Home /News /lifestyle /

COVID-19 पासून बचावासाठी दालचिनी उपयोगी; कशी खायची, केव्हा खायची?

COVID-19 पासून बचावासाठी दालचिनी उपयोगी; कशी खायची, केव्हा खायची?

नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूटने आपल्या प्रयोगशाळेत वनस्पतींपासून हँड सॅनिटायझर तयार केला आहे. त्यात दालचिनी वापरली आहे.

  • myupchar
  • Last Updated :
    दालचिनीचा उपयोग जीवाणू आणि बुरशीजन्य आजारांचे संक्रमण रोखण्यासाठी होतो. तसेच दालचिनी कोविड-19 च्या संक्रमणाचा सामना करण्यात महत्वाची भूमिका निभाऊ शकते. ग्रामीण भागात अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी आयुर्वेदिक औषधांमध्ये, मसाल्यांमधे आणि काढ्यात याचे सेवन केले जाते. संशोधक सतत या औषधी वनस्पतींवर प्रयोग करत आहेत. नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इंस्टीट्यूट (एनबीआरआई) च्या संशोधकांच्या मते, दालचिनी लॉरेल फॅमिलीची सदस्य आहे. दालचिनीला इंग्रजीत cinnamon आणि वनस्पती शास्त्रात सिनेमोमम म्हणतात. त्यात अँटिऑक्सीडंट असतात आणि मधुमेहात साखर नियंत्रणात ती प्रभावी असते. दालचिनी आणि इतर औषधी वनस्पतींपासून निर्माण केलेय हेंड सेनिटाइजर नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूटने आपल्या प्रयोगशाळेत वनस्पतींपासून हँड सॅनिटायझर तयार केला आहे. त्यात तुळशी आणि दालचिनीचा उपयोग करण्यात आला आहे. इन्स्टिट्यूटने (एनबीआरआई) विषाणूनाशक द्रावण बनवले आहे. त्याचा फॉर्म्युला त्यांनी नुकताच जाहीर केला आहे. त्याचा उपयोग हात धुण्यासोबत मास्क धुण्यासाठी पण केला जाऊ शकतो. myupchar.com चे ऐम्सशी संबंधित डॉ. अजय मोहन यांच्यानुसार, जोपर्यंत कोरोना विषाणूवर औषध मिळत नाही आपल्याला सावध राहायलाच हवे. साथीच्या काळात आजारांशी लढण्याची क्षमता महत्वाची कोविड-19 च्या आव्हानाशी लढण्यासाठी सर्व विश्वाने एकजुटता दाखवली आहे. या साथीला यशस्वीपणे सामोरे जाण्यासाठी रोग प्रतिकारशक्ती महत्वाची भूमिका निभावते आहे. त्यामुळे आयुर्वेदाच्या प्राचीन परंपरेचे आणि औषधांचे महत्व वाढले आहे. myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला यांच्यानुसार, आयुर्वेदामधे दालचीनीला एक उत्तम औषध मानले गेले आहे. दालचीनीच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि हृदया संबंधित रोग होण्याचा धोका राहत नाही. दालचिनीसोबत खा शेवग्याच्या शेंगा जवाहर लाल नेहरू कॅन्सर हॉस्पीटल आणि रिसर्च सेंटर च्या शास्त्रज्ञांच्या मते शेवग्याच्या शेंगांमध्ये औषधी गुण असतात. त्यात कॅल्शियम आणि फॉसस्फरस असते. त्यांचा उपयोग कोरोनाशी लढण्यात होऊ शकतो. त्यांच्या सोबत दालचिनी खायला हवी. रोग प्रतिकारशक्ती एका दिवसात नाही वाढत शरीराची रोगप्रतीकाराकता एका दिवसात वाढत नाही. त्यासाठी नियमित भोजन, व्यायाम, झोप आणि सी जीवनसत्वयुक्त आहार घ्यायला हवा. त्यात जर दालचिनीचा समावेश केला तर सकारात्मक परिणाम लवकर दिसतात. दालचिनी चवीला चांगली असते म्हणून तिचा उपयोग मसाल्यात केला जातो. रोज सकाळी दालचिनीचे पाणी प्या मसाल्यांशिवाय दालचिनीचे पाणी शरीराला खूप फायद्याचे असते. रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या आणि त्यात दालचिनीची भुकटी टाका. सकाळी हे पाणी गाळून प्या. त्याने खूप फायदा होतो. चावी साठी त्यात थोडा लिंबू आणि मध पण घालू शकतात. दालचिनी खा पण ही सावधगिरीपण बाळगा जास्त दालचिनी खाण्याने यकृताला नुकसान होऊ शकते. संतुलित प्रमाणात खाल्ली नाही तर यकृत, फुफ्फुस यांचा कॅन्सर, किंवा किडनीचे रोग होऊ शकतात. अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - दालचिनी (कलमी) फायदे, वापर आणि सहप्रभाव न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.
    First published:

    Tags: Covid19

    पुढील बातम्या