तुम्हाला महाभयंकर आजारापासून वाचवू शकते Coffee

तुम्हाला महाभयंकर आजारापासून वाचवू शकते Coffee

जितके कप कॉफी (coffee) तुम्ही प्याल तितका या आजाराचा धोका कमी होतो, असा दावा संशोधकांनी केला आहे.

  • Share this:

बीजिंग, 13 जानेवारी : तुम्हाला दररोज हटकून कॉफी (Coffee) प्यावीशी वाटते का? तसं असेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. दररोज अनेक कप कॉफी पिणाऱ्यांना प्रोस्टेट ग्रंथीचा कॅन्सर (Prostate Cancer) होण्याचा धोका कमी असू शकतो, असं एका ताज्या अभ्यासातून स्पष्ट झालं आहे. बीएमजे ओपन या जर्नलमध्ये या अभ्यासाविषयीचा लेख प्रसिद्ध झाला आहे.

चायना मेडिकल युनिव्हर्सिटीमधील (China Medical University) शेनजिअँग हॉस्पिटलमधील युरॉलॉजी विभागातील शिओनान चेन यांनी सांगितलं, की कॉफी पिण्याचा आणि प्रोस्टेट कॅन्सर होण्याचा धोका कमी होण्याचा एकमेकांशी संबंध असल्याचं अभ्यासात आढळलं आहे. रोजचा कॉफीच्या कपची संख्या जसजशी वाढते, तसतसा प्रत्येक कपासोबत कॅन्सरचा धोका सुमारे एका टक्क्याने कमी होत जातो, असंही या अभ्यासात आढळलं.

प्रोस्टेट कॅन्सर हा कॅन्सरच्या सर्वांत जास्त आढळणाऱ्या प्रकारांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसंच पुरुषांच्या मृत्यूच्या प्रमुख कारणांमध्ये प्रोस्टेट कॅन्सर हे सहाव्या क्रमांकाचं कारण आहे. प्रोस्टेट कॅन्सरच्या साधारणतः दर चारपैकी तीन रुग्ण विकसित देशांत आढळतात. तसंच 1970 च्या दशकापासून जपान, सिंगापूर, चीन यांसह अनेक आशियायी देशांमध्ये प्रोस्टेट कॅन्सरच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे.

हे वाचा - प्रोसेस्ड फूडमुळे येऊ शकतो लवकर मृत्यू; आरोग्यावर होणारे घातक परिणाम आले समोर

याबाबत अधिक अभ्यास करून तो समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी सप्टेंबर 2020 पर्यंत प्रकाशित झालेल्या अशा प्रकारच्या अभ्यासांतल्या माहितीचं विश्लेषण केलं. कॉफीचं जास्त प्रमाण असणाऱ्यांमध्ये प्रोस्टेट कॅन्सर होण्याचा धोका किती असतो आणि कमी असणाऱ्यांमध्ये किती असतो, याचा तुलनात्मक अभ्यास त्यात करण्यात आला. उत्तर अमेरिकेतल्या सात, युरोपातल्या सात आणि जपानमधल्या दोन अभ्यासांचा समावेश होता. त्यात 10 लाख 81 हजार 586 पुरुषांचा समावेश होता. त्यापैकी 57 हजार 732 जणांना प्रोस्टेट कॅन्सर झाला. प्रतिदिन सर्वांत जास्त कॉफी पिणाऱ्यांचं प्रमाण दोन ते नऊ कप एवढं होतं, तर सर्वांत कमी कॉफी पिणाऱ्यांचं प्रमाण शून्य ते दोन कप होतं.

कमी कॉफी पिण्याऱ्यांशी तुलना करता, जास्त कॉफी पिण्याऱ्यांमध्ये प्रोस्टेट कॅन्सर होण्याचा धोका नऊ टक्क्यांनी कमी होता, असं आढळलं. तसंच दररोज एका कपाची वाढ होती गेली, तर वाढलेल्या प्रत्येक कपासोबत प्रोस्टेट कॅन्सरचा धोका एका टक्क्याने कमी होत होता, असं आढळलं.

हे वाचा - Bird Flu चा धोका; चिकन आणि अंडी खाणं सुरक्षित आहे का?

कॉफी प्यायल्यानं यकृत, आतडी आणि स्तनाचा कॅन्सर होण्याचा धोकाही कमी होऊ शकतो. मात्र प्रोस्टेट कॅन्सरप्रमाणे त्याबाबत अद्याप ठोस निष्कर्ष काढण्यात आलेला नाही, असंही शास्त्रज्ञांनी स्पष्ट केलं आहे.

Published by: Priya Lad
First published: January 13, 2021, 8:35 AM IST

ताज्या बातम्या