• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • Corona : गेल्या दीड वर्षात सेक्स लाइफमध्ये झालाय बदल; या लक्षणांमुळे चिंता अधिक वाढली

Corona : गेल्या दीड वर्षात सेक्स लाइफमध्ये झालाय बदल; या लक्षणांमुळे चिंता अधिक वाढली

महिला पतीबरोबर शारीरिक संबंधांबरोबर बोलणं टाळतात. पतीच्या मनात गैरसमज निर्माण होऊ नयेत असं त्यांना वाटतं.

महिला पतीबरोबर शारीरिक संबंधांबरोबर बोलणं टाळतात. पतीच्या मनात गैरसमज निर्माण होऊ नयेत असं त्यांना वाटतं.

वर्क फ्रॉम होममुळे कपल्सला घरात एकत्र वेळ घालवण्यासाठी पुरेसा वेळ मिळत असला तरी नव्या समस्या उद्भवत आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 3 जुलै : कोरोना महामारीमुळे ऑफिसेसमध्ये काम करणाऱ्यांची ऑफीस लाईफ वर्क फ्रॉम होममध्ये (Work From Home) शिफ्ट झाली आहे. वर्क फ्रॉम होममुळे कपल्सला घरात एकत्र वेळ घालवण्यासाठी पुरेसा वेळ मिळत आहे. परंतु, याचा परिणाम लैंगिक जीवनावर (Sex Life) झाल्याचे दिसून येत आहे. या काळात शारीरिक संबंधांच्या अनुषंगाने क्रियाकलापामध्ये घट झाली आहे, असा दावा सेक्सोलॉजिस्ट करत आहेत. आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, कोरोनाच्या (Corona) संसर्गाच्या भीतीमुळे लोकांना आपल्या जोडीदारासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी भीती वाटू लागली आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या कालावधीत अनेक लोक सोलो सेक्सला प्राधान्य देत आहेत. जोडीदारासोबत लैंगिक संबंध ठेवताना आपल्याला कोरोनाचा संसर्ग होईल का अशी भीती त्यांना सतावत आहेत. त्यामुळे एकूणच लैंगिक जीवनात गेल्या दीड वर्षांत मोठा बदल झाला आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोविड-19 एखाद्या व्यक्तीचं लैंगिक जीवन नष्ट करु शकतो. कोविड -19 च्या संसर्गामुळे जाणवणारा शारीरिक थकवा, कमकुवतपणा आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने याबाबी इरेक्टाइल डिस्फंक्शन (Erectile Dysfunction) या आजारासाठी ट्रिगर ठरु शकतात. त्यामुळे डॉक्टर्स अधिक चिंतेत आहेत. द वीकच्या एका वृत्तानुसार, लैंगिक प्रतिक्रिया ही इच्छा, उत्तेजना आणि कामोत्तेजना यावर अवलंबून असते. कोविड -19 मुळे वाढती एन्झायटी, डिप्रेशन आणि सायकोसिसमुळे यौन इच्छा कमी होते आणि हेच इरेक्टाइल डिस्फक्शनचे कारण ठरु शकते असे तज्ज्ञ म्हणतात. हे ही वाचा-लसीचे दोन्ही डोस घेतल्यानं मृत्यूचा धोका नाही?, केंद्र सरकारनं दिली मोठी माहिती कोरोनामुळे आपला सेक्स ड्राईव्ह (Sex Drive) नष्ट होणार नाही ना, अशी चिंता काही लोकांना सतावते. याबाबत तज्ज्ञ म्हणतात, कोरोनाप्रतिबंधक लसीमुळे माणसाच्या कामोत्तेजनेवर कोणताही प्रतिकूल परिणाम होत नाही. ऑरगॅझमवेळी शारीरिक अवयव आणि उत्तेजनेवर कोणताही परिणाम दिसून येत नाही. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर जोडीदारसोबत शारीरिक संबंध ठेवण्याचे प्रमाण वाढले आहे. लस (Vaccine) घेतल्यानंतरही काही लोक कोरोना संक्रमित होत आहेत, त्यामुळे कपल्समधील भीती अजूनही पूर्णपणे गेलेली नाही. संसर्ग झालेली व्यक्ती अगदी सहजपणे आपल्या जोडीदाराला कोरोना संक्रमित करु शकते. कोविड-19 च्या लसीमुळे वंध्यत्वाचा धोका वाढतो असा काही लोकांचा समज आहे. काही दिवसांपूर्वी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने प्रेस रिलीजच्या माध्यमातून कोरोना प्रतिबंधक लस ही पूर्णतः सुरक्षित असून, त्यामुळे कोणतेही घातक दुष्परिणाम शरीरावर होत नाहीत, असे स्पष्ट केले होते. याबाबत एनटीएजीआयमध्ये कोविड -19 वर काम करत असलेले समुहाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. एन.के. अरोरा यांनी सांगितले की जेव्हा भारत आणि अन्य देशांमध्ये पोलिओची लस दिली जात होती, तेव्हा देखील अशाच अफवा पसरल्या होत्या. पोलिची लस घेतलेल्या मुलांना भविष्यात वंध्यत्वाचा सामना करावा लागेल, अशा अफवा त्यावेळी पसरल्या होत्या. या अशा अफवा लसीकरण विरोधक लॉबीकडून पसरवल्या जातात. वैज्ञानिकांनी सखोल संशोधन केल्यानंतर लसीची निर्मिती होते, ही बाब आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. कोणत्याही लसीचा अशा प्रकारे दुष्परिणाम होत नाही. याबाबत डॉ. अरोरा म्हणाले की मी याबाबत सर्वांना आश्वासित करु इच्छितो की अशा प्रकारचा प्रचार केवळ लोकांची दिशाभूल करण्याकरिता केला जातो. स्वतःचे, कुटुंबाचे आणि समाजाचे कोरोना संसर्गापासून संरक्षण करणे हा आपला मुख्य उददेश आहे. त्यामुळे सर्वांनी लसीकरण (Vaccination) करुन घेणे आवश्यक आहे. सेक्स ड्राईव्ह उत्तम ठेवण्यासाठी टिप्स कोरोनाच्या या संकटकाळात सेक्स ड्राईव्ह उत्तम ठेवण्यासाठी तज्ज्ञ काही टिप्स देत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, जीवनशैलीत थोडी सुधारणा केल्याने लोकांना मोठा फायदा होत आहे. यासाठी आपल्या आहारात (Diet) दररोज हिरव्या भाज्या, फळांचा समावेश करणं आवश्यक आहे. प्रोटीन आणि फायबरयुक्त आहार घेणं गरजेचं आहे. नियमित व्यायाम करणं आवश्यक आहे. यामुळे निश्चितच फायदा होईल.
  First published: