Home /News /lifestyle /

मानसिक आजार असलेल्यांना COVID-19 चा धोका; बळावतोय गंभीर कोरोना

मानसिक आजार असलेल्यांना COVID-19 चा धोका; बळावतोय गंभीर कोरोना

मेंदूसंबंधी आजारांमुळे कोविड-19 (covid-19) आजार अधिक गंभीर होण्याचा धोका वाढतो, असं नव्या संशोधनात दिसून आलं आहे.

    वॉशिंग्टन, 30 ऑक्टोबर : मधुमेह किंवा इतर आजार असल्यास कोरोनाव्हायरसचा (coronavirus) धोका जास्त आहे. अशा रुग्णांना कोरोनाची लागण झाल्यास त्यांना गंभीर स्वरूपाचा कोरोना होतो आणि आता नव्या संशोधनानुसार मानसिक आजार किंवा मेंदूसंबंधी समस्या असलेल्या रुग्णांनाही गंभीर स्वरूपाच्या covid-19 चा धोका आहे, असं दिसून आलं आहे. अमेरिकेतील जॉर्जिया विद्यापीठातील संशोधकांनी अभ्यास केला. ब्रेन बिहेव्हियर अँड इम्युनिटी या जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. डिमेन्शिया आणि मेंदूसंबंधी आजारांमुळे कोविड-19 आजार अधिक गंभीर होण्याचा धोका वाढतो, असा दावा संशोधकांनी केला आहे. संशोधकांनी जवळपास 1000 रोगांसंबंधी डेटाचा अभ्यास केला. हा डेटा यूके बायोबँकेकडून घेतला होता. यात त्यांनी कोविड 19 झालेले रुग्ण आणि न झालेले लोक यांच्या जीन्समध्ये काय साम्य आहे याची तुलना केली.  जेनेटिक फॅक्टरशी संबंधित अभ्यासातून लक्षात आलं की काही जणांना गंभीर covid-19 होण्याचा धोका आहे. संशोधकांनी  ACE2 आणि TPMPRSS2 जिन्सवर लक्ष केंद्रीत केलं. TPMPRSS2 या जिनमध्ये विशिष्ट जेनेटिक व्हेरिएशन जास्त दिसून आलं. जिन्समध्ये होणाऱ्या या बदलांचा संबंध गंभीर covid-19 होण्याशी असू शकतो त्यामुळे रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येते. हे वाचा - संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी तयार केला अॅडवान्स फेस मास्क; काय आहे खासियत? संशोधनाचे अभ्यासक कायझियाँग ये यांनी सांगितलं, आम्ही हायपोथेसिस फ्री ॲप्रोचने पाहिल्यावर दिसलं की संख्यात्मक दृष्टिकोनातून मानसिक आजार आणि टाईप टू डायबिटिज यांचं प्रमाणात जास्त आहे. सध्या तरी आम्हाला यातील नेमका संबंध माहिती नाही. फक्त इतकंच माहीत आहे की covid-19 च्या रुग्णांमध्ये ही अधिकच सामान्य समस्या आहे. त्यामुळे आधीपासून मानसिक आजार आहेत त्यांची महासाथीच्या काळात अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. हे वाचा - हर्ड इम्युनिटी कुचकामी; दुसऱ्यांदा Covid झालेल्या शास्त्रज्ञाचा दावा SARS-coV-2 संसर्गाची संबंधित आता या बाबतीत अधिक डेटा टीमने जमा केला आहे आणि त्यानुसारच पुढचा अभ्यास केला जाणार आहे, असं संशोधकांनी सांगितलं.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या