मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /कोरोना काळात कोलमडलं सर्वसामान्यांचं बजेट; वर्षभरात काय महागलं, काय स्वस्त झालं पाहा

कोरोना काळात कोलमडलं सर्वसामान्यांचं बजेट; वर्षभरात काय महागलं, काय स्वस्त झालं पाहा

लॉकडाऊनच्या काळात एकिकडे लोक बेरोजगार झाले तर दुसरीकडे महागाई वाढत गेली.

लॉकडाऊनच्या काळात एकिकडे लोक बेरोजगार झाले तर दुसरीकडे महागाई वाढत गेली.

लॉकडाऊनच्या काळात एकिकडे लोक बेरोजगार झाले तर दुसरीकडे महागाई वाढत गेली.

  नवी दिल्ली : गेल्या वर्षी 23 मार्च रोजीचा कोरोना विषाणूचा (Corona Virus ) वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची (Lockdown) घोषणा करण्यात आली होती. या एका वर्षात सर्वांनीच अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना केला. अनेकांचे रोजगार बुडाले, नोकरी गेली, अनेक लोक देशोधडीला लागले. लॉकडाऊनच्या काळात सर्वांना घरी बसणं अनिवार्य असल्यानं हातावर पोट असलेल्यांचे अतिशय हाल झाले. वाहतुकीवर निर्बंध, उत्पादन कमी मागणी जास्त अशी स्थिती असल्यानं महागाई (Inflation) वाढली. एकीकडे काम नाही आणि दुसरीकडे महागाई असा दुहेरी फटका बसल्यानं अनेकांची स्थिती अत्यंत वाईट झाली.

  लॉकडाऊन लागू झाला त्याला आता एक वर्ष पूर्ण झालं आहे. या वर्षभरात सर्वसामान्यांना मोठा आर्थिक फटका बसला. घरचं बजेट कोलमडलं. या कालावधीत काय महागलं आणि काय स्वस्त झालं ते पाहुयात.

  गेल्या वर्षी दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे भाव तब्बल 20 टक्क्यांनी वाढले तर पेट्रोल (Petrol), डिझेलचे(Diesel) भाव तब्बल 27 टक्क्यांनी वाढले. लॉकडाऊननंतर महिनाभरात पेट्रोलचा दर प्रती लीटर 7 टक्क्यांनी वाढला. तीन महिन्यांनी त्यात 12.43 टक्के वाढ झाली, सहा महिन्यांनी 12.52 टक्के तर वर्षभरात त्यात 26.87 टक्के वाढ झाली आहे. डिझेलच्या दरातही हाच आलेख दिसेल. डिझेलचे दर वर्षभरापूर्वी 64.66 रुपये लीटर होते त्यात आता तब्बल 26.05 टक्के वाढ झाली आहे. मासिक तुलनेत त्यात 8.07 टक्के, तिमाही तुलनेत 15.06 टक्के तर सहामाही तुलनेत 10.71 टक्के दर वाढ झाली.

  पेट्रोल डिझेलच्या या वाढत्या किंमतीमुळे महागाईही वाढली आहे. कारण कच्च्या मालापासून (Raw Material) उत्पादन(Final Product) बनून ते ग्राहकांपर्यंत पोहोचेपर्यंतचा प्रवास प्रदीर्घ असतो. यात इंधन खर्च वाढला की उत्पादन खर्चही वाढतो पर्यायानं विक्री किंमतही वाढते. तसंच कच्च्या तेलावर सरकारकडून आकारण्यात येणाऱ्या करामुळे वाहतूक खर्च वाढतो. गेल्या वर्षभरात त्यात 11 टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे देशातील रिटेल महागाई (Retail Inflation) दर मोजणारा ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) फेब्रुवारी 2021 मध्ये 5.03 टक्क्यांवर पोहोचला,जानेवारीमध्ये 4.06 टक्के होता.

  हे वाचा - Petrol Diesel Price: चोवीस दिवसांनंतर स्वस्त झालं पेट्रोल-डिझेल, वाचा आजचे दर

  दरम्यान दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचे दरही एका महिन्यात दहा टक्क्यांनी वाढले असून यात साबण,शाम्पू, हँडवॉश, क्रीम आदींचा समावेश आहे. सरकारी आकडेवारीनुसारही वैयक्तिक निगा क्षेत्रातील उत्पादनांच्या किमती 8 टक्क्यांनी वाढल्या आहेत. तर खाण्यापिण्याच्या गोष्टींमध्ये नॉनव्हेज पदार्थ (Nonveg food) अधिक महाग झाले आहेत. चिकन,मटण, मासे आणि अंडी यांच्या किमती 11 टक्क्यांनी वधारल्या आहेत. मोहरीच्या तेलाचे दर तब्बल 21 टक्क्यांनी वधारले आहेत. चहा पावडरही महाग झाली आहे.

  सर्वसामान्य लोकांना दिलासा दिला आहे तो भाजीपाल्याच्या (Vegetables)किमतीनी. भाजीपाल्याच्या किमती मात्र सहा टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. यामुळं ग्राहकांचा फायदा होत असला तरी शेतकऱ्यांचे(Farmers) नुकसान होत आहे.

  हे वाचा - Gold Price Today: सोन्याचे दर 800 रुपयांनी घसरले, काय आहे मुंबई-पुण्यातील भाव

  दरम्यान दैनिक भास्करच्या वृत्तानुसार नवीन पीक येईपर्यंत या किमती अशाच वाढतील असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.  पण ही महागाई जास्त काळ राहणार नाही,असा अंदाज वरिष्ठ अर्थ तज्ज्ञ वृंदा जहागीरदार यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या मते देशातील महागाई वाढण्याचं मुख्य कारण असतं कच्च्या तेलाच्या किमती. त्यामुळं अन्नधान्य, खाण्यापिण्याच्या गोष्टी महागतात. आता कृषी आणि उद्योग क्षेत्राची स्थिती सुधारत असल्यानं ही महागाई जास्त दिवस राहणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

  First published:
  top videos

   Tags: Inflation, Lockdown, Money