मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

कोकोनट व्हिनेगरचे फायदे माहित आहेत? रक्तातील साखर नियंत्रित आणि हृदय ठेवते निरोगी

कोकोनट व्हिनेगरचे फायदे माहित आहेत? रक्तातील साखर नियंत्रित आणि हृदय ठेवते निरोगी

असे म्हटले जाते यामुळेच कोकोनट व्हिनेगर ते अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगरपेक्षा एक चांगला पर्याय बनते. कोकोनट व्हिनेगरचे असंख्य फायदे आहेत.

असे म्हटले जाते यामुळेच कोकोनट व्हिनेगर ते अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगरपेक्षा एक चांगला पर्याय बनते. कोकोनट व्हिनेगरचे असंख्य फायदे आहेत.

असे म्हटले जाते यामुळेच कोकोनट व्हिनेगर ते अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगरपेक्षा एक चांगला पर्याय बनते. कोकोनट व्हिनेगरचे असंख्य फायदे आहेत.

  • Published by:  Pooja Jagtap
मुंबई, 9 ऑगस्ट : नारळाचे पाणी फर्मेन्ट करून हे नारळ व्हिनेगर म्हणजेच कोकोनट व्हिनेगर तयार केले जाते. फर्मेंटेशन प्रक्रियेमुळे यामध्ये प्रोबायोटिक्स वाढतात जे आपल्या आतड्याच्या आरोग्यासाठी उत्तम असतात. यामध्ये अधिक जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर आवश्यक घटक असतात. असे म्हटले जाते यामुळेच कोकोनट व्हिनेगर ते अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगरपेक्षा एक चांगला पर्याय बनते. कोकोनट व्हिनेगरचे असंख्य फायदे आहेत. वजन कमी करते कोकोनट व्हिनेगर वजन कमी करण्यासाठी वापरले जाते. कारण ते शरीरातील दाह कमी करते ज्यामुळे वजन वाढते. अ‍ॅसिटिक अ‍ॅसिडने समृद्ध असलेले हे कोकोनट व्हिनेगर भूक नियंत्रित ठेवण्यास मदत करते आणि त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

Health Tips : चहाबरोबर नमकीन खाणं आरोग्यासाठी किती चांगलं?, घ्या जाणून

त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत करते कोकोनट व्हिनेगर मुरुमांशी लढण्यास मदत करते आणि डोळ्यांखालील काळी वर्तुळे, त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करते. त्यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्वचेच्या या समस्या टाळण्यासाठी इतर व्हिनेगरऐवजी कोकोनट व्हिनेगरला प्राधान्य द्यावे. रक्तातील साखर नियंत्रित करते कोकोनट व्हिनेगरमध्ये अ‍ॅसिटिक अ‍ॅसिड असते, जे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते आणि टाइप 2 मधुमेहाच्या रूग्णांना थोडा आराम देते. हृदय निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर कोकोनट व्हिनेगर पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, झिंक, बोरॉन, कॉपर, मॅग्नेशियम, मॅंगनीज, कोलीन, बी जीवनसत्त्वे, फॉस्फरस आणि लोह यांसारख्या पोषक तत्वांनी समृद्ध असते. त्याचबरोबर ते हृदयासाठी चांगले असते. Foods to avoid for diabetes : फक्त गोड खाणं सोडून फायदा नाही; डायबेटिज रुग्णांनी 'हे' पदार्थही खाऊ नयेत पचनक्रिया सुधारते कोकोनट व्हिनेगर पचनक्रिया सुरळीत करण्यास मदत करते आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवू शकते. यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स तुमच्या आतड्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर बॅक्टेरिया आहेत. तसेच यात असलेले अ‍ॅसिटिक अ‍ॅसिडची अनेक हानिकारक व्हायरस आणि बॅक्टेरिया काढून टाकण्यास मदत करते.
First published:

Tags: Health Tips, Lifestyle

पुढील बातम्या