• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • कोरडी, निस्तेज त्वचा बनेल तजेलदार; स्वयंपाकघरातल्या पदार्थांपासून बनवलेल्या घरगुती स्क्रबचा करा वापर

कोरडी, निस्तेज त्वचा बनेल तजेलदार; स्वयंपाकघरातल्या पदार्थांपासून बनवलेल्या घरगुती स्क्रबचा करा वापर

हा स्क्रब अगदी कमी खर्चात घरी सहज तयार करता येतो. त्याचा वापर केल्यानं तुमचं शरीराची त्वचाही चेहऱ्याप्रमाणेच सुंदर होईल. यासह याचे आणखीही बरेच फायदे आहेत. चला तर मग, जाणून घेऊ हा बॉडी स्क्रब कसा बनवायचे आणि कसा वापरायचा.

 • Share this:
  नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर : चेहऱ्याचं सौंदर्य (Beauty) वाढवण्यासाठी लोक दररोज काही ना काही पद्धतींचा अवलंब करतात. कधीकधी रासायनिक बेस असलेली सौंदर्य उत्पादनंही वापरली जातात. मात्र, त्यांचा वापर योग्य प्रकारे न केल्यास विविध समस्यांना सामोरं जावं लागतं. चेहऱ्यासाठी कधी वेगवेगळे घरगुती उपचारही केले जातात. मात्र, केवळ चेहऱ्याच्या सौंदर्याकडं लक्ष देण्याच्या नादात शरीराच्या सौंदर्याकडे (Beauty) विशेष लक्ष दिलं जात नाही. यामुळं शरीराची त्वचा कोरडी आणि निर्जीव होऊ लागते. यासाठी जितकी चेहऱ्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे, तितकंच शरीराच्या त्वचेची काळजी घेणंही महत्त्वाचं आहे. शरीराचं सौंदर्य वाढवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला नारळ-गुलाब-साखर यांच्या स्क्रबबद्दल (Body Scrub) सांगणार आहोत. हा स्क्रब अगदी कमी खर्चात घरी सहज तयार करता येतो. त्याचा वापर केल्यानं तुमचं शरीराची त्वचाही चेहऱ्याप्रमाणेच सुंदर होईल. यासह याचे आणखीही बरेच फायदे आहेत. चला तर मग, जाणून घेऊ हा बॉडी स्क्रब कसा बनवायचे आणि कसा वापरायचा. असा तयार करा बॉडी स्क्रब बॉडी स्क्रब बनवण्यासाठी आधी कोरडं खोबरं मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पूड बनवा. नंतर एका वाडग्यात ही पूड एक कप घ्या आणि त्यात एक चमचा साखर आणि तेवढ्याच प्रमाणात खोबरेल तेल मिसळा. नंतर त्यात दोन चमचे गुलाबपाणी घाला. आता त्यात एसेंशियल ऑईलचे काही थेंब मिसळा. सर्व मिश्रण एकजीव करा. हा तुमचा कोकोनट-रोझ-शुगर स्क्रब तयार आहे. हे वाचा - Bigg Boss 15:बिग बॉसच्या घरात हास्याचा तडका लावणारी तेजस्वी प्रकाश रियल लाईफमध्ये आहे फारच ग्लॅमरस, पाहा फोटो असा करा वापर खोबरं-गुलाब-साखरेचा स्क्रब संपूर्ण शरीरावर लावा. नंतर हलक्या हातानं गोलाकार फिरवत सुमारे दहा मिनिटं शरीरावर मसाज करा. शरीराच्या इतर भागांपेक्षा मान, कोपर, गुडघे, घोटे आणि टाचांवर तो जास्त वेळ घासा. यानंतर, पंधरा मिनिटं हा स्क्रब शरीरावर तसाच राहू द्या. मग साध्या पाण्यानं किंवा कोमट पाण्यानं आंघोळ करा. हा स्क्रब आठवड्यातून एकदा वापरता येईल. हे वाचा - औरंगाबाद मर्डर मिस्ट्री; रात्री घरात झाली प्रोफेसरची हत्या; पत्नीला मात्र सकाळी 7 वाजता आली जाग हे मिळतील फायदे या स्क्रबचा वापर केल्यानं शरीरावरील मृत त्वचा काढून टाकली जाते. तसंच शरीराच्या त्वचेचा ओलावा टिकवून ठेवला जातो. यामुळे त्वचा मऊ आणि तुकतुकीत होते. या स्क्रबच्या वापरानं त्वचेचा कोरडेपणा आणि काळपटपणाही दूर होतो. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञांशी संपर्क साधा.)
  Published by:News18 Desk
  First published: