मुंबई, 15 जुलै : चॉकलेट... ! असं नुसतं म्हटलं तरी आपल्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात. चॉकलेटचा उल्लेख झाला की आपल्या डोळ्यासमोर वेगवेगळ्या प्रकारची चॉकलेट्स येतातच शिवाय पाघळणारं चॉकलेट नुसतं आठवलं तरी लगेच खावंसं वाटतं. पण तुम्ही जर एवढे चॉकलेटप्रेमी असाल तर ही बातमी तुमचा हा आनंद थोडा कमी करू शकते.
भारतात दिवसेंदिवस चॉकलेटची मागणी वाढते आहे. पण हवामानात होणाऱ्या बदलांमुळे चॉकलेटच्या उत्पादनावरच संकट आलं आहे. येत्या 40 वर्षांत चॉकलेटचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घटू शकतं. त्यामुळे चॉकलेट नाहिसंच होण्याची भीती आहे.
भारतामध्ये चॉकलेटला भरपूर मागणी आहे. गेल्या पाच वर्षांत तर यात लक्षणीय वाढ झाली पण मागणी खूप असली तरी चॉकलेटचा पुरवठा घटण्याची भीती आहे.
World Cup : न्यूझीलंडनेच जिंकलाय वर्ल्ड कप! वाचा ICCचा नियम क्रमांक 19.8
अमेरिकेमधल्या एका हवामान व्यवस्थापन संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार पुढच्या 40 वर्षांत चॉकलेटचं नामोनिशाणच मिटू शकतं. तापमानवाढ आणि चॉकलेटचा संबंध काय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल पण याचा थेट संबंध आहे.
20 डिग्रीपेक्षा कमी तापमान
चॉकलेटच्या उत्पादनासाठी 20 अंश सेल्सियसपेक्षा कमी तापमान लागतं. पण आता तापमानात झपाट्याने वाढ होते आहे. त्यामुळे त्याचा फटका या उत्पादनाला बसू शकतो.
घाना, इंडोनेशिया, ब्राझील, इक्वेडोर, कॅमेरून, नायजेरिया, पापुआ न्यू गिनी अशा काही मोजक्याच देशांमध्ये चॉकलेटचं उत्पादन होतं. इथे पारंपरिक पद्धतीनेच चॉकलेटचं उत्पादन केलं जातं. इथलं तापमान जर 20 डिग्रीच्या खाली असेल तरच नियंत्रित तापमानात हे उत्पादन होऊ शकतं.
पण आता अमेरिकन संस्थेने दिलेल्या अहवालानुसार, प्रदूषण, वाढती लोकसंख्या आणि बदलत्या भौगोलिक समीकरणांमुळे तापमान वाढत चाललं आहे. त्यामुळे येत्या 30 वर्षांत हे तापमान 2.1 अंशाने वाढू शकतं. याचा परिणाम या उत्पादनावर होणार आहे.
चॉकलेटचा उद्योग पुढची दहा वर्षंच टिकाव धरू शकतो. पण जगातून नाहिसं होण्यासाठी अजून 40 वर्षं लागू शकतात. हे संकट दूर करायचं असेल तर तापमानवाढ रोखणं खूपच जरुरीचं आहे. नाहीतर आपली ही प्रिय गोष्ट आपण गमावून बसू, असं तज्ज्ञांचं मत आहे.
=======================================================================================
इंग्लंडचा विजय ते चांद्रयान-2चं प्रक्षेपण रद्द, महत्त्वाच्या टॉप 18 बातम्या