मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

पास्ताबाबत कंपनीचा दावा फेल; ग्राहक महिलेने थेट कोर्टातच खेचलं; नेमकं प्रकरण काय?

पास्ताबाबत कंपनीचा दावा फेल; ग्राहक महिलेने थेट कोर्टातच खेचलं; नेमकं प्रकरण काय?

पास्ता (संग्रहित फोटो)

पास्ता (संग्रहित फोटो)

अनेक फास्ट फूड कंपन्या आपले पदार्थ कमीतकमी मिनिटांत बनतात, असा दावा जाहिरातींतून करतात.

एकविसावं शतक हे धकाधकीचं शतक आहे. हल्ली लोकांना कमी वेळेत गोष्टी हव्या असतात. हल्ली सगळ्यांना त्वरित होणाऱ्या गोष्टी फार पसंत पडतात. जसं की टी-20 क्रिकेट, फास्ट फूड. फास्ट फूडचा विचार केला तर आज अगदी कमी वेळेत बनणारे अनेक पदार्थांचे पर्याय लोकांसमोर उपलब्ध झाले आहेत. कमीतकमी मिनिटांमध्ये पदार्थ कसा बनू शकेल याची जणू स्पर्धाच आज सुरू झाली आहे.

या पदार्थांत नूडल्स, पास्ता या परदेशी पदार्थांबरोबरच आपल्या अस्सल देशी पदार्थांचाही समावेश झाला आहे. कारण पोहे, उपीट हे आपले नाश्त्याचे पदार्थही आता इन्स्टंट, रेडी-टू-इट स्वरूपात उपलब्ध झालेत. पटकन तयार होणारा पदार्थ म्हणजे फास्ट फूड. या फूडच्या जाहिरातींमध्ये विविध दावे केले जातात पण ते खरे ठरत नाहीत. असाच दावा करणाऱ्या एका कंपनीविरुद्ध एका महिलेने न्यायालयात दाद मागितली आहे. याबाबतचं वृत्त ‘झी न्यूज’ ने दिलं आहे.

अनेक फास्ट फूड कंपन्या आपले पदार्थ कमीतकमी मिनिटांत बनतात, असा दावा जाहिरातींतून करतात. अर्थात हे दावे ग्राहकांना आपल्या उत्पादनाकडे आकर्षित करण्यासाठी केले जातात. या धकाधकीच्या जीवनशैलीत लोकांना जास्त वेळ नसतो. त्यांना त्वरित खाण्यासाठी पदार्थ हवे असतात. या लोकांच्या आवडीचा कल फास्ट फूड कंपन्या जाणतात व त्या अनुषंगाने कमीतकमी मिनिटांत आपला पदार्थ तयार होतो असा दावा करतात.

लोकंही या दाव्यांमुळे त्यांच्या उत्पादनाकडे आकर्षित होतात. पण हे दावे जर चुकीचे ठरले म्हणजे फास्ट फूड कंपनीने दावा केलेल्या वेळेमध्ये पदार्थ तयार झाला नाही तर ग्राहकांचा मात्र भ्रमनिरास होतो. बहुतांश ग्राहक हे दावे जास्त गांभीर्याने घेत नाहीत. पण अमेरिकेत एका महिलेने मात्र एका पास्ता कंपनीने केलेला दावा मात्र फारच गांभीर्याने घेतला.

हेही वाचा - त्याने 13 जणांची केली हत्या, बर्गरमधून विकलं मांस, कारण ऐकून पोलिसांना बसला धक्का

अमेरिकेतील फ्लोरिडा भागात राहणाऱ्या अमेंडा रेमिरेज नामक एका महिलेने क्राफ्ट हेंज या अमेरिकन फूड कंपनीविरोधात न्यायालयात खटला भरला. क्राफ्ट हेंज ही एक पास्ता कंपनी आहे. त्यांचा असा दावा आहे की, त्यांचा पास्ता हा केवळ 3.5 मिनिटांमध्ये तयार होतो. अमेंडा रेमिरेज या महिलेने या कंपनीच्या दाव्यावर विश्वास ठेवून क्राफ्ट हेंज कंपनीचा पास्ता खरेदी केला. पण तो पास्ता 3.5 मिनिटांत तयार झाला नाही. त्यामुळे ती व्यथित झाली व तिने कंपनीला सरळ कोर्टातच खेचलं. तिने कंपनीच्या दाव्याविरोधात पाच मिलियन डॉलर म्हणजे 40 कोटी रुपयांचा खटला दाखल केला.

कंपनीचा पास्ता 3 मिनिटांत तयार झाला नाही म्हणून ती फार रागवली होती. तिच्या मते क्राफ्ट हेंज कंपनीचा मायक्रोवेव्हेबल मॅक अँड चिज कप हा पदार्थ 3.5 मिनिटात तयार होतो असा कंपनीचा दावा आहे. पण वास्तवात तो 3.5 मिनिटांत तयार होत नाही. यावरुन कंपनीने केलेला दावा हा खोटा असून, तो कायद्याचं उल्लंघन करतो. परिणामी, त्या महिलेने नुकसान भरपाई म्हणून 50 लाख डॉलर म्हणजे 40 कोटी 80 लाख रुपयांची मागणी केली आहे.

क्राफ्ट हेंज कंपनीने मात्र एका मीडियाला दिलेल्या माहितीत हा बळजबरीचा खटला असल्याचं म्हटलं आहे व कंपनी आपली बाजू कोर्टात सशक्तपणे मांडेल अशी तयारी दर्शवली आहे.

First published:

Tags: Court, Food, Local Food