मुंबई, 24 मे : साधा खाखरा (Khakhra), मेथी खाखरा, टोमॅटो खाखरा, मॅगी मसाला खाखरा, पाणीपुरी मसाला खाखरा अशा वेगवेगळ्या चवीच्या खाखऱ्याची चव तुम्ही चाखली असाल. मात्र कोरोना स्पेशल खाखरा (corona special khakra) खाल्लात की नाही? कोरोनाव्हायरसच्या या दहशतीत हा कोरोना स्पेशल खाखरा सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
कोरोनाव्हायरसने संपूर्ण जग बदललं आहे. अनेक व्यवसाय, उद्योग ठप्प झालेत. अशात लोकं आपला व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी असा काही ना काही जुगाड करताना दिसत आहेत आणि अशा जुगाडातून तयार झाला हा कोरोना स्पेशल खाखरा. हा खाखरा रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा आहे आणि हा खाखरा बनवण्यासाठी वापरण्यात आलेले पदार्थ व्हायरस इन्फेक्शला दूर ठेवते, अशी या खाखऱ्याची मार्केटिंग करण्यात आली आहे.
या खाखऱ्याचा पॅकेटचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच, त्याच्यावर सोशल मीडिया युजर्सच्या प्रतिक्रिया येऊ लागल्यात.
हे वाचा - कोरोनाव्हायरसवर उपचारासाठी औषधांपेक्षाही चहा प्रभावी; तज्ज्ञांचा दावा
हे झालं खाण्याचं. अशाच पद्धतीनं इतर व्यावसायिकही कोरोनाच्या कठिण परिस्थितीत आपल्या व्यवसायासाठी मार्ग शोधत आहेत. काही दिवसांपूर्वीच बेळगावातील एका सोनारानं चांदीचा मास्क तयार केला.
चौथ्या लॉकडाऊनमध्ये लग्न सोहळ्यांना (wedding) काही अटींनुसार परवानगी देण्यात आली. यामध्ये मास्क घालणं बंधनकारक आहे. त्यामुळे आता कोरोना लॉकडाऊनमधील या लग्नसोहळ्यात (marriage) वधू--वरांसाठी खास चांदीचा फेस मास्क (Silver face mask) तयार करण्यात आला आहे.
हे वाचा - तुम्हालादेखील आल्याचा चहा आवडतो का? मग 'हे' वाचाच
महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेवरील बेळगावात राहणारे सोनार संदीप सागाओंकर यांनी हा चांदीचा मास्क बनवणं सुरू केलं आहे. खरंतर लॉकडाऊनमुळे त्यांचा व्यापार ठप्प झाला होता. त्यात मास्कची गरज पाहून त्यांनी त्या दिशेनं आपला व्यापार पुन्हा सुरू केला. लॉकडाऊनमध्ये होत असेल्या लग्नांसाठी त्यांनी चांदीचा फेस मास्क तयार केला आहे आणि या मास्कला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचं त्यांनी सांगितलं.
संकलन, संपादन - प्रिया लाड
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.