मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /भारतात 2 कोरोना लशींचा मार्ग मोकळा; प्रत्यक्षात कधी मिळणार CORONA VACCINE वाचा

भारतात 2 कोरोना लशींचा मार्ग मोकळा; प्रत्यक्षात कधी मिळणार CORONA VACCINE वाचा

भारतात कोरोना लसीकरण (corona vaccination) कधी सुरू होणार याबाबत एम्सचे (AIIMS) संचालक आणि राष्ट्रीय कोव्हिड 19 टास्क फोर्सचे (National Task Force on COVID19) सदस्य डॉ. रणदीप गुलेरिया यांनी माहिती दिली आहे.  माहिती दिली आहे.

भारतात कोरोना लसीकरण (corona vaccination) कधी सुरू होणार याबाबत एम्सचे (AIIMS) संचालक आणि राष्ट्रीय कोव्हिड 19 टास्क फोर्सचे (National Task Force on COVID19) सदस्य डॉ. रणदीप गुलेरिया यांनी माहिती दिली आहे. माहिती दिली आहे.

भारतात कोरोना लसीकरण (corona vaccination) कधी सुरू होणार याबाबत एम्सचे (AIIMS) संचालक आणि राष्ट्रीय कोव्हिड 19 टास्क फोर्सचे (National Task Force on COVID19) सदस्य डॉ. रणदीप गुलेरिया यांनी माहिती दिली आहे. माहिती दिली आहे.

नवी दिल्ली, 02 जानेवारी : भारतात दोन कोरोना लशींच्या (corona vaccine) आपात्कालीन वापराला (emergency use) मंजुरी मिळाली आहे. भारत बायोटेकची (Bharat Biotech) कोवॅक्सिन (Covaxin) ही स्वदेशी कोरोना लस आणि पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (serum institute of india) ऑक्सफोर्ड (Oxford) अॅस्ट्राझेनेकाची (AstraZenecas) कोविशिल्ड (Covishield) या दोन लशींच्या आपात्कालीन वापराला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे भारतातील या दोन लशींचा मार्ग मोकळा झाला आहे. आता ही लस प्रत्यक्षात कधी मिळणार याची प्रतीक्षा सर्वांना आहे.

भारतात मंजुरी मिळालेल्या दोन कोरोना लशी कधी मिळणार याबाबत नवी दिल्लीतील एम्सचे (AIIMS) संचालक आणि राष्ट्रीय कोव्हिड 19 टास्क फोर्सचे (National Task Force on COVID19) सदस्य डॉ. रणदीप गुलेरिया (Dr. Randeep Guleria) यांनी माहिती दिली आहे. पुढील दोन आठवड्यातच या लशी उपलब्ध होतील असं त्यांनी News18 शी बोलताना सांगितलं आहे.

डॉ. गुलेरिया म्हणाले, "तज्ज्ञांच्या समितीनं दोन कोरोना लशीच्या आपात्कालीन वापराला परवानगी दिल्यानंतर आता पुढील 10 ते 14 दिवसांत व्यापक स्तरावर कोरोना कोव्हिड 19 लस (Covid-19 vaccine) देण्यासाठी भारत तयार आहे.  आम्ही लसीकरण हळूहळू सुरू करणार आहोत. तोपर्यंत जास्तीत जास्त लशी उपलब्ध होतील. कोल्ड स्टोरेअभावी लस वाया जाऊ नये, याचीही खबरदारी घेण्याची गरज आपल्याला आहे. त्यामुळेज आपण ड्राय रन घेत आहोत, ज्याची आपल्याला मदत होईल"

हे वाचा - कोरोनापेक्षाही भयंकर व्हायरसच्या विळख्यात सापडणार जग; WHO ने केलं सावध

भारतात 1 जानेवारीला ऑक्सफोर्ड-अॅस्ट्राझेनका-पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोविशिल्ड (Covishield) लशीला आणि 2  जानेवारीला भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लशीला  परवानगी देण्यात आली. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेनं  (Central Drugs Standards Control Organisation) च्या तज्ज्ञांच्या समितीनं हा हिरवा कंदील दिला आहे. या समितीनं आता DCGI कडे शिफारस केली आहे. आता DCGI निर्णयाची सर्वांना प्रतीक्षा आहे.

हे वाचा - तुम्हालाही Corona vaccine हवी का? कशी करावी नोंदणी पाहा एका क्लिकवर

देशभरात सध्या कोरोना लसीकरणाचं ड्राय रन सुरू आहे. जेणेकरून प्रत्यक्षात जेव्हा लसीकरण सुरू होईल तेव्हा कोणतीही अडचण यायला नको. पहिल्या टप्प्यातल जवळपास 30 कोटी नागरिकांचं लसीकरण करण्याची केंद्र सरकारची योजना आहे. सहा ते आठ महिने हे लसीकरण सुरू राहिल. पहिल्या 3 कोटी लोकांना मोफत लस दिली जाणार आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सचा समावेश आहे. त्यानंतर 50 पेक्षा जास्त वयाच्या आणि इतर आजार असलेल्या 27 कोटी लोकांना लस दिली जाणार आहे.

First published:
top videos

    Tags: Corona, Corona vaccine, Coronavirus