कोरोनाचा कोरोनाशी लढा; गंभीर विषाणूला रोखतोय Common cold corona

कोरोनाचा कोरोनाशी लढा; गंभीर विषाणूला रोखतोय Common cold corona

कॉमन कोल्ड कोरोनाव्हायरसमुळे (Common Cold Coronavirus) निर्माण झालेली रोगप्रतिकारक शक्ती SARS-CoV-2 ची तीव्रता कमी करू शकते, असं संशोधनात दिसून आलं आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, 08 ऑक्टोबर : Covid-19 हा आजार जगभर थैमान घालतो आहे. आधीपासूनच मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा दमा, अस्थमा असे श्वसनसंबंधी इतर आजार असलेल्या रुग्णांवर या आजाराचा सर्वात जास्त परिणाम होऊ शकतो. त्यांच्यातील लक्षणं अधिक तीव्र होतात. त्यांची प्रकृती गंभीर होते आणि इतर रुग्णांच्या तुलनेत मृत्यूचा धोकाही या रुग्णांना जास्त असतो. मात्र ज्या लोकांना आधी एका सामान्य सर्दीसाठी कारणीभूत ठरणाऱ्या कोरोनाव्हायरसची लागण झाली असेल, त्यांना Covid-19 होतो मात्र तो गंभीर रूप घेत नाही. म्हणजे अशा रुग्णांची प्रकृती गंभीर होत नाही, असं नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात दिसून आलं आहे.

SARS-CoV-2 हा नवा व्हायरस आहे. अशा प्रकारचे बरेच कोरोनाव्हायरस आहे, ज्यामुळे कॉमन कोल्ड आणि न्यूमोनिया होता. कॉमन कोल्ड कोरोनाव्हायरस Covid-19 साठी कारणीभूत ठरणाऱ्या SARS-CoV-2 ची तीव्रता कमी करतो. असं एका संशोधनात दिसून आलं आहे. अमेरिकेतल्या शास्त्रज्ञांनी हा अभ्यास केला, ज्यामध्ये एका भारतीय शास्त्रज्ञाचाही समावेश आहे. जर्नल ऑफ क्लिनिकल इनव्हिस्टीगेशन (Journal of Clinical Investigation) मध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

संशोधकांनी 18 मे 2015 आणि 11 मार्च 2020  या काळात कॉमन कोल्ड कोरोनाव्हायरसबाबत CRP-PCR चाचणी आणि  12 मार्च 2020 ते 12 जून 2020 या काळात SARS-CoV-2 चाचणीच्या डेटाचा अभ्यास केला. ज्या रुग्णांना कॉमन कोल्ड कोरोनाव्हायरस झाला होता अशा रुग्णांना कोव्हिड-19 झाल्यानंतर आयसीयू, व्हेटेलिशेनची गरज फारशी पडली नाही. तसंच अशा रुग्णांचं जगण्याचं प्रमाणही जास्त आहे, असं संशोधकांना दिसून आलं.

हे वाचा - काय म्हणताय! कोरोनाव्हायरसपासून घोडा वाचवणार माणसांचा जीव; ट्रायलसाठी मंजुरी

अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठातील अभ्यासक मनीष सागर यांनी सांगितलं, ज्यांना कॉमन कोल्ड कोरोनाव्हायरसचं इन्फेक्शन झालं होतं, त्यांच्याम्ये कोव्हिड-19 ची कमी गंभीर लक्षणं दिसून आली.

कॉमन कोल्ड कोरोनाव्हायरस SARS-CoV-2 सह काही जेनेटिक सिक्वेन्स शेअर करतं. ज्यामुळे कॉमन कोल्ड कोरोनाव्हायरसमुळे निर्माण झालेली रोगप्रतिकारक शक्ती  SARS-CoV-2 ला विरोध करू शकते. असं संशोधक म्हणाले.

हे वाचा - श्वान आणि मांजरापासून कोरोना पसरतो? माणसाला त्यांच्यापासून किती धोका?

ज्यांना आधी  non-SARS-CoV-2 कोरोनाव्हायरसचं इन्फेक्शन झालं असेल तर Covid-19 आजारापासून संरक्षण मिळतं असं नाही हेदेखील शास्त्रज्ञांनी स्पष्ट केलं आहे. पण Covid-19 विरोधातील लस विकसित करण्यात या अभ्यासाचा फायदा होईल, अशी आशा शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.

Published by: Priya Lad
First published: October 8, 2020, 9:28 AM IST

ताज्या बातम्या