मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

`हे` नैसर्गिक पेय आहे अतिशय आरोग्यदायी; झटपट वजन कमी करण्यापासून निरोगी त्वचेपर्यंत अनेक फायदे

`हे` नैसर्गिक पेय आहे अतिशय आरोग्यदायी; झटपट वजन कमी करण्यापासून निरोगी त्वचेपर्यंत अनेक फायदे

पोट आणि कमरेच्या भागात चरबी वाढू लागली तर ती कमी करणं मोठं अवघड काम असतं. अशावेळी लोक जिममध्ये वर्कआउट करणं, धावणं यासारखे व्यायाम आणि काटेकोर आहाराची मदत घेतात.

पोट आणि कमरेच्या भागात चरबी वाढू लागली तर ती कमी करणं मोठं अवघड काम असतं. अशावेळी लोक जिममध्ये वर्कआउट करणं, धावणं यासारखे व्यायाम आणि काटेकोर आहाराची मदत घेतात.

पोट आणि कमरेच्या भागात चरबी वाढू लागली तर ती कमी करणं मोठं अवघड काम असतं. अशावेळी लोक जिममध्ये वर्कआउट करणं, धावणं यासारखे व्यायाम आणि काटेकोर आहाराची मदत घेतात.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 21 जुलै : बदलती जीवनशैली, बैठं काम, व्यायामाचा अभाव, चुकीचा आहार, अनुवंशिकता आणि काही आजारांमुळे लठ्ठपणाची (Obesity) समस्या वाढत आहे. सध्याच्या काळात अनेक तरुण वाढत्या वजनाच्या (Weight Gain) समस्येमुळे त्रस्त आहे. लठ्ठपणामुळे हृदयविकार (Heart Disease), डायबेटिस (Diabetes) सारखे आजार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. परंतु, पोट आणि कमरेच्या भागात चरबी वाढू लागली तर ती कमी करणं मोठं अवघड काम असतं. अशावेळी लोक जिममध्ये वर्कआउट करणं, धावणं यासारखे व्यायाम आणि काटेकोर आहाराची मदत घेतात. पण यामुळे देखील वजनात लगेच फरक दिसतोच असं नाही. वजन कमी करण्यासाठी काही खास उपाय करणंही गरजेचं असतं.

नारळाचं अर्थात शहाळ्याचं पाणी (Coconut Water) हा वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो, असं तज्ज्ञांचं मत आहे. `झी न्यूज हिंदी`ने याविषयीची माहिती दिली आहे.

पावसाळ्यात आईस्क्रीम खाणं ठरू शकतं अनेक समस्यांना आमंत्रण, काय होतात दुष्परिणाम?

``लठ्ठपणा ही आजच्या काळातली सर्वात गंभीर समस्या आहे. वजन कमी करण्यासाठी आहारमध्ये काही बदल करणं आवश्यक असतं. रोज पोषक आहारासोबत नारळाचं पाणी प्यायल्यास वजन कमी होण्यास मदत होते,`` असं ग्रेटर नोएडा येथील जीआयएमएस रुग्णालयातील प्रसिद्ध डाएटिशियन डॉ. आयुषी यादव यांनी सांगितलं.

नारळाच्या पाण्यात कॅलरीज (Calories) कमी असतात. तसंच पोटॅशियम आणि नैसर्गिक एंझाइम्स (Natural Enzyme) मुबलक असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी पिणं फायदेशीर ठरू शकतं. तुम्ही दिवसातून तीन ते चार वेळा नारळ पाणी पिऊ शकता. परंतु, वजन कमी करण्याच्या उद्देशानं तुम्ही हे नैसर्गिक पेय (Natural Drink) सकाळी उठल्यावर रिकाम्यापोटी पिणं अधिक फायदेशीर ठरतं. यामुळे मॉर्निंग सीकनेस आणि हार्टबर्नसारख्या समस्या दूर होतात. नारळाच्या पाण्यात लॉरिक अ‍ॅसिड मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे शरीरातली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

दारू वाईट मित्रा, ‘या’ वयातील लोकांना सर्वाधिक धोका, संशोधकांनी दिला इशारा

नारळ पाणी रोजच्या आहारात समाविष्ट करणं आवश्यक आहे. पोटाच्या आरोग्यासाठी हे पेय फायदेशीर ठरतं. यातील बायोअ‍ॅक्टिव्ह एंजाइम्समुळं पचन आणि मेटाबॉलिझम (Metabolism) उत्तम राहतं. नारळ पाणी प्यायल्यानं लवकर भूक लागत नाही. त्यामुळे जेवण कमी जातं आणि हळूहळू वजन कमी होतं.

``रोज नारळ पाणी प्यायल्यानं तुम्हाला ऊर्जादायी वाटेल. खरंतर दिवसभरात कोणत्याही वेळी हे पाणी तुम्ही पिऊ शकता. यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. नारळ पाण्यामुळं त्वचेचं आरोग्य सुधारतं. वजन कमी करण्यासाठी योग्य वेळी हे पाणी प्यायल्यास उत्तम परिणाम दिसून येतात,`` असं डॉ. यादव यांनी सांगितलं.

First published:

Tags: Health Tips, Weight loss