मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /सहारा वाळवंटात आश्चर्यकारकपणे होतेय बर्फवृष्टी! जगाचा अंत होण्याची तर चिन्हं नाहीत?

सहारा वाळवंटात आश्चर्यकारकपणे होतेय बर्फवृष्टी! जगाचा अंत होण्याची तर चिन्हं नाहीत?

जगातलं सर्वाधिक तप्त वाळवंट म्हणून ओळख असलेल्या सहारा वाळवंटात (Snowfall in Sahara deset) 16 इंच बर्फ पडला. काही लोक याचा बायबलमधल्या एका उताऱ्याशी संबंध लावून जगाचा अंत जवळ असल्याचा दावा करत आहेत.  VIDEO पाहून विश्वास नाही बसणार

जगातलं सर्वाधिक तप्त वाळवंट म्हणून ओळख असलेल्या सहारा वाळवंटात (Snowfall in Sahara deset) 16 इंच बर्फ पडला. काही लोक याचा बायबलमधल्या एका उताऱ्याशी संबंध लावून जगाचा अंत जवळ असल्याचा दावा करत आहेत. VIDEO पाहून विश्वास नाही बसणार

जगातलं सर्वाधिक तप्त वाळवंट म्हणून ओळख असलेल्या सहारा वाळवंटात (Snowfall in Sahara deset) 16 इंच बर्फ पडला. काही लोक याचा बायबलमधल्या एका उताऱ्याशी संबंध लावून जगाचा अंत जवळ असल्याचा दावा करत आहेत. VIDEO पाहून विश्वास नाही बसणार

 ऐन सेफ्रा (अल्जेरिया), 18 फेब्रुवारी :  2020 मध्ये आणि 2021 च्या सुरुवातीला संपूर्ण जगाने अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव घेतला आहे. एकीकडे संपूर्ण जग कोरोनामुळे भितीच्या सावटाखाली आहे तर दुसरीकडे हवामान बदलामुळे अनेक घटना घडताना दिसत आहे. यामधील एक घटनामध्ये जगातील सर्वात तप्त वाळवंट अशी ओळख असलेल्या सहार वाळवंटांवर होणारी बर्फवृष्टी. जगामध्ये सध्या नेमकं काय चालले आहे असा प्रश्न अनेकांना पडला असतानाच बायबलवर विश्वास ठेवणाऱ्या म्हणजे ख्रिश्चन धर्म मानणाऱ्यांनी वाळवंटात होणारी बर्फवृष्टी (heavy snowfall) जगाचा अंत (world end) होण्याची चिन्ह असल्याचे आश्चर्यजनक मत व्यक्त केलं आहे.

चर्चचे मुख्य धर्मोपदेशक पॉल बेगली यांच्यासह अनेक बायबलसंबंधी उपदेशकर्त्यांना विश्वास आहे की, 'मानवता सध्या शेवटच्या काळातून जात आहे. बायबलवर विश्वास ठेवणाऱ्या या लोकांच्या मते, कोरोना विषाणूच्या उद्रेकासह अलीकडच्या काळात जगामध्ये घडणाऱ्या सर्व घटना जगाचा अंत होण्याचे संकेत देत आहेत.'

हे आश्चर्यकारक भाकित चिंतेत वाढ करणारे आहे. कारण बायबलच्या एका भागामध्ये असा इशारा देण्यात आला आहे की, वाळवंटात होणारी बर्फवृष्टी जगाच्या समाप्तीचे आणखी एक चिन्ह असू शकते. त्यामुळे बायबलवर विश्वास ठेवणाऱ्या या लोकांनी सध्या वाळवंटात होणाऱ्या बर्फवृष्टीवरुन हा अंदाज लावला आहे.

वाळवंटात होणारी बर्फवृष्टी बायबलमधील भविष्यवाणी खरी करते का?

इंटरनॅशनल बिझनेस टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या बर्फवृष्टीचा बायबलच्या एका उताऱ्याशी संबंध लावला जातोय.

सौदी अरेबियाच्या (Saudi Arabia) असीर प्रांतात 50 वर्षांमध्ये पहिल्यांदाच बर्फवृष्टी झाल्यामुळे बायबलवर विश्वास ठेवणाऱ्यांनी ही कल्पित भविष्यवाणी केली आहे. तप्त वाळवंट असलेल्या या भागातील तापमान -२ डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी झाले आहे.

दरम्यान, अल्जेरियातील वाळवंटी भाग असलेल्या ऐन सेफ्रा (Ain Sefra) शहरामध्ये देखील बर्फवृष्टी झाली. ऐन सेफ्राला वाळवंटातील प्रवेशद्वार म्हणून देखील ओळखले जाते. या भागातील हवामान कोरडे असते. या दोन भागांमध्ये अनपेक्षित हवामान बदलामुळे बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे बऱ्याच लोकांनी दावा केला आहे की, या घटना जगाच्या समाप्तीचे संकेत देत आहेत.

इस्रायल 365 न्यूज जे बायबलमधील भविष्यवाणीला प्रोत्साहन देतात त्यांनी दावा केला आहे की, जेव्हा वाळवंट फुलेल तेव्हा जग समाप्त होण्याची शक्यता आहे असे भविष्यवाणी करणारे ईसाह  म्हणजे ख्रिस्ती धर्माचे संस्थापक प्रभू येशू यांनी सांगितले होते '

एक्स्प्रेस. कॉमच्या रिपोर्टमध्ये सांगितले आहे की, 'रखरखीत वाळवंट सुखी होईल/ गुलाबासारखं फुलेल/ मी काहीतरी नवीन करणार आहे/ अचानक तुम्हाला समजेल/ वाळवंटातून रस्ता तयार करीन/वाळवंटात नदी असेल.', असे ईसाह म्हणाले होते

तापमानात अचानक घट का झाली?

सध्या सुरु असलेल्या हिवाळ्यातील तापमान जगातील बऱ्याच भागांमध्ये असामान्यच राहिले आहे. भारतातील दिल्लीमध्ये 119 वर्षांनंतर सर्वात थंड हवामान होते, तर स्पेनमध्ये 1971 नंतर सर्वात मोठं हिमवादळ झाले. जगात सध्या घडलेल्या या घटना जगाच्या समाप्तीचे चिन्ह मानले जात असले तरी सुद्धा काही हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे की, मानवी हस्तक्षेपामुळेच हवामानात बदल झाला आहे आणि याच कारणामुळे अचानक तापमानात घट होत आहे. वातावरणातील कार्बनची पातळी जशीजशी वाढत जाईल तसं उष्ण आणि थंड तापमान होऊ शकते.

दरम्यान, सौदी अरेबियातील अल खली वाळवंटातही जोरदार बर्फवृष्टी होत आहे. याठिकाणी नागरिकांसोबत उंटाना देखील बर्फवृष्टीचा सामना करावा लागत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओला. 39.6 हजार लाइक्स मिळाले आहेत. तर 12 हजारांपेक्षा अधिक युजर्सनी हा व्हिडिओ रिट्विट केला आहे.

First published:
top videos

    Tags: Climate change