Cooking oil चा तुमच्या आरोग्यावर होतो परिणाम, तुम्ही योग्य तेल वापरताय ना?

प्रत्येक तेलामध्ये (oil) वेगवेगळे घटक असतात आणि त्यानुसार ते आरोग्यासाठी किती फायदेशीर हे ठरतं.

  • Share this:

ऑलिव्ह ऑईल - सर्वात जास्त वापरलं जाणारं तेल, तुम्ही कोणत्याही पदार्थांमध्ये वापरू शकता. मध्ये एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल हेल्दी मानलं जातं. यामुळे रक्तदाब कमी होण्यास आणि सूज कमी होण्यास मदत होते. तसंच हृदयाच्या आजारांचा धोकाही कमी होतो. यामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतं, ज्यामुळे पेशींना हानी पोहोचत नाही.

सनफ्लॉवर ऑईल - सूर्यफुलापासून तयार करण्यात आलेल्या तेलात व्हिटॅमिन ई भरपूर असतं, त्यामुळे सौंदर्यप्रसाधनांमध्ये याचा वापर होतो. हे तेल मोनोसॅच्युरेडेट आणि पॉलिसॅच्युरेटेड फॅटी असिडचं  मिश्रण आहे. गरम केल्यानंतरही त्यातील घटक कायम राहतात. त्यामुळे तळण्यासाठी हे तेल जास्त प्रमाणात वापरलं जातं. मधुमेही रुग्णांनी मात्र काळजी घ्यावी, कारण या तेलाच्या सेवनाने शुगर लेव्हल वाढू शकते.

मोहरीचं तेल - मस्टर्ड ऑईल हे तुम्ही मध्यम गरम पदार्थांसाठी म्हणजे फोडणीसाठी वगैरे वापरू नका. मात्र तळण्यासाठी डिप फ्राइंगसाठी हे तेल उत्तम आहे.

तिळाचं तेल - सिसम ऑईल फिकट आणि गडद रंग अशा दोन रंगांमध्ये असतं. दोन्ही प्रकारच्या तेलामध्ये पॉलीसॅच्युरेटेड फॅट असतं, यामध्ये मॅग्नेशिअम, कॉपर, कॅल्शिअम, आयर्न, व्हिटॅमिन बी-6 असतं.  मात्र हे तेल जास्त गरम करू नका. तळण्यासाठी वापरू नका. गडद रंगाचं तेल तुम्ही मॅरिनेट आणि stir fries साठी वापरू शकता.

शेंगदाणा तेल - पीनट ऑईल वापरायचं असेल रिफाइंडपेक्षा कोल्ड प्रेस तेल वापरा. यामध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतं, जे तुमच्या हृदयाला संरक्षण देतं. गरम पदार्थांमध्ये हे जास्त वापरलं जातं.

खोबरेल तेल - तुम्हाला वाटतं तितकं हेल्दी नाही. यामध्ये सॅच्युरेटेड फॅट असतं, ज्यामुळे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते, जी हृदयासाठी चांगली नाही. शिवाय यात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स नसतात.

सूचना - या लेखात दिलेली माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. तज्ज्ञांशी संपर्क जरूर साधावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 28, 2020 02:27 PM IST

ताज्या बातम्या