गर्भनिरोधक गोळ्या घेणाऱ्या महिलांनी ही बातमी जरूर वाचा

गर्भनिरोधक गोळ्या घेणाऱ्या महिलांनी ही बातमी जरूर वाचा

लैंगिक संबंधांनंतर डॉक्टरांच्या सल्ल्याविना घेतलेल्या गर्भनिरोधक गोळ्यांचे शरीरावर काय परिणाम होतात?

  • Share this:

मुंबई, 13 एप्रिल: बाजारात आजच्या घडीला वेगवेगळ्या कंपनीच्या गर्भनिरोधक गोळ्या अगदी सहज उपलब्ध आहेत. काही गोळ्या ह्या मेडिकलमध्ये प्रिस्क्रिपशन शिवाय दिल्या जातात. लैंगिक संबंधांनंतर 72 तासांच्या आत तुम्ही गोळी घेता. गोळी घेतल्यानंतर गर्भ राहण्याची शक्यता कमी असते. बऱ्याचदा इतर गर्भनिरोधकाचा वापर न करता महिलांना गर्भनिरोधक गोळ्या दिल्या जातात. या गोळ्यांचे आपल्या शरीरावर दूरगामी परिणाम होत असतात याची कल्पना आपल्याला नसते.

कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स 0.75 MG गोळी घेतल्यानंतर अनेक स्त्रियांना त्रास झाल्याचं संशोधनात समोर आलं आहे. या गोळीमुळे श्वसनाचे आजार होण्यास सुरुवात झाली. ज्या स्त्रियांना श्वसनाचा आजार होता त्यांना गोळ्या घेतल्यानंतर अधिक त्रास झाला.

गर्भनिरोधक गोळ्यांचं सेवन केल्यानं महिलांना ओठ, चेहरा, हातपायांमध्ये सुज येण्याच्या तक्रारी वाढत असल्याचं समोर आलं. 0.75 MG गोळी घेतल्यानंतर काही महिलांना ओटी पोटात दुखण्यास सुरुवात झाली. तर ओटीपोटात ताणल्यासारखं वाटणं किंवा मळमळ होणं यासारखा त्रास सुरू झाला.

ज्या मुली लैंगिक संबंध ठेवल्यानंतर गर्भनिरोधक गोळ्या घेतात त्या मुलींमध्ये मासिक पाळीच्या वेळी त्रास होणं, पाळीदरम्यान जास्त रक्तस्त्राव होणं, पाळीत बदल होणं यांसारख्या वेगवेगळ्या त्रासाचा सामना करावा लागला.

गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यानंतर महिलांना जास्त थकवा जाणवतो. या गोळ्यांमुळे स्तनांचे विकार, कॅन्सरसारखे आजार होण्याचा धोका असतो. गर्भनिरोधक गोळ्या घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. तुम्हाला कोणताही आजार असेल तर तो डॉक्टरांना सांगणं आवश्यक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याविना गोळ्या घेणं तुमच्या शरीरासाठी हानिकारक आहे. प्रत्येक स्त्रीने गर्भनिरोधक गोळ्या घेण्यापूर्वी परिणामांचा विचार करायला हवा.

VIDEO: नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी गोविंदा पोहोचला अमरावतीला

First published: April 13, 2019, 3:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading