Home /News /lifestyle /

तुम्ही झुरळांपासून तयार केलेलं औषध तर पित नाहीत ना? तात्काळ तपासा औषधाची बाटली

तुम्ही झुरळांपासून तयार केलेलं औषध तर पित नाहीत ना? तात्काळ तपासा औषधाची बाटली

जी कंपनी हे औषध बनवत आहे, ती इनग्रेडिएंट्समध्ये (ingredient) झुरळाचं वैज्ञानिक नाव लिहिते. झुरळांपासून तयार करण्यात आलेल्या औषधांच्या बाटलीवर Periplaneta americana जे एका cockroach च्या प्रजातीचं नाव आहे, ते लिहिलेलं असतं. झुरळांचं औषध पिणाऱ्या अनेकांना माहितीही नसतं की ते लोक काय पित आहेत.

पुढे वाचा ...
    बीजिंग, 27 जानेवारी : झुरळ पाहिलं की किळसवाणं वाटतं. जिथं cockroach तिथं आजाराचं साम्राज्य असं समजलं जातं. घरात झुरळं दिसताच त्यांना घराबाहेर काढण्यासाठी आपली धडपड सुरू होते. मात्र आजारी पाडणारी जी झुरळं आपल्याला नकोशी वाटतात, अशाच झुरळांची मुद्दामहून पैदास केली जाते आहे आणि तीदेखील औषधनिर्मितीसाठी. काय धक्का बसला ना. आजार पसरवणारी झुरळं चक्क आजारावर उपचार म्हणून औषधनिर्मितीसाठी वापरले जातात. तर होय चीनमध्ये औषधांसाठी झुरळांची पैदास केली जाते. चीनमधील फार्मास्युटिकल कंपनी करतेय झुरळांची पैदास हाँगकाँगच्या साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट (South China Morning Post - SCMP) नुसार, एक चिनी कंपनी यावर्षी जवळपास 6 अब्ज झुरळांची निर्मिती करते आहे. दक्षिण-पश्चिम चीनच्या Xichang शहरातील गुडडॉक्टर (Gooddoctor) ही फार्मास्युटिकल कंपनी झुरळांची पैदास करते आहे आणि या झुरळांना पाळते आहे. ही कंपनी जगातील सर्वात मोठी झुरळ पाळणारी कंपनी आहे. हेदेखील वाचा - अॅलर्जीपासून मुक्ती हवी, मग आहारात 'या' पदार्थांचा समावेश जरूर करा झुरळांपासून तयार केलं जातं औषध या झुरळांपासून एक विशिष्ट प्रकारचं द्रव्य तयार केलं जातं. हे द्रव्य चीनमधील बहुतेक लोकं विशेषत: वयस्कर व्यक्ती ज्यांना श्वसनप्रणालीसंबंधी समस्या किंवा पोटाचा काही आजार असेल, अशा व्यक्ती औषध म्हणून पितात चीन सरकारच्या एका अहवालानुसार 100 मिलीमीटरच्या एका बाटलीची किंमत जवळपास 285 रुपये आहे. झुरळांचं औषध पिणाऱ्या अनेकांना माहितीही नसतं की ते लोक काय पित आहेत. जी कंपनी हे औषध बनवत आहे, ती इनग्रेडिएंट्समध्ये झुरळाचं वैज्ञानिक नाव लिहितात. म्हणजे बाटलीवर Periplaneta americana जे एका झुरळाच्या प्रजातीचं नाव आहे, ते लिहिलेलं असतं. हेदेखील वाचा - वजन कमी करण्यासाठी डाएट करताय तर सावधान ! तज्ज्ञही सांगतात ‘हा’ डाएट करू नका झुरळांसाठी विशेष सोय जिथं या झुरळांना पाळलं जातं आहे, ती जागाही वैशिष्ट्यपूर्ण आहे. लाकडी बोर्ड त्यांचं घर आहे आणि खोलीत उबदारपणा आहे. झुरळांसाठी अनुकूल असं वातावरण आहे, जेणेकरून जास्तीत जास्त झुरळांची निर्मिती होईल. या झुरळांवर आर्टिफिशिअल इंटेलिजेंसच्या मदतीने 24 तास नजर ठेवली जाते. काही कारणामुळे झुरळं लॅबबाहेर पडलीच तर लॅबच्या आसपास पाणी आहे, जे झुरळांसाठी एकप्रकारे कुंपण आहे, जेणेकरून झुरळं थेट शहरात घुसणार नाहीत. हेदेखील वाचा - असा मेकअप कराल, तर खऱ्या वयापेक्षा 10 वर्षांनी लहान दिसाल ब्युटी इंडस्ट्रीमध्येही होणार झुरळांचा वापर द टेलिग्राफमधील एका मुलाखतीत शानडॉन्ग अॅग्रीकल्चर युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक लियू यूशेंग यांनी दावा केला आहे की, "किळसवाणे समजले जाणारे झुरळ खरंतर खूप फायदेशीर आहेत. यांच्यामुळे पेप्टीक अल्सर, अस्थमासारख्या आजारांवर उपचार करता येऊ शकता. हा उपचार स्वस्त आणि फायदेशीरदेखील आहे. ब्युटी इंडस्ट्रीमध्येही त्यांचा वापर करता येऊ शकतो का याबाबत संशोधन केलं जातं आहे. डाएट पिल्स आणि ब्युटी मास्कवर याचे प्रयोग सुरू आहेत.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Cockroach, Health, Lifestyle, Medicine

    पुढील बातम्या