मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /कोरोना महासाथीत वृद्ध लोकांच्या मानसिक आरोग्यावर झाला असा परिणाम - नवे संशोधन

कोरोना महासाथीत वृद्ध लोकांच्या मानसिक आरोग्यावर झाला असा परिणाम - नवे संशोधन

 वृद्धांवर केलेल्या एका नवीन संशोधनात असं समोर आलंय की, कोरोना साथीच्या आजारामुळं वृद्धांमध्ये अनेक प्रकारच्या मानसिक समस्यांची लक्षणं आढळून (Pandemic depression among the Elderly) आली आहेत.

वृद्धांवर केलेल्या एका नवीन संशोधनात असं समोर आलंय की, कोरोना साथीच्या आजारामुळं वृद्धांमध्ये अनेक प्रकारच्या मानसिक समस्यांची लक्षणं आढळून (Pandemic depression among the Elderly) आली आहेत.

वृद्धांवर केलेल्या एका नवीन संशोधनात असं समोर आलंय की, कोरोना साथीच्या आजारामुळं वृद्धांमध्ये अनेक प्रकारच्या मानसिक समस्यांची लक्षणं आढळून (Pandemic depression among the Elderly) आली आहेत.

 नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर : गेल्या दोन वर्षांपासून जगभरात थैमान घातलेल्या कोरोना महामारीनं समाजातील जवळपास प्रत्येक घटकाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रभावित केलं आहे. याचा सर्वात जास्त परिणाम झाला आहे, तो विशेषतः वृद्धांच्या मानसिक आरोग्यावर (Mental Health). वृद्धांवर केलेल्या एका नवीन संशोधनात असं समोर आलंय की, कोरोना साथीच्या आजारामुळं वृद्धांमध्ये अनेक प्रकारच्या मानसिक समस्यांची लक्षणं आढळून (Pandemic depression among the Elderly) आली आहेत.

कॅनडातील मॅकमास्टर (McMaster University) विद्यापीठानं केलेल्या या अभ्यासाचे निष्कर्ष 'नेचर एजिंग' (Nature Aging) या वैद्यकीय नियतकालिकात प्रसिद्ध झालेत. संशोधकांना त्यांच्या अभ्यासात असं आढळून आलंय की 50 वर्षं किंवा त्याहून अधिक वयाच्या 43 टक्के प्रौढांना कोरोना महामारीच्या सुरुवातीला मध्यम किंवा जास्त प्रमाणात नैराश्य (Depression) आलंय.

मॅकमास्टर युनिव्हर्सिटीचे संशोधक परमिंदर रैना (Parminder Raina) म्हणतात की, लॉकडाऊनचा लोकांच्या आरोग्याशी संबंधित घटकांवर कसा परिणाम झाला, हे शोधण्याचा प्रयत्न या अभ्यासाद्वारे करण्यात आला. यासाठी टीमनं टेलिफोन आणि वेब सर्व्हे डेटाचा वापर केला.

अभ्यासात समोर आल्यात या बाबी

या अभ्यासानुसार, साथीच्या आजारादरम्यान वृद्धांमध्ये काळजी घेण्याची जबाबदारी, कुटुंबापासून वेगळं होणं, कौटुंबिक संघर्ष आणि एकटेपणा यासारखे घटक नैराश्याचे प्रमुख कारण म्हणून समोर आले. इतकंच नाही तर, संशोधकांना असेही आढळून आले की पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त नैराश्य आढळून आलं आहे. कारण बहुतेक महिलांनी काळजी घेण्यात येत असलेला अडथळा हे तणावाचं कारण असल्याचं सांगितलं.

दरम्यान, एकूणच प्रौढांमध्ये नैराश्याची लक्षणं असण्याची शक्यता दुप्पट असल्याचं आढळून आलं. याशिवाय कमी उत्पन्न आणि खराब आरोग्य असलेल्या लोकांमध्येही या दिवसांत नैराश्य जास्त प्रमाणात दिसून येत होतं.

हे वाचा - दररोज फक्त एक ब्लॅक कॉफी आरोग्यासाठी जादुई ठरेल! कधी, कशी घ्यायची जाणून घ्या

अशाप्रकारे ओळखा आपल्या जवळच्या लोकांमधील नैराश्याची लक्षणं

या व्यक्ती नेहमी काळजीत असतात. दुःखी असतात. प्रत्येक वेळी बोलताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू येतात.

निराशावादी खूप बोलतात, भविष्याबद्दल हताश होतात.

नेहमी शून्यता आणि अपराधीपणाने ग्रासलेले असतात.

एकत्र वेळ घालवण्यात स्वारस्य दाखवत नाहीत आणि संवाद करण्यास फारसे इच्छुक नसतात.

अगदी लगेच अस्वस्थ होतात आणि चिडचिड करतात.

ऊर्जेचा अभाव, खूप हळू चालणं आणि स्वतःला निरुपयोगी वाटणं.

हे वाचा - अवयवदान करणं का आहे महत्त्वाचं? राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त त्याचे महत्त्व जाणून घ्या

कशाचीही काळजी घेत नाहीत. सर्व वस्तू अस्ताव्यस्त ठेवतात.

स्वतःच्या उपस्थितीमध्ये फारसा रस दाखवत नाहीत.

झोपण्यामध्ये व्यत्यय. एकतर खूप जास्त झोपणं किंवा अजिबात न झोपणं.

सामान्य क्रियाकलापांमध्ये रस दाखवत नाही.

कशावरही लक्ष केंद्रित करता येत नाही.

एकतर खूप खाणं किंवा खूप कमी खाणं.

अनेकदा मृत्यू आणि आत्महत्येबद्दल बोलणं.

First published:
top videos

    Tags: Corona vaccine, Coronavirus, Mental health