ऐकावं ते नवल! नवऱ्याचं अतीप्रेम झालं असह्य, पत्नीने केली घटस्फोटाची मागणी

ऐकावं ते नवल! नवऱ्याचं अतीप्रेम झालं असह्य, पत्नीने केली घटस्फोटाची मागणी

महिलेने तिचा पती तिच्यावर अतोनात प्रेम करतो आणि त्या प्रेमाने गुदमरल्यासारखं वाटत असल्याने तिने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Share this:

सर्वसामान्यपणे जोडपी वेगळं होण्याचा निर्णय घेतात तेव्हा मुख्य कारण हे त्यांच्यातील दुरावा असतो. एकमेकांसोबत न पटल्यामुळे आणि नात्यातलं प्रेम कमी झाल्यामुळे अनेकजण घटस्फोटाच्या निर्णयापर्यंत पोहोचतात. पण तुम्ही कधी नवरा अतोनात प्रेम करतो म्हणून घटस्फोटाची मागणी करण्याचं ऐकलं आहे का.. आतापर्यंत ऐकलं नसलं तरी अशी एक घटना संयुक्त अरब अमिरातीमध्ये घडली आहे. एका महिलेने तिचा पती तिच्यावर अतोनात प्रेम करतो आणि त्या प्रेमाने गुदमरल्यासारखं वाटत असल्याने तिने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.

खलीज टाइम्सने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, फुजैराहमधील शरिया न्यायालयात महिलेने घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. घटस्फोटाचं कारण देताना ती म्हणाली की, 'तो माझ्यावर कधीच ओरडला नाही किंवा माझं म्हणणं कधीही नाकारलं नाही. घर कामातही तो मला मदत करतो. त्याच्या अशाच वागण्याने मला गुदमरल्यासारखं होत आहे.'

महिलेचा नवरा तिच्यासाठी कधी तरी स्वयंपाकही करायचा. नेमकी या सर्व गोष्टी तिला नरक यातना देत होत्या. त्यामुळेच तिने वर्षभराचं लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. आपल्या लग्नाबद्दल बोलताना ती म्हणाली की, 'मी एक दिवस भांडणाची आतुरतेने वाट पाहत होते. मात्र त्याने मला सहज माफ केलं आणि भेटवस्तूही दिल्या. मला माझ्या आयुष्यात फक्त आज्ञाधार नवरा नको असून प्रेम, भांडण, संवाद या सगळ्या गोष्टी हव्या आहेत.'

महिलेच्या या आरोपांवर आपलं मत स्पष्ट करताना नवरा म्हणाला की, 'मी काहीही चुकीचं केलं नाही. मला फक्त माझ्या बायकोला आनंदी ठेवायचं होतं आणि एक परिपूर्ण नवरा व्हायचं होतं.' एवढंच नाही तर बायकोने त्याचं वजन वाढल्याची तक्रार केल्यानंतर त्याने डाएट आणि जीम सुरू केलं. सध्या न्यायालयाने हे प्रकरण लांबणीवर टाकलं असून नवऱ्याने न्यायालयाकडे बायकोला समजावण्याची विनंती केली असून तिला केस मागे घेण्याची विनंती केली आहे.

रिलेशनशिपमध्ये असतानाही का पडतात दुसऱ्यांच्या प्रेमात?

सोलो ट्रॅव्हलिंगसाठी बेस्ट आहेत या 4 जागा

शरीरात अशा पद्धतीचे बदल घडत असतील तर वेळीच व्हा सावध, होऊ शकतो ब्रेस्ट कॅन्सर

300 फूट खोल सप्तकुंड धबधब्यात पडला पर्यटक; रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 23, 2019 03:13 PM IST

ताज्या बातम्या