मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Mission Paani : देश संरक्षणानंतर आता पाण्यासाठी लढा; पुण्यातील निवृत्त कर्नल बनलेत जलदूत

Mission Paani : देश संरक्षणानंतर आता पाण्यासाठी लढा; पुण्यातील निवृत्त कर्नल बनलेत जलदूत

महाराष्ट्रातील असलेले निवृत्त कर्नल एस. जी. दळवी. (Colenel S. G. Dalvi - Retd.) हे भारतीय हवामान वास्तव प्रकल्पात जलसंधारणासाठी राष्ट्रीय समन्वयक आहेत.

महाराष्ट्रातील असलेले निवृत्त कर्नल एस. जी. दळवी. (Colenel S. G. Dalvi - Retd.) हे भारतीय हवामान वास्तव प्रकल्पात जलसंधारणासाठी राष्ट्रीय समन्वयक आहेत.

महाराष्ट्रातील असलेले निवृत्त कर्नल एस. जी. दळवी. (Colenel S. G. Dalvi - Retd.) हे भारतीय हवामान वास्तव प्रकल्पात जलसंधारणासाठी राष्ट्रीय समन्वयक आहेत.

पुणे, 25 जानेवारी: ग्रामीण भागात पाणीटंचाई (Water Scarcity) असेल, तर तिथल्या नागरिकांवर अत्यंत वाईट परिस्थिती ओढवते. नैसर्गिक स्रोत (Natural Resources) आटत चाललेले असताना अशा समस्या सोडवण्यासाठीचा हमखास मार्ग म्हणजे नैसर्गिक स्रोतांचं संवर्धन (Conservation). त्यापैकीच एक म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग (Rainwater Harvesting) अर्थात पर्जन्य जलसंचय. जलस्रोतांच्या संवर्धनासाठीची ही पद्धत कित्येक दशकं आपल्याला माहिती आहे. मात्र अद्यापही ती पूर्ण क्षमतेनं वापरली जात नाही. भारतातल्या अनेक गावांचं जीवन रेनवॉटर हार्वेस्टिंगद्वारे समृद्ध करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे (निवृत्त) कर्नल एस. जी. दळवी. (Colenel S. G. Dalvi - Retd.) 'क्लायमेट रिअॅलिटी प्रोजेक्ट ऑफ इंडिया'मध्ये जलसंवर्धन या विषयाचे राष्ट्रीय समन्वयक असलेल्या कर्नल दळवी यांनी शेकडो गावांमधली पाण्याची पातळी वाढण्यासाठी सातत्यपूर्ण काम केलं आहे. ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई असलेल्या राज्यांपैकी एक राज्य म्हणजे महाराष्ट्र (Maharashtra). एकट्या पुण्याचंच (Pune) उदाहरण घ्यायचं झालं, तर सलग दोन वर्षं पुणे महानगरपालिकेने उन्हाळ्यातल्या महिन्यात पाणीटंचाईमुळे कपात केली  होती. साधारण 2000 सालापासून ही समस्या तीव्र होऊ लागली. त्यामुळे 2007 पासून नव्या सरकारी आणि खासगी इमारतींना रेनवॉटर हार्वेस्टिंग सक्तीचं करण्यात आलं. मात्र त्याची अंमलबजावणी होते आहे की नाही, हे तपासणारी यंत्रणा तोकडी होती. हार्पिक-न्यूज18च्या पुढाकाराने राबवल्या जात असलेल्या 'मिशन पानी'अंतर्गत दिलेल्या मुलाखतीत कर्नल दळवींनी या पाणीसमस्येबद्दल सांगितलं. नीती आयोगाच्या आकडेवारीनुसार, 600 दशलक्ष भारतीयांना तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावं लागतं. गरजू नागरिकांना पाणीपुरवठा करता करता हे सोयीस्करपणे विसरलं जातं, की पाणी आपल्या छपरावर अगदी मोफत उपलब्ध होत असतं, असं दळवी म्हणाले. पावसाचं पाणी साठवणं हा उत्तम उपाय आहे. मात्र पाऊस सगळीकडे सारख्याच प्रमाणत पडत नाही. काही ठिकाणी पूर येतो, तर काही ठिकाणं अगदी ऐन पावसाळ्यातही पावसाची चातकासारखी वाट पाहत असतात. हे वाचा - Mission Paani: भारतातल्या मुबलक पाण्याचा सर्वोत्तम वापर कसा करता येईल? घ्या जाणून कर्नल दळवी यांनी पुण्यातल्या त्यांच्या प्रकल्पाचं उदाहरण दिलं. पुण्याचा सरासरी पाऊस 750 मिलिमीटर आहे. मुंबईला 2500 मिलिमीटर पाऊस पडतो. पुण्यातल्या एका छोट्या गावातल्या घराचं छप्पर 1000 चौरस फूट आकाराचं असेल, तर तेवढ्या जागेतून दर वर्षी 60 हजार लीटर पाणी साठवता येऊ शकतं. मुंबईत तर तेवढ्याच आकाराच्या छपरावरून वर्षभरात तब्बल अडीच लाख लीटर पाणी साठवता येऊ शकतं. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, पाणी आणि स्वच्छता हा मानवाचा हक्क आहे. त्यानुसार माणसाला चांगलं, स्वच्छ आयुष्य जगण्यासाठी आणि त्याच्या शरीरासाठी दिवसाला एकूण 100 लीटर पाणी लागतं. काही संस्थांच्या मते हे प्रमाण प्रति दिन 135 लिटर आहे.  हे वाचा -  Republic Day 2021 : प्रजासत्ताक दिनाला का वाजवतात Christian hymn? मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांत तसंच आजूबाजूच्या ग्रामीण भागात भूजल हा पर्याय आता उरलेला नाही. आता हे भाग धरणं आणि तलावांवर पाण्यासाठी अवलंबून आहेत. ही धरणं आणि तलाव पावसाच्या पाण्याने भरतात मात्र त्यांची क्षमता संपली की त्यापेक्षा जास्त पाणी त्यात साठवता येत नाही. त्यामुळे शहरातल्या प्रत्येकाची गरज भागवण्याएवढं पाणी महापालिकेकडे किंवा तिथल्या सरकारी यंत्रणेकडे उरत नाही. याचा सर्वाधिक फटका गरिबांना बसतो. कारण खासगी टँकर्स त्यांना परवडत नाहीत. या पार्श्वभूमीवर, कर्नल दळवी यांचं कार्य वेगळं, बदल घडवणारं आहे. कामखेडा (KaamKheda) या गावात आता बरंच पाणी शिल्लकही असून, त्यांचे विद्यार्थी ते पाणी शाळेतल्या झाडांनाही घालतात, असं त्यांनी सांगितलं. गावकरी त्यांच्या प्रति कृतज्ञ आहेत आणि त्यांना जलदूत किंवा पर्जन्यमानव म्हणतात. लोकांनी कामखेडा या गावाचा आदर्श घेऊन प्रतिज्ञा घ्यावी, असं आवाहन कर्नल दळवी लोकांना करतात. जर ते गाव पाण्यासाठी आत्मनिर्भर बनू शकतं, तर सगळीच गावं ते उद्दिष्ट साध्य करू शकतात, असं ते म्हणतात. हार्पिक-न्यूज18च्या मिशन पानी या मोहिमेत सहभागी व्हा, पाणी वाचवण्याची शपथ घ्या आणि वॉटरथॉनचे सगळे अपडेट्स इथे मिळवा.
First published:

Tags: India, Indian army

पुढील बातम्या