Home /News /lifestyle /

मुलीला पाहताच आईनं हसत हसत सोडला जीव; कोरोनाग्रस्त मायलेकीच्या भेटीचा शेवटचा क्षण

मुलीला पाहताच आईनं हसत हसत सोडला जीव; कोरोनाग्रस्त मायलेकीच्या भेटीचा शेवटचा क्षण

कोरोनाग्रस्त मायलेकीच्या भेटीचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

    ब्रिटन,  04 जानेवारी : कोरोनानं (coronavirus)  कित्येकांनी आपल्या प्रिय व्यक्तींना गमावलं आहे. काही जणांना तर शेवटचं भेटताही आलं नाही. प्रत्येक जण एकमेकांना पाहण्यासाठी धडपडतो आहे. अशाच कोरोनाग्रस्त मायलेकीच्या (mother daughter) शेवटच्या भेटीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल (social media viral) होतो आहे. कोरोनाग्रस्त आईचं मरण जवळ आलं होतं. तिनं आपल्या कोरोनाग्रस्त लेकीला शेवटचं पाहिलं आणि हसत हसत तिनं जीव सोडला आहे. प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणणारं हे दृश्यं. 76 वर्षांच्या मारिया रिओ आणि त्यांची 49 वर्षांची मुलगी अॅनाबेल शर्मा दोघांनाही कोरोनाची लागण झाली. एकाच वेळी त्यांना एकाच  रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दोघांवरही आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. मारिया यांची प्रकृती खूपच ढासळली. त्यांची जगण्याची गॅरंटी खूपच कमी होती. पण त्यांच्या शेवटच्या क्षणी त्यांना आनंद देता यावा यासाठी त्यांना त्यांची मुलगी अॅनाबेल जवळ नेण्यात आलं. रुग्णालयात दाखल केल्यानंतर दोन आठवड्यांतच मारिया आणि अॅनाबेल यांचे बेड जवळजवळ आणण्यात आले. अॅनाबेलला सांगण्यात आलं तिच्या आईची प्रकृती खूपच गंभीर आहे आणि तिच्याकडे आता मोजकेच दिवस शिल्लक आहेत. मारिया यांनाही आपल्या हातात आता काही वेळच असल्याची माहिती होती. त्यांनी एक फॉर्म साइन केला होता, ज्यामध्ये त्यांनी आपल्यावर उपचार करू नये, असं सांगितलं आणि मृत्यू स्वीकारला. हे वाचा - निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी, हनुमानाला दंडवत घालून वानराने सोडले प्राण,VIDEO मायलेक एकमेकांजवळ येताच दोघांनीही एकमेकांचे हात हातात धरले. आईनं आपल्या शेवटच्या क्षणी मुलीला डोळे भरून पाहिलं. मुलीनंही आपल्या मन भरून पाहून घेतलं. त्याच क्षणी हा फोटो काढण्यात आला. त्यांचे हे शेवटचे क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यात आला. हा फोटो Humans of Covid-19 च्या फेसबुक पेजवर शेअर करण्यात आला. जिथं अॅनाबेलनं आपली ही स्टोरीदेखील शेअर केली आहे. हा फोटो काढल्यानंतर २४ तासांतच मारिया यांचा मृत्यू झाला. आपल्या मुलीला डोळ्यात साठवून त्यांनी चेहऱ्यावर हसू आणत आपला जीव सोडला. हे वाचा - अभिमानास्पद! जिल्हा परिषदेची शाळा ते देशातील कोरोना लशीला परवानगी देणारे प्रमुख मेट्रोच्या वृत्तानुसार अॅनाबेलनं सांगितलं, तिची आई मारियाला मधुमेह आणि अस्थमा होता. त्यात कोरोनाही झाला ज्यामुळे तिची प्रकृती अधिक गंभीर झाली. तिच्या आईच्या चेहऱ्यावर मास्क होता आणि तिला एक पारदर्शी हेल्मेट घातला होता. ती आपल्या मुलीला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती. पण मास्क, हेल्मेटमुळे आपली आई काय बोलते आहे हे तिला समजत नव्हतं. अॅनाबेलला अस्थमा होता. त्यामुळे पाच आठवडे ती आयसीयूमध्येच होती. आईच्या अंत्यसंस्काराला तिला जातं आलं नाही. स्क्रिनवरच तिनं आईचा अंत्यसंस्कार विधी पाहिला.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या