मुंबई, 30 जानेवारी : चॉकलेट ही अशी वस्तू आहे की, प्रत्येकाच्या मनाला मोह होतो. मुलांसाठी ही चांगली गोष्ट आहे. मुलं मोठी झाल्यावर किशोरवयातही चॉकलेटची इच्छा कमी होत नाही. पण टीनएजरमध्ये जास्त चॉकलेट खाल्ल्याने डाग-पुरळ वाढू शकतात. चॉकलेटमुळे चेहऱ्यावर पिंपल्सच्या समस्या वाढतात असा दावा काही संशोधनात केला जात आहे.
सामान्यतः असे म्हटले जाते की, जास्त तेलकट पदार्थ खाल्ल्याने मुरुम आणि पिंपल्स होतात. परंतु चॉकलेटमुळेदेखील हा त्रास होऊ शकतो. जरी चॉकलेटमध्ये अनेक प्रकारचे अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात, जे शरीरासाठी फायदेशीर असतात, परंतु चॉकलेटचा दुष्परिणाम म्हणजे त्यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स वाढतात.
दूध चॉकलेटने वाढत नाहीत पिंपल्स
CNN मधील एका रिपोर्टनुसार, क्लीव्हलँड मेडिकल सेंटर युनिव्हर्सिटी हॉस्पिटलचे त्वचाविज्ञानी डॉ. ग्रेगरी आर. डेलोस्ट म्हणाले, "आम्हाला आमच्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, चॉकलेट खाल्ल्याने पाचपेक्षा जास्त पिंपल्स होऊ शकतात." ते म्हणाले की काही लोकांना असे वाटेल की 5 पिंपल्स काहीच नाहीत, परंतु हे पिंपल्स फुटल्यानंतर ते अधिक होऊ शकतात.
डॉ ग्रेगरी यांनी सांगितले की, ज्या लोकांना आधीपासून पिंपल्स नाहीत. त्यांनी जर चॉकलेटचे सेवन वाढवले तर त्यांनाही पिंपल्स येऊ शकतात. मात्र ज्यांना मिल्क चॉकलेट देण्यात आले. त्यांना पिंपल्सची समस्या नव्हती. पण दूध आणि साखर मिसळून चॉकलेट खाल्लं की त्रास वाढला. त्याच्या निष्कर्षांवर आधारित, डॉ. ग्रेगरी यांना खात्री आहे की चॉकलेटमुळे पिंपल्स आणखी वाईट होऊ शकतात.
डार्क चॉकलेटने वाढतात पिंपल्स
थायलंडमधील बँकॉक विद्यापीठाचे डॉ. प्रवीत अस्वानोदा यांनी त्यांच्या अभ्यासाच्या आधारे दावा केला आहे की, केवळ चॉकलेट हेच पिंपल्सचे कारण असू शकत नाही. ते म्हणाले की, मुरुम येण्यासाठी अनेक घटक कारणीभूत असतात. अन्न, जनुक, पर्यावरण असे अनेक घटक यासाठी जबाबदार आहेत. डॉ. अस्वानोदा यांनी मात्र त्यांच्या अभ्यासात डार्क चॉकलेटच्या सेवनाने जखमांच्या संख्येनुसार 'पुरळ' वाढल्याचे मान्य केले.
Ayurved Tips : अंग खाजतंय? तर घरीच करा हे उपाय, मिळेल लगेच आराम
मात्र ज्या लोकांना आता मुरुमांचा धोका नाही किंवा ज्यांचे वय वाढले आहे त्यांनी चॉकलेट खाल्ल्याने पिंपल्स वाढतील की नाही हेदेखील अभ्यासात सांगण्यात आले नाही. अशाप्रकारे, काही अभ्यासांमध्ये चॉकलेटच्या सेवनामुळे पिंपल्सच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले आहे, तर काही अभ्यासांमध्ये त्याकडे विशेष लक्ष दिले गेलेले नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips, Lifestyle