...म्हणून दसऱ्याच्या 21 दिवसांनंतर साजरी केली जाते दिवाळी, GOOGLE MAP वरचं मिळालं उत्तर

...म्हणून दसऱ्याच्या 21 दिवसांनंतर साजरी केली जाते दिवाळी, GOOGLE MAP वरचं मिळालं उत्तर

दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजिता देवीची पूजा आणि शस्त्रपूजा अशा चार गोष्टी करायच्या असतात.

  • Share this:

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा दसरा हा सण देशभरात उत्साहाने साजरा केला जातो. महाराष्ट्रात अश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी असं म्हटलं जातं. नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी हा सण साजरा केला जातो. रामाने रावणाचा वध करून सीमोल्लंघन केलं होतं याची आठवण म्हणून हा सण साजरा केला जातो. यामुळेच या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजिता देवीची पूजा आणि शस्त्रपूजा अशा चार गोष्टी करायच्या असतात.

गावांमध्येही या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पावसाळ्यात पीक पेरल्यानंतर जे पिक तयार होतं ते सर्वात आधी याच दिवशी घरात आणलं जातं. पांडवांना वनवास पत्करावा लागला होता, त्यावेळी त्यांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडाच्या ढोलीत ठेवली होती. पुढे अज्ञातवास संपल्यावर, शमीच्या धोलीतील शस्त्रे काढून त्यांनी विराटाच्या गायी पळविणाऱ्या कौरवांवर स्वारी केृरत विजय मिळवला. तसेच दसऱ्याच्याच दिवशी प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध करून विजय मिळविला.  या दोन्ही गोष्टी याच दिवशी झाल्याचं मानलं जातं.

 यामुळेच या दिवसाला 'विजयादशमी' असं नाव मिळाले. याच कारणामुळे दसऱ्याच्या दिवशी शमीची आणि शस्त्रात्रांची पूजा करण्याही प्रथा सुरु झाली असे म्हणतात. दीपावलीचा सण हा आश्विन वद्य त्रयोदशीपासून ते कार्तिक शुध्द द्वितीयेपर्यंत म्हणजे पाच दिवस साजरा केला जातो. या दिवसांमध्ये धनत्रयोदशी, नरक चतुर्थशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज असे पाच महत्त्वपूर्ण दिवस येतात.

याच कारणामुळे दसऱ्यानंतर 21 दिवसांनी दिवाळी साजरी केली जाते-

जाणकारांच्या मते, प्रभू श्रीराम यांना त्यांच्या सैन्यासह श्रीलंकेतून भारतात पायी पोहोचायला 21 दिवस लागले होते. यामुळेच दसऱ्यानंतर 21 दिवसांनी दिवाळी सण साजरा केला जातो. विशेष म्हणजे श्रीलंकेतून अयोध्येत पोहचायला 21 दिवस लागतात याची खात्री करण्यासाठी तुम्ही गूगल मॅपवर शोधू शकता. तेव्हा जरी तंत्रज्ञान विकसित झालेलं नसलं तरी तेव्हाच्या तंत्रज्ञानाची बरोबरी आजही केली जाऊ शकत नाही हे तर तुम्हाला पटेलच.

पहावं ते नवलंच! खिडकीची काच तोडून महिलेवर सांभारने मारली उडी, VIDEO VIRAL

शॉर्ट घालून जाणाऱ्या मुलीला गाडी थांबवून त्याने विचारलं 'कपडे नाहीयेत का?'

कुत्र्यांना फिरवायला गेलेल्या व्यक्तीवर कोसळली वीज, पाहा हा धक्कादायक VIDEO

आईच्या कुशीतून 8 महिन्यांच्या बाळाला पळवलं, धक्कादायक CCTV VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: lifestyle
First Published: Oct 9, 2019 05:58 PM IST

ताज्या बातम्या