मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

'या' म्युझिकल अलार्मने तुमची मॉर्निंग होईल गूड, सुस्तीही होईल दूर

'या' म्युझिकल अलार्मने तुमची मॉर्निंग होईल गूड, सुस्तीही होईल दूर

एका संशोधनानुसार आपण कोणत्याप्रकारचा अलार्म (Alarm) ऐकून उठतो, त्यावर आपली सुस्ती जाईल की नाही हे अवलंबून असतं.

एका संशोधनानुसार आपण कोणत्याप्रकारचा अलार्म (Alarm) ऐकून उठतो, त्यावर आपली सुस्ती जाईल की नाही हे अवलंबून असतं.

एका संशोधनानुसार आपण कोणत्याप्रकारचा अलार्म (Alarm) ऐकून उठतो, त्यावर आपली सुस्ती जाईल की नाही हे अवलंबून असतं.

  • Published by:  Priya Lad

 कॅनबेरा, 9 फेब्रुवारी : सकाळी लवकर उठायला व्हावं, म्हणून आपण घड्याळावर अलार्म (Alarm) लावून झोपतो. सकाळी अलार्म वाजताच आपली खूप चिडचिड होते. आपण अलार्म बंद करतो आणि पुन्हा झोपतो. त्यानंतर पुन्हा जेव्हा आपण उठतो, तेव्हा आपल्याला सुस्ती असल्यासारखं वाटतं. दिवसभर खूप चिडचिड होतं. आपली झोप पूर्ण झाली नाही असं वाटतं. मात्र खरंतर तुमच्या या सुस्तीचं कारण तुमची अपुरी झोप नाही तर तुमच्या घड्याळाचा अलार्म असू शकतो. हो घड्याळाचा अलार्म.

एका संशोधनानुसार आपण कोणत्याप्रकारचा अलार्म (Alarm) ऐकून उठतो, त्यावर आपली सुस्ती जाईल की नाही हे अवलंबून असतं. तुम्ही झोपेतून उठण्याआधी जर तुम्ही रेग्युलर अलार्मऐवजी म्युझिकल अलार्म लावला तर यामुळे तुम्ही झोपेतून जागे तर व्हालच. शिवाय तुमची सुस्ती आणि आळस दूर होईल आणि दिवसभर तुमचा मूडही चांगला राहिल. अलार्मवर नुकत्याच झालेल्या एका रिसर्चमध्ये ही बाब समोर आली आहे.

हेदेखील वाचा - 'हा' प्रिंटर भरणार भाजलेल्या त्वचेचे घाव, त्वचेवरील डागही होणार गायब

बिप-बिप आवाजमुळे मूड होतो खराब

सीनबीसी वेबसाईटवर प्रकाशित रिपोर्टनुसार, ऑस्ट्रेलियाच्या आरएमआयटी युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी हा अभ्यास केला. असोसिएट प्रोफेसर एडरियान डायर यांनी सांगितलं की झोपेतून उठल्यानंतर बिप-बिपचा मोठा आणि कर्कश आवाजामुळे मेंदूवर परिणाम होतो. तर  म्युझिकल अलार्मच्या मधुर आवाजामुळे आपल्याला चांगलं वाटतं.

हेदेखील वाचा - मदत मागताना विचार करू नका, Personality सुधारण्याचा हा आहे एक मार्ग

म्युझिकल अलार्म दिवसभर ऊर्जात्मक ठेवतो

संशोधनानुसार तुम्ही सकाळी जो अलार्म ऐकून उठता, त्यावर तुमची सुस्ती दूर होईल की नाही हे अवलंबून असतो. म्युझिकल अलार्म तुम्हाला दिवसभर ऊर्जात्मक ठेवतं, तर जास्त आवाज असलेला रेग्युलर अलार्म ऐकल्याने तुम्हाला जास्त सुस्तीसारखं वाटतं, असं या संशोधनात दिसून आलं आहे. सकाळी उठल्या उठल्या कामाला सुरुवात करणाऱ्यांसाठी हे फायदेशीर ठरतं.

First published:

Tags: Clock, Health, Sleep