मुंबई, 19 ऑक्टोबर : लठ्ठपणा ही एक मोठी जागतिक समस्या बनत चालली आहे. अर्थात हा आजार नाही, पण सध्याच्या काळात ते अनेक आजार होण्याचं कारण बनतंय. लठ्ठपणा हा लाइफस्टाइलमधील अनेक कमतरतांचं सूचक आहे. योग्य आहार न घेणं, व्यायामाचा अभाव, अनुवंशिकता या सर्व गोष्टी लठ्ठपणाला कारणीभूत असतात. पण वातावरणातील काही घटक लठ्ठपणाशी संबंधित आहेत का? नवीन अभ्यासावर विश्वास ठेवल्यास वायू प्रदूषण आणि महिलांचं वजन वाढण्याचा संबंध आहे. हा अभ्यास सर्वसामान्यांसाठीच नाही तर शास्त्रज्ञ आणि आरोग्यतज्ज्ञांसाठी आश्चर्यकारक ठरला आहे.
50 वर्षांपर्यंतच्या महिला
अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातील संशोधकांनी त्यांच्या नवीन अभ्यासात हा अनपेक्षित संबंध शोधून काढला आहे. अभ्यासाचे मुख्य लेखक जिन वांग यांच्या मते, 40 आणि 50 वयातील स्त्रिया ज्या दीर्घकाळ वायू प्रदूषणाचा सामना करत आहेत, ज्यामुळे त्यांच्या शरीराचे वजन, कंबरेचा आकार आणि शरीरातील चरबी वाढते. त्यामुळे त्यांना इतर आरोग्यविषयक समस्यांना सामोरं जावं लागतंय.
हेही वाचा - अबनॉर्मल हार्ट रिदम म्हणजे काय? या कारणांमुळे कोणालाही होऊ शकतो त्रास
वातावरणातील प्रदूषकांशी जवळचा संबंध
हे नकारात्मक परिणाम विशेषतः नायट्रोजन ऑक्साईड्स, ओझोन आणि सूक्ष्म कणांच्या उच्च पातळीशी संबंधित आहेत, जी प्रमुख वायू प्रदूषकं म्हणून ओळखली जातात. संशोधकांनी लिहिलं, की या अभ्यासात त्यांनी अमेरिकेतील 1654 गोर्या, कृष्णवर्णीय, चिनी आणि जपानी महिलांचा सहभाग होता, ज्यांचे सरासरी वय 2000 ते 2008 दरम्यान 49.6 वर्षे होतं.
शारीरिक रचनेची मोजणी
संशोधकांनी सांगितलं की त्यांनी सहभागी महिलांच्या पत्त्यांच्या आधारे त्यांच्या भागातील वायू प्रदूषणाचं प्रमाण जोडलं. DXA वापरून सहभागींच्या शरीराच्या आकाराची आणि शरीराच्या रचनेची मोजणी वर्षातून अंदाजे एकदाच केली गेली. यावरून वायुप्रदूषणाचे नेमके कोणते घटक लठ्ठपणावर परिणाम करतात, याची माहिती समोर आलीय.
मॉडेलचा वापर
संशोधकांनी रेखीय मिश्र-प्रभाव असलेल्या मॉडेल्सचा वापर केला, ज्यामध्ये त्यांनी वायुप्रदूषण आणि शरीराचा आकार आणि संरचनात्मक मोजमाप यांच्यातील संबंध तपासले. नंतर या फरकांमध्ये कोणत्या शारीरिक क्रियांचे योगदान आहे, हे शोधण्याचा प्रयत्न केला. तसंच कोणत्या कारणांमुळे आरोग्यामध्ये निर्णायक बदल होत आहेत, हेही तपासलं.
अनेक घटकांमध्ये फरक
या अभ्यासाच्या परिणामांच्या विश्लेषणातून असं दिसून आलंय की वायू प्रदूषणाच्या संपर्कात येण्याचा संबंध मध्यमवयीन महिलांमध्ये शरीरातील फॅट आणि शरीराचे कमी वजन यांच्याशी संबंधित आहे. म्हणजे यापैकी, शरीरातील चरबी 45 टक्के म्हणजे सुमारे 2.6 पौंड किंवा 1.18 किलोग्रॅमने वाढली होती. तर, इतर घटकांमध्येही असेच परिणाम दिसून आले.
शारीरिक हालचाली
याशिवा, संशोधकांनी शरीराच्या संरचनेच्या दृष्टीने वायु प्रदूषण आणि शारीरिक हालचाली यांच्यातील संबंध देखील तपासले. त्यांना आढळून आलं की उच्च स्तरावरील शारीरिक हालचालींमुळे वायू प्रदूषणाच्या संपर्कात असलेल्या शरीराच्या रचनेतील बदल प्रभावीपणे कमी करू शकतात.
हा अभ्यास डायबेटिस केअरमध्ये प्रकाशित झाला आहे. या संशोधनात वांग यांनी सांगितलं की, या अभ्यासात मध्यमवयीन महिला प्रमुख लक्ष्य होत्या त्यामुळे त्याच्या तपासणीचे परिणाम या वयोगटातील पुरुष आणि इतर वयोगटातील स्त्रियांना लागू होत नाहीत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lifestyle, Weight loss