पूनावाला म्हणाले.

हे वाचा - 'लशीमुळे कोरोनापासून सुरक्षा मिळेल पण...', WHO ने व्यक्त केली चिंता

भारतात  कोविशिल्ड  आणि कोवॅक्सिन (Covaxin) या दोन कोरोना  लशींच्या आपात्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. कोविशिल्ड ही लस पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं  ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेनेका कंपनीच्या मदतीनं तयार  केली आहे.

पहिल्या टप्प्यात जवळपास 30 कोटी नागरिकांचं लसीकरण करण्याची केंद्र सरकारची योजना आहे. यामध्ये 3 कोटी आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सचा समावेश आहे. त्यानंतर 50 पेक्षा जास्त वयाच्या आणि इतर आजार असलेल्या 27 कोटी लोकांना लस दिली जाणार आहे.

Published by: Priya Lad
First published: January 12, 2021, 5:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading