धक्कादायक! प्लाझ्मा चढवलं आणि कोरोना रुग्णाचा झाला मृत्यू; पोस्टमॉर्टेममध्ये झाला मोठा खुलासा

धक्कादायक! प्लाझ्मा चढवलं आणि कोरोना रुग्णाचा झाला मृत्यू; पोस्टमॉर्टेममध्ये झाला मोठा खुलासा

कोरोना रुग्णाचा (corona patient) जीव वाचवण्यासाठी कोरोनामुक्त रुग्णाचे प्लाझ्मा (plasma therapy) दिले जात आहेत. मात्र याच प्लाझ्मामुळे एका रुग्णाचा जीव गेला आहे.

  • Share this:

भोपाळ, 14 डिसेंबर : कोरोना रुग्णांचा (corona patient) जीव वाचवण्यासाठी प्लाझ्मा थेरेपी (plasma therapy) दिली जाते आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांना कोरोनामुक्त रुग्णांच्या रक्तातील प्लाझ्मा दिले जात आहेत. जेणेकरून कोरोनावर मात केलेल्या रुग्णांच्या शरीरात तयार झालेल्या कोरोनाविरोधातील अँटिबॉडी कोरोना रुग्णाला मिळतील आणि त्यांनाही कोरोनाशी लढता येईल. मात्र जीव वाचवण्यासाठी दिल्या जाणाऱ्या या प्लाझ्मानेच कोरोना रुग्णाचा जीव घेतला आहे. कोरोना रुग्णाला प्लाझ्मा चढवताच त्याचा मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना घडली आहे मध्य प्रदेशात (madhya pradesh).

ग्वालिअरमध्ये कोरोना रुग्णाला प्लाझ्मा चढवल्यानंतर त्याचा मृत्यू झाला आहे.  मनोज गुप्ता असं या रुग्णाचं नाव आहे. त्याला अपोलो रुग्णालात प्लाझ्मा देण्यात आला. त्यानंतर त्याची तब्येत बिघडली आणि 10 डिसेंबरला मृत्यू झाला. प्लाझ्मा चढल्यानंतर दोन दिवसांतच मृत्यू झाला. त्यामुळे प्लाझ्मामध्येच काहीतरी गडबड होती असा आरोप मृताच्या कुटुंबानं केला.

हे वाचा - माझ्या आयुष्यातला खडतर प्रसंग; माहिरा खानने सांगितला कोरोनाशी संघर्षाचा अनुभव

आज तकच्या रिपोर्टनुसार,  मृताच्या कुटुंबानं आरोप केला आहे की, त्यांनी जयारोग्य रुग्णालयातून प्लाझ्मा खरेदी केले होते. यासाठी 18 हजार रुपये मोजले होते. कुटुंबानं यावरून गोंधळ घातला आणि मग प्लाझ्माची तपासणी करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली. प्लाझ्माची तपासणी आणि मृताचं पोस्टमॉर्टेमही करण्यात आलं. त्यावेळी मनोज गुप्ता यांना खराब प्लाझ्मा चढवण्यात आलं होतं, असा धक्कादायक खुलासा झाला. पोस्ट मॉर्टेम रिपोर्टमध्ये त्याच्या रक्तात संक्रमण झाल्याचं आढळलं. प्लाझ्मा चढवल्यानंतर हे संक्रमण झालं होतं. यानंतर दोन दिवसांतच त्याचा मृत्यू झाला.

हे वाचा - ख्रिसमस आणि 'न्यू इयर'वर कोरोनाचं सावट ‘या’ देशात पुन्हा लॉकडाऊन

पोस्टमॉर्टेम रिपोर्ट मिळाल्यानंतर तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय त्यागी, जगदी आणि महेंद्र अशी या आरोपींची नावं आहे. अजय त्यागी हा मुख्य आरोपी असून तो जयारोग्य रुग्णालयातील लॅब अटेंडर मनीष त्यागीचा भाऊ आहे. तिघांनाही ताब्यात घेतलं आहे.  अजयची चौकशी सुरू करण्यात आली आहे. क्राइम ब्रांच, जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागानं या प्रकरणात कारवाईसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. संबंधित ब्लड बँकेवर कारवाई केली जाईल.

Published by: Priya Lad
First published: December 14, 2020, 3:35 PM IST

ताज्या बातम्या