मुंबई, 15 मे : कट्ट्यावरच्या गमतीजमतीत किंवा ज्येष्ठांच्या हास्यमैफलीत चहाशिवाय मजा नाही. अनेक किस्से घडण्यामागे चहा
(Tea) कारणीभूत असतो. चहाला काळ-वेळ पाहायची नसते, असं गमतीनं आपण म्हणतो. चहाबद्दल भरभरून बोलणारेही अनेक आहेत. कारण चहा हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. अशा चहाप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. चहा जास्त पिणं तब्येतीसाठी घातक आहे, असं वाटत असेल, तर नारळाच्या दुधाचा चहा पिऊन पाहा. नारळाचं दूध आणि ग्रीन टी वापरून बनवलेला चहा तब्येतीला फायदेशीर ठरू शकतो. 'झी न्यूज हिंदी'ने त्याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
सामान्यतः आपण म्हशीच्या किंवा गायीच्या दुधापासून चहा करतो. सध्या गायी-म्हशीच्या दुधाबाबतही अनेक समज-गैरसमज परसत आहेत. त्यात चहा पिणं वाईट असं मानणारा एक वर्ग आहे. त्यामुळे चहा का पिऊ नये, याबद्दलही मतमतांतरं आहेत. अशा वेळी चहा हवाच आहे, पण तो आरोग्यदायीही ठरला पाहिजे, असं वाटत असेल, तर नारळाच्या दुधाचा पर्याय वापरून पाहायला हरकत नाही. नारळाच्या दुधामध्ये मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, लोह (Iron), क जीवनसत्त्व अर्थात व्हिटॅमिन सी आणि फायबर्स असतात. त्यामुळे हे दूध अधिक आरोग्यदायी ठरतं.
कोविडसारख्या साथरोगानं जगाला प्रतिकारशक्तीचं
(Immunity) महत्त्व समजावून सांगितलं. चांगल्या प्रतिकारशक्तीसाठी क जीवनसत्त्वाची शरीराला गरज असते. नारळामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असतं. त्यामुळे नारळाच्या दुधाचा (Coconut Milk) चहा तुमची प्रतिकारशक्ती वाढवू शकतो, असं काही तज्ज्ञांना वाटतं.
आश्चर्य! एकाच वेळी प्रेग्नंट, डिलीव्हरीही एकाच दिवशी; जुळ्या बहिणींची मुलंही आता Same to Same
फळांमध्ये पाणी अधिक असल्यामुळे फळं शरीरासाठी उपयुक्त समजली जातात. नारळातही पाणी जास्त असल्यामुळे नारळाच्या दुधापासून बनवलेला चहा वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतो. या दुधामध्ये वजन वाढण्यासाठी कारणीभूत ठरणारे फॅट्स नष्ट करण्याचे गुणधर्म असतात. नारळ हे कमी कॅलरीज असणारं फळ आहे. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी नारळाचा खूप फायदा होतो. नारळाच्या दुधाचा चहा प्यायल्याने कोलेस्टेरॉल आणि उच्च रक्तदाबाची (High Blood Pressure) समस्या दूर होण्यास मदत होते. आपल्याकडे मसालेदार आणि तेलकट पदार्थ अधिक खाल्ले जातात, त्यामुळे हृदयरोग उद्भवण्याची शक्यता जास्त असते. अशा व्यक्तींनी नारळाच्या दुधाचा चहा घेतल्यास तो गुणकारी ठरू शकतो.
नारळाच्या दुधाचा चहा कसा बनवाल?
चहाच्या भांड्यात 4 कप पाणी उकळवा. त्यात ग्रीन टीच्या (Green Tea) 3 बॅग्ज घाला. पाव कप नारळाचं दूध घाला आणि 2 मोठे चमचे क्रीम घाला. सगळं मिश्रण हलवून मग टी बॅग्ज काढून टाका. हवी असल्यास 1 चमचा ब्राउन शुगर घालू शकता. अशा पद्धतीनं नारळाचं दूध आणि ग्रीन टी वापरून केलेला चहा तुमच्या जिभेला आणि पोटालाही उत्तम ठरेल.
आता चहा पिताना अपराधीपणा येत असेल, तर नारळाचं दूध वापरून चहा करून पाहा. यामुळे चहामुळे होणारे दुष्परिणाम टळतीलच, शिवाय तब्येतीच्या इतर तक्रारीही दूर होण्यास मदत होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.