मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

मातीच्या भांड्यात जेवण करणं हृदयासाठीही फायदेशीर? जाणून घ्या

मातीच्या भांड्यात जेवण करणं हृदयासाठीही फायदेशीर? जाणून घ्या

तरुणपिढीला मातीचं भांडं काही वर्षांपूर्वी कालबाह्य वाटत होतं; पण आता बिर्याणी, कुल्फी आणि तंदुरी व कुल्हड चहा असे अनेक पदार्थ अन् पेय मातीच्या भांड्यात घेण्यास अधिक प्राधान्य तरुणपिढीकडून दिलं जातंय.

तरुणपिढीला मातीचं भांडं काही वर्षांपूर्वी कालबाह्य वाटत होतं; पण आता बिर्याणी, कुल्फी आणि तंदुरी व कुल्हड चहा असे अनेक पदार्थ अन् पेय मातीच्या भांड्यात घेण्यास अधिक प्राधान्य तरुणपिढीकडून दिलं जातंय.

तरुणपिढीला मातीचं भांडं काही वर्षांपूर्वी कालबाह्य वाटत होतं; पण आता बिर्याणी, कुल्फी आणि तंदुरी व कुल्हड चहा असे अनेक पदार्थ अन् पेय मातीच्या भांड्यात घेण्यास अधिक प्राधान्य तरुणपिढीकडून दिलं जातंय.

