Home /News /lifestyle /

हिवाळ्यात स्वस्त झाला कोंबडा, मात्र कोंबडीचे भाव का बरं वाढतायेत? वाचा सविस्तर

हिवाळ्यात स्वस्त झाला कोंबडा, मात्र कोंबडीचे भाव का बरं वाढतायेत? वाचा सविस्तर

हिवाळ्यामध्ये (Winter) अंड्यांची आणि चिकनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. रोस्टेड आणि फ्राईड चिकनची मागणीतही वाढ होते

    नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर : हिवाळ्यामध्ये (Winter) अंड्यांची आणि चिकनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. रोस्टेड आणि फ्राईड चिकनची मागणी देखील मोठ्या प्रमाणात वाढते. त्याचबरोबर कोंबड्यांच्या किंमतीतदेखील मोठी वाढ होते. लग्न समारंभांपेक्षा चिकनची मागणी ही हॉटेलमध्ये आणि फास्ट फूड कॉर्नरवर मोठ्या प्रमाणात असते. परंतु चिकनचे भाव काही पहिल्यांदाच वाढलेले नाहीत. चिकन मार्केट जाणकारांच्या मते हे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. कोंबडीचे भाव वाढणार आहेतच पण कोंबड्याच्या भावात मात्र मोठी भाववाढ होणार नाही. यूपी पोल्ट्री फार्म असोसिएशनचे अध्यक्ष नवाब अली यांच्या मते मागील वर्षी अंडी न देऊ शकणाऱ्या कोंबडीचा भाव हा 30 ते 40 रुपये किलोपर्यंत होता. परंतु यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे कोंबडीचा भाव 80 रुपये किलोपर्यंत वाढला आहे. या कोंबड्यांचा वापर लग्न समारंभ आणि हॉटेलमध्ये चिकन तयार करण्यासाठी होतो. परंतु यावर्षी अंडी देणारी कोंबडी बाजारात विक्रीसाठी आणलेली नाही. मागील वर्षीच्या तुलनेत त्यांचं खाद्य असलेल्या दाण्याचा भाव देखील कमी असल्याने कोणतीही अडचण नाही. जर कोंबडी 60 टक्के अंडी देत असेल तरीही धोका नसल्याने कोंबड्या बाजारात विक्रीसाठी काढत नाहीत. रोस्टेड आणि फ्राईड चिकनसाठी वापरले जाते ब्रॉयलर चिकन रेस्टोरंट संचालक हाजी अखलाक यांनी दिलेल्या माहितीनुसार, रोस्टेड आणि फ्राईड चिकन तयार करण्यासाठी ब्रॉयलर कोंबडा वापरला जातो. कोंबडीच्या तुलनेत कोंबड्याचे मांस मऊ असल्याने त्याचा वापर केला जातो. परंतु चवीच्या बाबतीत कोंबडी उत्तम असते. ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत ब्रॉयलर चिकनचा भाव हा 80 ते 85 रुपये किलोपर्यंत असतो. परंतु नोव्हेंबरच्या शेवटपर्यंत ब्रॉयलरची पिल्ले मोठी होत असल्याने चिकनचा भाव कमी होतो. यावर्षी ऑक्टोबर महिन्यात ब्रॉयलर चिकनचा भाव 120 किलो होता. सध्या तो 110 रुपयांपर्यंत असून कोरोनाच्या संकटात मोठ्या प्रमाणात कोंबडा-कोंबडी मेल्याने भविष्यात देखील भाव कमी होण्याची शक्यता कमी आहे. हे ही वाचा-कोरोनामुळे OCD ग्रस्त व्यक्तींना अधिक धोका; अशी घ्या काळजी ! ब्रॉयलर चिकन व्यवसायाविषयी जाणून घ्या जाणकारांच्या मते जर तुम्हाला पोल्ट्रीफार्म सुरु करायचा असेल तर 500 कोंबड्यांच्या पिल्लांसाठी तुमच्याकडे 500 स्क्वेअर फूट जागा हवी. 28 फूट रुंद आणि 30 फूट लांब शेड त्यासाठी तयार करावे लागते. त्याचबरोबर या शेडची उंची कमीतकमी 10 फूट आणि बाजूची उंची 8 फूट ठेवावी लागते. त्यानंतर या शेडला जाळी देखील लावावी लागते. डास आणि इतर कीटकांपासून संरक्षण करण्यासाठी ही जाळी लावावी लागते. त्याचबरोबर पक्ष्यांच्या पायांखाली भुस्सा ठेवावा. हिवाळ्यात जास्त करून भुस्साच ठेवावा. जवळपास अडीच इंचांचा भुश्याचा थर  खाली पसरवावा. कोंबड्यांना तीन पद्धतीने खाद्य दिलं जातं. वजन वाढवण्याची खाद्य खूप महत्त्वाची गोष्ट आहे. यामध्ये  प्री-स्टार्टर, स्टार्टर आणि फिनिशर असे आहाराचे तीन प्रकार आहेत. सर्वात आधी प्री-स्टार्टर द्यावे. यामध्ये  24 टक्के प्रोटीन असते जे सलग 10 दिवस द्यावे. त्यानंतर स्टार्टर द्यावे. यामध्ये  22 टक्के प्रोटीन असते.  17-18 दिवसांनंतर ज्यावेळी पक्षाचे वजन 1 किलो होते त्यावेळी हे खाद्य दिले जाते. त्यानंतर  फिनिशर आहार दिला जातो. यामध्ये 20 टक्के प्रोटीन असते अनेकदा शेतकरी कोंबड्यांना सकाळी आणि संध्यकाळी दोन्ही वेळेला दाणे टाकतात असे न करता दर 8 तासांनी त्यांना दाणे टाकावेत. त्याचबरोबर दिवसांतून 3 वेळा पाणी दिले पाहिजे. उत्तम आरोग्य असलेले पिल्लू खरेदी करणे देखील गरजेचे आहे. सध्या भारतात विविध प्रकारचे पक्षी आले असून यामध्ये  हब बर्ड, रास बर्ड यांसारख्या पक्षाचा समावेश आहे. परंतु भारतातील हवामानाशी याचा मेळ बसत असल्याने काप बर्ड प्रजातीचे पिल्लू खरेदी करावे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Winter

    पुढील बातम्या