मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /कोरोना मास्कमुळे उद्भवताहेत डोळ्यांच्या समस्या? अशी घेऊ शकता काळजी

कोरोना मास्कमुळे उद्भवताहेत डोळ्यांच्या समस्या? अशी घेऊ शकता काळजी

तर आत्तापर्यंत 1 लाख 30 हजार 353 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

तर आत्तापर्यंत 1 लाख 30 हजार 353 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

मास्क घालणं गरजेचं आहेच, पण त्याचे डोळ्यावर काही दुष्परिणामही होत आहेत.

मुंबई, 15 फेब्रुवारी : कोरोनावरची लस (corona vaccine) आल्यानंतर आता लोक बरेच निश्चिंत झाल्याचं चित्र आहे. मात्र अजूनही धोका टळलेला नसल्यानं मास्क आणि सॅनिटायझर (sanitizer) बंधनकारक केलेलं आहे. मास्क (mask) दीर्घकाळ घालून राहिल्यानं मात्र त्याचे अनेक दुष्परिणाम होत असल्याचंही सतत समोर येतं. यावरचे काही उपाय आपण पाहुयात...

मास्क सतत घालून राहिल्यानं त्वचेवर खाज, पुरळ येणं, कान दुखणं अशा समस्या आपल्यापैकी अनेकांना उद्भवल्या असतील. सोबतच डोळे कोरडे (dryness in eyes) पडत असल्याचंही जाणवलं असेल. ही समस्या (problem) गांभीर्यानं घेण्याची गरज आहे. डोळ्यातल्या ओलावा (moisture) कमी होत असल्यास काही गोष्टी त्यावर उपाय (solutions) म्हणून नक्कीच करता येतील.

आपण मास्क घालतो आणि नाकानं श्वास घेतो (breathing) तेव्हा मास्कखालची त्वचा गरम होते. मास्क घातलेल्या असल्यानं हवा नीटपणे नाकाच्या आत जाऊ शकत नाही. आपण श्वास सोडतो तेव्हा ही हवा मास्कवर आदळून डोळ्यांना लागते. हे सतत होत राहतं तेव्हा मग डोळ्यांमध्ये कोरडेपणा वाढतो. आर्द्रता कमी होते. याकारणाने डोळ्यांच्या पृष्ठभागावर सूज (swelling in eyes) आणि जळजळ झाल्याचं सतत जाणवतं.

दीर्घकाळ मास्क घालून ज्यांना वावरावं लागतं त्या लोकांनी यावर लक्ष ठेवलं  पाहिजे, की त्वचा आणि डोळे नीट व सुरक्षित राहतील. मास्क घालणं गरजेचंच आहे पण मास्कचा डोळ्यांवर पडणारा प्रभाव नियंत्रणात ठेवला अपाहिजे. तुम्ही तासंतास मास्क घालून राहत असाल तर चांगला फिट बसणारा मास्क घातला पाहिजे. असा मास्क घाला ज्यातून हवा वर डोळ्यांकडे जाणार नाही.

हेही वाचाप्राचीन भारतीय सुंदरतेची रहस्य; 'या' पाच गोष्टींनी खुलवा तुमचं सौंदर्य

मास्कमुळं तुमच्या डोळ्यांखालचा भाग ताणला तर जात नाही ना हे पाहा. शक्य असेल तर खुल्या भागात जाऊन मास्क खाली काढून जरावेळ मोकळा श्वास घ्या. डोळ्यात जळजळ, खाज अशी लक्षणं सतत जाणवत राहिल्यास डोळ्यांच्या खास विशेषज्ञ डॉक्टरांना दाखवा. डोळ्यांची नीट तपासणी करवून घ्या. याशिवाय तुम्ही योगविद्येचीही मदत घेऊ शकता. डोळ्यांची क्षमता वाढवत त्यातील आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी त्राटक करा. हा नक्कीच या काळात डोळ्यांचं आरोग्य टिकवण्यासाठी एक प्रभावी उपाय असेल.

First published:

Tags: Corona vaccine, Coronavirus, Covid19, Eyes damage, Health Tips, Lifestyle, Mask, World After Corona