मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Safe Physical Relation बाबत महाराष्ट्रातील चित्र बदललं; केंद्र सरकारच्या रिपोर्टमधून मोठा खुलासा

Safe Physical Relation बाबत महाराष्ट्रातील चित्र बदललं; केंद्र सरकारच्या रिपोर्टमधून मोठा खुलासा

नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे म्हणजे राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या अहवालातून शारीरिक संबंधाबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे म्हणजे राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या अहवालातून शारीरिक संबंधाबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे म्हणजे राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या अहवालातून शारीरिक संबंधाबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

  • Published by:  Priya Lad
मुंबई, 11 ऑगस्ट : नको असलेली गर्भधारणा असो किंवा लैंगिक आजार असो हे टाळण्यासाठी सुरक्षित शारीरिक संबंधांसाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत. याच सेफ रिलेशनबाबतचं महाराष्ट्रात चित्र बदललं आहे. नुकताच केंद्र सरकारने एक रिपोर्ट जारी केला आहे. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे म्हणजे राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या अहवालातून मोठा खुलासा झाला आहे. भारतात नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी पुरुषांद्वारे कंडोमचा वापर वाढल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. कंडोम, गर्भनिरोधक गोळ्या, कॉपर-टी आणि इतर गर्भनिरोधक पर्यायांचा महाराष्ट्रातील वापर 66 टक्के आहे. राज्याच्या सरासरीच्या तुलनेत विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यांचा दर चांगला आहे. गर्भनिरोधकाचे पारंपारिक पद्धतीचा वापर कमी झाला असून नव्या पद्धतीचा वापर वाढला आहे. कंडोम जास्त प्रमाणात वापरलं जात आहे. 2016 मधील सर्वेक्षणानुसार राज्यात कंडोमचा वापर 7.1 टक्के होता जो 2021 साली 10.2 टक्के झाला. हे वाचा - 70 वर्षांच्या महिलेने दिला बाळाला जन्म; लग्नानंतर 54 वर्षांनी आईबाबा बनलं वृद्ध दाम्पत्य विदर्भात कंडोमचा वापर जास्त होतो आहे. 2016 मधील सर्वेक्षणानुसार विदर्भातील 11 जिल्ह्यांत 72 टक्के पुरुष कंडोम वापर होते. आता 78% प्रौढ कंडोमचा वापर करत आहेत.  नागपूर शहर बर्थ कंट्रोलमध्ये अव्वल आहे. जिथं 84 टक्के लोक गर्भनिरोधकांचा वापर करत आहेत. 3 वर्षांत याठिकाणी कंडोमचा वापर दुपटीने वाढला आहे. 7.1 टक्क्यांवरून 14.1 टक्के झाला आहे. सर्वेक्षणानुसार, मोठ्या शहरांव्यतिरिक्त, लहान शहरं आणि गावांमध्ये सुरक्षित सेक्ससाठी कंडोमचा वापर वाढला आहे. हे वाचा - BreaK-Up: ब्रेकअप झालाय? दुःखातून सावरण्यासाठी उपयोगी पडतील 'या' टिप्स मुख्य म्हणजे पुरुषांचा हा कल वाढला आहे, नंतर महिलांमध्ये तो कमी झाला आहे. विदर्भात महिलांनी गर्भनिरोधक गोळ्या घेण्याचं प्रमाण घटलं आहे. 2016 मध्ये हा आकडा 2.4 टक्के होता, तो आता 1.7 टक्क्यांवर आला आहे. म्हणजे महिला गर्भनिरोधक गोळ्या घेणं टाळत आहेत.
First published:

Tags: Lifestyle

पुढील बातम्या