• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • FACT CHECK: 'दारू प्या आणि कोरोनापासून दूर राहा' काय आहे यामागचं सत्य?

FACT CHECK: 'दारू प्या आणि कोरोनापासून दूर राहा' काय आहे यामागचं सत्य?

जीवघेण्या कोरोना व्हायरसवर दारूचा उतारा?

 • Share this:
  मुंबई, 14 मार्च : कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार माजला आहे. संसर्गजन्य रोगानं भारतातही घुसखोरी केली आहे. भारतात आतापर्यंत कोरोनाची लागण झालेले 70 रुग्ण आढळले आहेत. कोरोनाच्या संसर्गाबाबत अनेक सोशल मीडियावरून मेसेजही येत असतात. त्यात काही अफवा असतात तर काही जनजागृती करणारे असतात. बऱ्य़ाचदा आपण येणाऱ्या अफवा ह्या खऱ्या मानतो. सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून एक मेसेज व्हायरल होत आहे. दारूचं सेवन केल्यामुळे कोरोना व्हायरस होत नाही असं या मेसेजमध्ये लिहिण्यात आलं आहे. हा मेसेज सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झाला आहे. या व्हायरल झालेल्या मेसेजवर आता जागतिक आरोग्य संघटनेनं यासंदर्भात खुलासा केला आहे. अशा प्रकारच्या अफवांपासून दूर राहण्याचं आवाहन जागतीक आरोग्य संस्थेनं केलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार दारू प्यायल्यानं कोरोना व्हायरस दूर होतो ही केवळ अफवा आहे. त्यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये.कोरोनाचा संसर्ग एकदा झाला की तुम्ही मद्यपान केलं तरीही तो व्हायरस मारला जाऊ शकत नाही. ही एक भ्रामक आणि काल्पनिक कथा आहे. कोरोना व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तीच्या अंगावर मद्य शिंपडणं, मद्यपान करणं किंवा मद्य देणं हे शरीरासाठी हानिकारक आहे. हे वाचा-VIDEO : नळातून पाणी नाही तर चक्क आली रेड वाइन, लोकांची उडाली झुंबड क्लोरीन आणि किटाणूनाशक म्हणून मद्याचा वापर करत असले तरीही ते अशावेळी शरीरासाठी घातक असल्याचं जागतिक आरोग्य संस्थेनं म्हटलं आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची अशी द्रव्य घेताना डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी स्वच्छ साबणाने हात धुवा, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, मास्क लावून फिरा आणि स्वच्छता राखा असं आवाहन WHO ने नागरिकांना केलं आहे. हे वाचा : 'कोरोना'ची दहशत! व्हायरसमुळे हजारो कोंबड्या जिवंत गाडल्या, पाहा Video
  Published by:Kranti Kanetkar
  First published: