Home /News /lifestyle /

फक्त 2 महिने तुमची SEX LIFE शेअर करा आणि दीड लाख रुपये मिळवा; कपलसाठी कंपनीची ऑफर

फक्त 2 महिने तुमची SEX LIFE शेअर करा आणि दीड लाख रुपये मिळवा; कपलसाठी कंपनीची ऑफर

आतापर्यंत तुमच्या सेक्शुअल लाइफमध्ये (sexual life) काही समस्या असल्यावर तुम्ही त्या डॉक्टरांसोबत शेअर केल्या आहेत. त्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागले आहेत. मात्र एक कंपनीनं इथं तुम्हाला पैसे देणार आहे, यामागे काय कारण आहे वाचा सविस्तर.

पुढे वाचा ...
    लंडन, 09 नोव्हेंबर : लैंगिक आयुष्य (Sexual life) हे खासगी असतं. प्रत्येक कपल हे क्षण एकमेकांसोबतच शेअर करत असतात. लैंगिक आयुष्यात काही समस्या असल्यास त्या डॉक्टरांना सांगितल्या जातात, ज्यावर उपचार करण्यासाठी तुम्हाला डॉक्टरांना पैसे द्यावे लागतात. मात्र आता तुमचं असं सेक्स लाइफ शेअर करण्यासाठी एक कंपनी तुम्हाला तब्बल दीड लाख रुपये देणार आहे. कोरोनाव्हायरसच्या या काळात लोकांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम तर झालाच आहे. त्यासोबत लैंगिक आरोग्यावर परिणाम झाला आहे. यूकेतल्या एका वेबसाईटनं सर्वेक्षण केलं.  ज्यामध्ये 18 ते 60 वयोगटातील  2000 कपल्सचा समावेश होता. त्यापैकी 52 कपल्सनी कोरोनाव्हायरसमुळे आपल्या लैंगिक आयुष्यावर नकारात्मक परिणाम झाल्याचं सांगितलं. आज तकच्या रिपोर्टनुसार यूकेतल्या या कंपनीनं आपल्या वेबसाईटवर जारी केलं की, अशा कपल्ससाठी आम्हाला काहीतरी वेगळं करायचं आहे. या कपल्सनी असे फळ, भाज्या, झाडं, वनौषधींची यादी कंपनीला द्यायची आहे, जी त्यांच्या सेक्शुअल लाइफसाठी सर्वात जास्त फायद्याची ठरली. हे वाचा - ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये होणार बदल; लिंगभेद करणारे हे शब्द काढले जाणार कंपनीला अशा तीन कपल्सचा शोध आहे. प्रत्येक कपलला दोन महिन्यांसाठी एक प्रोडक्ट पॅकेज दिलं जाईल. हे प्रोड्कट त्यांना वापरून पाहावं लागेल. याशिवाय टूल्स, गाइडलाइन्स आणि रेसिपीदेखील या लोकांसह शेअर केली जाईल. या प्रोडक्टमुळे त्यांच्या सेक्शुअल लाइफवर काय परिणाम झाला हे त्यांना सांगवं लागेल. यामध्ये कपल्स कधी आणि किती वेळा इंटिमेच झाले, कोणत्या प्रोडक्टमुळे त्यांची लैंगिक क्षमता वाढण्यास मदत झाली इत्यादी बाबींचा समावेश असेल. हे वाचा - या मुस्लीम देशात Live in relationship ला परवानगी, दारूवरचे निर्बंध शिथिल टेस्टिंगसाठी दोन महिन्यांचा कालावधी असेल. दोन महिन्यांनंतर त्या कपलला प्रोडक्टबाबत आपला अनुभव कंपनीकडे शेअर करावा लागेल. त्यानंतर या कपलला जवळपास दीड लाख रुपये दिले जातील. फक्त तीन दाम्पत्यांना ही संधी दिली जाणार आहे. त्यांच वय 25 ते 60 वर्षे असावं, अशी कंपनीची अट आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Health, Lifestyle, Sexual health

    पुढील बातम्या