व्हिडिओत पाहू शकता. एका ख्रिसमस ट्रीसमोर एक व्यक्ती आधी वीणा घेऊन बसला आहे. त्यानंतर एकेएक करत काही व्यक्ती भारतीय पारंपारिक वाद्य घेऊन येतात. वीणा, सारंगी, सनई, ढोल या प्रत्येक वाद्यावर जिंगल बेलचे सूर उमटतात आणि पाहता पाहता सर्व वाद्य एकत्र येऊन जिंगल बेलचे सूर छेडतात. हे वाचा - आजारातून बरं झाल्यानंतर रेमो डिसूझांचा पत्नीबरोबर खास डान्स,ख्रिसमस स्पेशल VIDEO भारतीय वाद्यांच्या तालातील ही जिंगल बेल ऐकल्यानंतर मन कसं अगदी तृप्त झाल्यासारखं वाटतं. हे ऐकल्यानंतर लय भारी, एक नंबर असे शब्द आपल्या तोंडातून निघाल्याशिवाय राहणार नाहीत. अशाच काहीशा प्रतिक्रिया सोशल मीडियावरही उमटत आहेत. बहुतेकांना ही जिंगल बेल आवडली आहे. तुम्हालाही नक्कीच आवडली असणार, यात काही प्रश्नच नाही. हे वाचा - OMG! गायीच्या पोटालाच बनवली स्क्रिन, अख्खा गाव पाहात होता फिल्म तुम्ही ही अनोखी जिंगल बेल ऐकून तुमचे कान आणि मन तर तृप्त केले. पण हा अनुभव आणि आनंद फक्त तुमच्यापुरचा मर्यादित ठेऊ नका. हीच संधी इतरांनाही द्या. ख्रिसमसच्या शुभेच्छा, संदेश तर तुम्हा सर्वांना रात्री पाठवलेच असतील. पण आता ख्रिसमसचं एक सरप्राइझ म्हणून तुमच्या जवळच्या व्यक्तींना, मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना भारतीय वाद्यातील जिंगल बेल नक्कीच पाठवू शकता. त्यामुळे त्यांनादेखील ही बातमी नक्की शेअर करा आणि प्रत्येकापर्यंत या जिंगल बेलचे सूर पोहोचू द्या.A bit contrived but still ends up making some good vibes... A good warmup for Christmas Eve.... pic.twitter.com/7vlCSzQGbR
— anand mahindra (@anandmahindra) December 24, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral, Viral videos