मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Climate Change: झळ वाढणार! ही गोष्ट नियंत्रित केली नाही तर भारताला बसणार तीव्र तापमान वाढीचे चटके

Climate Change: झळ वाढणार! ही गोष्ट नियंत्रित केली नाही तर भारताला बसणार तीव्र तापमान वाढीचे चटके

शहरी भारताला इतर भागांपेक्षा अधिक धोका आहे. मुंबईसह भारतातल्या प्रमुख शहरांना तापमान वाढीचा (Global Warming) थेट फटका बसू शकतो. पूर, अतिवृष्टी आणि अनियमित पाऊस अशा तीव्र हवामान बदलांचा सामना करावा लागेल.

शहरी भारताला इतर भागांपेक्षा अधिक धोका आहे. मुंबईसह भारतातल्या प्रमुख शहरांना तापमान वाढीचा (Global Warming) थेट फटका बसू शकतो. पूर, अतिवृष्टी आणि अनियमित पाऊस अशा तीव्र हवामान बदलांचा सामना करावा लागेल.

शहरी भारताला इतर भागांपेक्षा अधिक धोका आहे. मुंबईसह भारतातल्या प्रमुख शहरांना तापमान वाढीचा (Global Warming) थेट फटका बसू शकतो. पूर, अतिवृष्टी आणि अनियमित पाऊस अशा तीव्र हवामान बदलांचा सामना करावा लागेल.

मुंबई, 2 फेब्रुवारी: ग्लोबल वॉर्मिंग (Global Warming) अर्थात जागतिक तापमानवाढीचे अनेक परिणाम आता कायमस्वरूपी आपल्याला भोगावे लागणार आहेत, असं आयपीसीसीनं (IPCC) सोमवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात (Report) नमूद केलं आहे. कार्बन उत्सर्जन (Carbon Emission) कमी न केल्यास मानवी सहनशक्तीच्या पातळीपेक्षा अधिक उष्णता आणि आर्द्रतेच्या स्थितीचा धोका असलेल्या काही देशांपैकी भारत एक आहे, असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. स्क्रोलने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

संयुक्त राष्ट्र संघटनेच्या (UN) हवामान बदल विषयक (Climate Change) अभ्यास करणाऱ्या या संस्थेनं (Intergovernmental Panel on Climate Change) हवामान बदलाची कारणं, परिणाम आणि उपाय यावरील आपला सहाव्या मूल्यांकन अहवालाचा दुसरा भाग नुकताच जाहीर केला आहे. या अहवालानुसार, पुढील दोन दशकांत जागतिक पातळीवर तापमानात 1.5 अंश सेल्सिअसची वाढ होण्याचा अंदाज असून, जगाला हवामान बदलाच्या अनेक धोक्यांचा सामना करावा लागणार आहे. या तापमानवाढीची पातळी तात्पुरती ओलांडली तरी त्याचे अतिशय गंभीर परिणाम होतील, त्यापैकी काही परिणाम अपरिवर्तनीय असतील.

यंदा माणूस आणि इतर प्रजातींना हवामान बदलाच्या अधिक तीव्र परिणामांना सामोरं जावं लागत असल्याचं संस्थेनं म्हटलं आहे. संस्थेच्या आधीच्या अहवालातील अंदाजापेक्षा यंदाची स्थिती अधिक गंभीर असल्याचं संस्थेनं म्हटलं आहे.

2010 ते 2020 दरम्यान, आफ्रिका, दक्षिण आशिया, मध्य आणि दक्षिण अमेरिकेच्या काही भागाला पूर, दुष्काळ आणि वादळाच्या संकटाचा सतत सामना करावा लागला आणि यात बळी गेलेल्या लोकांची संख्या अन्य भागांपेक्षा 15 पट अधिक होती.

'जिथे लोक राहतात आणि काम करतात अशा परिसंस्था, ज्यांच्यासह आपण वाढलो त्या आपल्या संस्कृतींच्या केंद्रस्थानी असलेल्या प्रजाती नष्ट होऊ शकतात,' असं आयपीसीसीचे सहअध्यक्ष डेब्रा रॉबर्ट्स यांनी सांगितलं.

या शतकाच्या मध्यापर्यंत, भारतातील सुमारे 3.5 कोटी लोकांना दरवर्षी पुराचा (Flood) सामना करावा लागू शकतो, तर कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण जास्तच राहिले तर या शतकाच्या अखेरीस 4.5 कोटी ते 5 कोटी लोकांना याचा धोका निर्माण होईल, असं या संस्थेनं म्हटलं आहे.

या अहवालातील शहरे, पायाभूत सुविधा या विषयावर अभ्यास अहवाल लिहिणाऱ्या लेखकांपैकी एक अंजल प्रकाश यांच्या मते, 'शहरी भारताला इतर भागांपेक्षा अधिक धोका आहे. 2050पर्यंत 87.7 कोटी लोकसंख्येला धोका निर्माण होणार आहे. 2020 मध्ये हे प्रमाण 48 कोटी होते. म्हणजेच धोका जवळपास दुपटीने वाढला असल्याचं स्पष्ट होत आहे. शहरांमधील लोकसंख्या वाढत असल्यानं त्यांचा धोकाही वाढत असल्याचं निरीक्षण प्रकाश यांनी नोंदवलं आहे.

या अहवालात असंही नमूद करण्यात आलं आहे की, तापमानात एक ते चार अंश सेल्सिअसची वाढ झाल्यास भारतात तांदूळ उत्पादन 10 ते 30 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते, तर मक्याचे उत्पादन 25 ते 70 टक्क्यापर्यंत कमी होऊ शकतं.

First published:

Tags: Climate change, Summer