क्लार्कच्या एका चुकीमुळे झाला मालामाल; लागली 15 कोटींची लॉटरी

क्लार्कच्या एका चुकीमुळे झाला मालामाल; लागली 15 कोटींची लॉटरी

ते म्हणतात ना भगवान देता है तो छप्पर फाड के देता है..

  • Share this:

नवी दिल्ली, 18 जुलै : लॉटरी लागणं हा आनंदाचा भाग आहे. जेव्हा एखादा व्यक्ती लॉटरी जिंकतो तेव्हा त्याला भाग्यशाली मानलं जातं. मात्र जर कोणी चुकीच्या तिकिटावर लॉटरी जिंकतो तेव्हा त्याला काय म्हणाल? तर त्याला म्हणतात...भगवान देता है तो छप्पर फाड के देता है..हो..एका क्लर्कने व्यक्तीला चुकीचं तिकीट दिलं त्यानंतर त्याला चक्क 15 कोटी रुपयांची लॉटरी लागली.

गल्फ न्यूज नुसार हे प्रकरण अमेरिकाच्या मिशिगनचं आहे. 57 वर्षांचा एक व्यक्ती आपली पत्नीच्या गाडीमध्ये हवा भरण्यासाठी गेला होता. ज्यासाठी तो मिशिगनच्या इस्टपॉइंटच्या एका गॅस स्टेशनवर थांबला. व्यक्तीने सांगितले की तो सुट्टे घेण्यासाठी स्टेशनच्या क्लर्कजवळ गेला. त्याने क्लर्ककडून 10 डॉलरची 7 स्क्रैच-ऑफ तिकीट देण्यास सांगितले. पुढे व्यक्तीने सांगितले की तिकीट घेत असताना चुकूल क्लर्कने 20 डॉलरचं तिकीट दिलं. क्लर्कने मला तिकीट एक्सचेंज करण्याचं आवाहनही केलं.

हे वाचा-हनीमूनसाठी जमवले होते 6 लाख, होणाऱ्या नवऱ्याने न सांगता खरेदी केला गेमिंग पीसी

मात्र काही जणांनी मला ते ठेवून घेण्यास सांगितले. मी ते तिकीट स्वत:जवळ ठेवलं. यानंतर जेव्हा मंगळवारी लॉटरीचा निकाल जाहीर झाला तेव्हा मला 2 मिलियन डॉलरची लॉटरी लागली. जी तब्बल 15 कोटी रुपयांची आहे. व्यक्तीचं म्हणणं आहे की मला आनंद आहे की त्या दिवशी मी तिकीट स्वत:जवळ ठेवलं. यानंतर त्या व्यक्तीला या 15 कोटी रुपयांचं काय करणार अस विचारला असता तो म्हणाला..अनपेक्षितरित्या माझ्याकडे इतके पैसे येणार आहे. मला कळत नाहीये..पण फार वर्षांपासून माझी घर घेण्याची इच्छा आहे यानिमित्ताने ती पूर्ण होईल.

Published by: Meenal Gangurde
First published: July 17, 2020, 11:48 AM IST
Tags: Lottery

ताज्या बातम्या