मुंबई : प्राचीन काळात स्वयंपाकासाठी मातीच्या भांड्यांचाच (Clay Handi) वापर व्हायचा. परिणामी, आहारातील पोषक घटक योग्य पद्धतीने शिजवले जाऊन त्याचा आरोग्याला फायदा होत असे; पण कालांतराने अॅल्युमिनियम, स्टील, जर्मन, तांब्याच्या भांड्यांत स्वयंपाक होऊ लागला. पुन्हा मातीच्या भांड्यांकडे लोक आता वळत आहेत. यात वेगवेगळ्या डिशना चांगलीच मागणी वाढली आहे. तरुणपिढीला मातीचं भांडं काही वर्षांपूर्वी कालबाह्य वाटत होतं; पण आता बिर्याणी, कुल्फी आणि तंदुरी व कुल्हड चहा असे अनेक पदार्थ अन् पेय मातीच्या भांड्यात घेण्यास अधिक प्राधान्य तरुणपिढीकडून दिलं जातंय. अनेक घरांमध्येही याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. मातीच्या भांड्यांत केलेल्या स्वयंपाकाचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का? मातीच्या भांड्यात डाळ आणि भाजी तयार केल्यानंतर यात 100 टक्के सूक्ष्म पोषक घटक कायम राहतात. अनपदार्थातील कॅल्शियम (Calcium), फॉस्फरस (Phosphorus), लोह (Iron), मॅग्नेशियम (Magnesium) आदी घटक नियंत्रित ठेवण्यासाठी याची मदत होते. गॅस आणि बद्धकोष्ठतेची समस्याही यामुळे दूर होऊ शकते. अन्नपदार्थांतील पीएच व्हॅल्यु नियंत्रित ठेवण्यासह अनेक आजारांपासून बचाव करण्यात ही भांडी महत्त्वाची कामगिरी बजावतात. विशेष म्हणजे, या भांड्यांत स्वयंपाक केल्याने तेल कमी लागतं. या कमी तेलाच्या स्वयंपाकाची हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी याची चांगली मदत होते. ही घ्यावी काळजी मातीच्या भांड्यात मध्यम आचेवर स्वयंपाक करायला हवा. जास्त आचेवर केल्यास भांडं तडकू शकतं. स्वयंपाकावेळी चमाचाही लाकडाचा असावा. मातीचा तवा वापरताना गॅस सुरू करण्याआधीच त्यावर पाणी टाकावं. कोमट पाण्याने ते भांडं स्वच्छ करावं. साबण किंवा इतर कुठल्याही लिक्विडचा यासाठी वापर करू नये. कारण साबणाचे कण भांड्याच्या आत राहू शकतात आणि पुढच्यावेळी स्वयंपाक करताना त्यात ते कण मिसळू शकतात. बेकिंग सोडा आणि मीठाने मातीच्या भांड्यांवर लागलेले डाग काढले जाऊ शकतात. अनेकदा मसालेदार सुवास भांड्यांतून येऊ शकतो. त्यावर लिंबाचा वापर करता येईल. बाजारातून पहिल्यांदा मातीचं भांडं घरात आणल्यानंतर त्यांचा वापर करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक असतं. मातीचं मोठं भांडं 12 तास तर ग्लास, वाटी, दही विरजण लावण्यासाठी असलेली हंडी अशी आकारानी लहान असलेली भांडी 6 तास पाण्यात भिजवून ठेवावी. दुसऱ्या दिवशी भांडी कोमट पाण्याने ब्रश लावून धुवून घ्यावी. ब्रश वापरल्याने अतिरिक्त माती निघून जाते. मेटलच्या ब्रशचा कदापि वापर करू नये. उन्हामध्ये ही भांडी ठेवावी व नंतर आतून खाद्यतेल लावावं. त्यानंतर यात पाणी भरून गॅसवर मध्यम आचेवर गरम करावं. अर्ध्या तासानंतर पाणी फेकून द्यावं. या प्रक्रियेनंतर मातीचं भांडं स्वयंपाकासाठी तयार झालेले असतं. रंगवलेली भांडी नका घेऊ बाजारात चककणारी व रंगवलेली मातीची भांडी पाहायला मिळतात. पण त्यातील रंगांत अनेक प्रकारची केमिकल्स असतात. न रंगवलेलं काळ्या किंवा लाल मातीचं भांडं घेणं कधीही उपयोगी ठरतं. मातीचं भांड फ्रीजमध्ये ठेवायचं असेल तर त्याला आधी थंड होऊ द्यावं. रिकाम्या भांड्याला गॅसवर ठेऊ नये. ओव्हनमधून मातीचं भांडं काढतो तेव्हा त्याला थेट थंड जागी ठेवण्याऐवजी एखाद्या टॉवेल किंवा ओव्हन मॅटवर ठेवावं, असं केल्यानं भांड्याला तडा जाणार नाही. आजारवर नियंत्रण शक्य मातीचं भांडं वापरण्याचे अनेक फायदे असल्याचं तज्ज्ञ सांगतात. बेंगळुरूतील फोर्टिस रुग्णालयाच्या आहारतज्ज्ञ रिंकी कुमारी म्हणाल्या की, मातीच्या भांड्यांत तयार केलेल्या अन्नपदार्थांत आयर्न, कॅल्शियम आणि मॅगनेशियमसारखी पोषकतत्त्वं कायम असतात. याचा शरीराला चांगला फायदा होतो. आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. सूर्या भगवती यांनी मातीच्या भांड्यांचं आयुर्वेदाच्या दृष्टीने महत्त्व सांगितलं. त्या म्हणाल्या की, आयुर्वेदात पूर्वापारपासून मातीच्या भांड्यांतच स्वयंपाक करण्याचा सल्ला दिला जातो. परंतु, बहुतांश लोक यावरील चकाकीपणा पाहून त्याची खरेदी करतात. चकाकीपणा आणण्यासाठी यावर शिसं, पारा आणि इतर रसायनं वापरली जातात. त्यामुळे त्यांचा वापर करू नये. आहारतज्ञ अंकिता गुप्ता-सहगल म्हणाल्या की, अॅल्युमिनियम आणि नॉन स्टिक भांड्यांचा वापर घराघरात केला जातो. पण ते सुरक्षित नाही. दुसरीकडे मातीचा भांड्यांमुळे अन्नातील पोषक घटक कायम राहतात. शिवाय धातूचा दुष्परिणाम (Metal Reaction) होण्याचा धोका असतो. डॉ. दीक्षा भावसार सवालिया यांनी तर त्यांच्या रुग्णांना मातीच्या भांड्यांत पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे. बहुतांश रुग्णांनी त्यांचा सल्ला ऐकला. त्यामुळे पोटाचे आजार, अॅसिडिटी, मायग्रेनचा त्रास कमी झाल्याचा दावा त्यांनी केला. शहरी भागात मातीच्या भांड्यांच्या वापराबाबत आता जनजागृती होत आहे; पण ग्रामीण भागात आधीपासूनच ही भांडी वापरली जातात. त्यामुळे याचं महत्त्व अधोरेखित झालं आहे.
First published:

Tags: Health, Lifestyle

पुढील बातम्या