कोरोनावर मात करण्यासाठी सापडला अस्सल घरगुती उपाय, संशोधकांनीही केलं मान्य

कोरोनावर मात करण्यासाठी सापडला अस्सल घरगुती उपाय, संशोधकांनीही केलं मान्य

गुळणी करणे हा भारतीय जीवनशैलीचा एक भाग आहे. घशात खवखव, घोरपणा येणे यामध्ये भारतीय हा घरगुती उपाय म्हणून वापरतात.

  • Share this:

नवी दिल्ली, 2 जून :  कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील शास्त्रज्ञ कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी आणि त्यांच्यावर उपचार करण्यासाठी संशोधन करत आहेत. एकीकडे, कोरोनाच्या लसीबद्दल सकारात्मक परिणाम  येत आहेत. दुसरीकडे बरेच कंपन्या त्यांचे औषध तयार करण्यात गुंतलेल्या आहेत.

सध्या, कोरोना विषाणूची लक्षणे आढल्यानंतर आधीपासूनच उपलब्ध असलेल्या औषधांद्वारे उपचार केला जात आहेत आणि रूग्ण बरे होत आहेत आणि रुग्णालयातून परत आपल्या घरी जात आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून वेळोवेळी सल्ला व सूचना दिल्या जात आहेत तर आयुष मंत्रालयाने आयुर्वेदात कोरोना विषाणूपासून बचाव आणि गृहोपचार हा देखील एक उपचार सांगितला आहे.

हेही वाचा -कोरोनाला हरवले पण मृत्यूने गाठले, मालेगावच्या योद्धाची चटका लावणारी एक्झिट

कोरोना टाळण्यासाठी लोकं विविध प्रकारचे घरगुती उपचारांचा अवलंब करीत आहेत. मीठाच्या पाण्याने गार्गलिंग (गुळणी) करणे यापैकी एक आहे. यूकेमधील संशोधकांनीही नुकत्याच झालेल्या एका संशोधन अभ्यासात याला मान्यता दिली आहे.

यूके विद्यापीठाच्या एडिनबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी गुळण्या विषयावर संशोधन अभ्यास केला आहे. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, मीठाच्या पाण्याने गुळण्या केल्यास कोरोना संसर्गाची लक्षणे बर्‍याच प्रमाणात कमी होऊ शकतात. सोबतच कोविड संसर्गाचा कालावधी देखील या औषधाने कमी केला जाऊ शकतो.

कोरोना विषाणूची लागण झालेल्या 66 रुग्णांवर यूकेमधील संशोधकांनी हा अभ्यास केला आहे. संशोधकांनी हा अभ्यास 12 दिवस चालविला. या 66 रुग्णांना कोमट पाण्यात मीठ मिसळून गुळण्या करण्यास  सांगण्यात आले. 12 दिवसांनंतर, जेव्हा या रूग्णांच्या नाकातून नमुने घेण्यात आले, तेव्हा संसर्गाची लक्षणे फारच कमी होती.

हेही वाचा -आता लहान मुलांवरही होणार कोरोनाच्या लसीची चाचणी? पालकांनी घेतला धसका

जर्नल ऑफ ग्लोबल हेल्थमध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनानुसार, मिठाच्या गुळण्या केल्यामुळे कोरोनाग्रस्त रूग्णांना सरासरी अडीच दिवसात कमी संक्रमण असल्याचे आढळले. संशोधकांनी असा दावा केला आहे की, मिठाच्या गुळण्या केल्याने कोरोना विषाणूच्या संसर्गाचा परिणाम कमी होतो. सोबतच गुळण्याच्या मदतीने रुग्ण अल्पावधीतच बरा होऊ शकतो.

गुळण्याच्या मदतीने कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका कमी केला जाऊ शकतो. जर माउथवॉश/गार्गल नियमित अंतराने केले गेले तर यामुळे कोरोना विषाणूची तीव्रता कमी होऊ शकते,असे यापूर्वी भारतीय वैज्ञानिकाने स्पष्ट केले आहे.

अलीकडेच आयुष मंत्रालयानेही लोकांना गरम पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे. आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, सकाळी व संध्याकाळी कोमट पाण्याने गुळणी केल्याने घसा स्वच्छ राहतो आणि त्याच वेळी विषाणूजन्य संसर्गाचा धोका टाळता येतो. गुळणी करणे हा भारतीय जीवनशैलीचा एक भाग आहे. घशात खवखव, घोरपणा येणे यामध्ये भारतीय हा घरगुती उपाय म्हणून वापरतात.

First published: June 2, 2020, 4:47 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading