चिरंजीवी सरजाच्या कुटुंबात आता Junior Chiru आला; पत्नी मेघना राजला झाला मुलगा

चिरंजीवी सरजाच्या कुटुंबात आता Junior Chiru आला; पत्नी मेघना राजला झाला मुलगा

अभिनेता चिरंजीवी सरजाची (Chiranjeevi Sarja) पत्नी मेघना राजने (Meghana Raj) एका गोंडस बाळाला जन्म (baby boy) दिला आहे.

  • Share this:

बंगळुरू, 22 ऑक्टोबर : कन्नड अभिनेता चिरंजीवी सरजाच्या (Chiranjeevi Sarja) मृत्यूनंतर शांत झालेल्या त्याच्या घरात आज ज्युनिअर चिरंजीवीचा आवाज घुमू लागला आहे. चिरंजीवीची पत्नी मेघना राजने (Meghana Raj) एका गोंडस बाळाला जन्म (baby boy) दिला आहे. सोशल मीडियावर ही गोड बातमी देण्यात आली आहे.

चिरंजीवी सर्जा याचं 7 जून रोजी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. वयाच्या 36 व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला तेव्हा त्याची पत्नी मेघना राज 3 महिन्यांची गर्भवती होती. अशात चिरंजीवीच्या निधनामुळे तिला मोठा धक्का बसला होता. मात्र बाळासाठी तिने खंबीरपणे याला तोंड दिलं.

View this post on Instagram

😍😘@chirusarja ಜೂನಿಯರ್ ಚಿರು ಸರ್ಜಾ ಜೊತೆ, ಧೃವಾ ಸರ್ಜಾ.... ❤❤❤❤❤ ಗಂಡು ಮಗುವಿಗೆ ಜನ್ಮ ಕೊಟ್ಟ ಮೇಘನಾ ರಾಜ್! 😍😘 @megsraj @chirusarja @dhruva_sarjaa #meghanaraj #chirusarja #dhruvasarja #beauty #Cute 😍😘 @thenameisyash @iamradhikapandit #daughter #yashfilms #kannadafilms #kannadamovies #sandalwood #bollywood #kgf #filmyduniya_66 #Filmy_Duniya #beauty #beautiful #beautydaughter #beautifuldaughter #king #queen #cutebaby #baby #babygirl #queenbaby 😍😘 #cute #beautiful #beauty #king #queen #daughter #famous #famous #kannadafilms #kannadamovies #kgf #filmyduniya_66 #Filmy_Duniya #beautyqueen #beautydaughter #sandalwood #bollywood #Trollbollywood #troll #troll_guru #anupama

A post shared by FILMYDUNIYA (@filmyduniya_66) on

चिरंजीवीच्या मृत्यूनंतर मेघनाने आपण प्रेग्ननंट असल्याचं सोशल मीडियावर सांगितलं. त्यावेळी तिनं भावुक पोस्ट केली होती. "आपलं छोटंसं बाळ तुझ्याकडून मला मिळालं मौल्यवान असं गिफ्ट आहे. आपल्या दोघांच्या प्रेमाचं प्रतीक. आपल्या मुलाच्या रूपात तुला पुन्हा धरतीवर आणण्यासाठी मी आणखी प्रतीक्षा नाही करू शकत, तुला पुन्हा मिठीत घेण्यासाठी मी खूप आसुसले आहे, तुझ्या चेहऱ्यावरील हसू पुन्हा पाहण्याची उत्सुकता आहे. तुझ्या हसूनं संपूर्ण घर हसताना मला पाहायचा आहे. मी तुझी वाट पाहत आहे आणि दुसऱ्या बाजूला तू माझी वाट पाहत आहेस"

हे वाचा - सलमानचा 'राधे' सिनेमा जानेवारीत होणार होता रीलिज; या कारणामुळे पुढे ढकलली तारीख

आज मेघनाची ही प्रतीक्षा संपली आहे. ज्युनिअर चिरूच्या रूपात चिरंजीवी परत आला आहे.  चिरंजीवी आणि मेघना यांच्या प्रेमाचं प्रतीक असलेलं त्यांचं बाळ या जगात आलं आहे. त्यामुळे चिरंजीवीच्या जाण्याने दु:खी झालेल्या या कुटुंबात आज पुन्हा आनंद आणि उत्साह पाहायला मिळतो आहे. ध्रुवने बाळाला हातात घेतल्याचे फोटो व्हायरल होत आहेत.

View this post on Instagram

Pic of the day 😍😍❤️ MCforever - Meghanachiru forever ❤️💞@megsraj @chirusarja @dhruva_sarjaa @pannagabharana #chiranjeevisarja #meghanaraj #pogaru #kannada #kannadaactress #sandalwood #rockingstaryash #sudeep #salmankhan #radhikapandit #ayra #puneethrajkumar #rachitaram #biggboss #shrutiprakash #jothejotheyali #chandanshetty #vasuki #shineshetty #sanjithhegde #anushree #saregamapa #official_tiktokstars #tiktok #kannada #kannadaactress #sandalwood #rockingstaryash #sudeep #salmankhan #radhikapandit #ayra #puneethrajkumar #rachitaram #biggboss #shrutiprakash #jothejotheyali #chandanshetty #vasuki #shineshetty #sanjithhegde #anushree #saregamapa #chiranjeevisarja #meghanaraj #pogaru #kannada #kannadaactress #sandalwood #rockingstaryash #sudeep #salmankhan #radhikapandit #ayra #puneethrajkumar #rachitaram #biggboss #kannadabiggboss #yash #ayra #song #dance #shrutiprakash #jothejotheyali #chandanshetty #vasuki #shineshetty #sanjithhegde #anushree #saregamapa #kannada #kannadaactress #sandalwood #rockingstaryash #sudeep #salmankhan #radhikapandit #ayra #biggbosskannadaofficial #puneethrajkumar #rachitaram #biggboss #shrutiprakash #jothejotheyali #chandanshetty #vasuki #shineshetty #sanjithhegde #anushree #saregamapa

A post shared by Meghanachiru_forever (@megsraj_officialfc) on

दरम्यान ध्रुवने या बाळासाठी 10 लाख रुपयांचा पाळणा भेट दिल्याचं समजतं आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. ज्यामध्ये पाळण्यासह ध्रुवदेखील दिसतो आहे.

चिरंजीवीच्या निधनानंतर मेघनाचे डोहाळेजेवण पार पडले. या सोहळ्यासाठी मात्र चिरंजीवी यांचं उणीव भासत होती. ही कमी भरून काढण्यासाठी मेघनानं चिरंजीवी यांच्यासारखा पुतळा तयार करून घेतला आणि त्याच्या साथीनं डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला.

हे वाचा - अभिनेत्री श्वेता तिवारी मुलीसोबत करतेय Enjoy, स्विमिंग पूलमध्ये केलं फोटो शूट

लग्नाआधी 10 वर्ष मेघना आणि चिरंजीवी एकमेकांचे चांगले मित्र होते. नंतर हीच मैत्री पुढे लग्नाच्या नात्यात बदलली. मेघना या सुद्धा अभिनेत्री आहेत. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. चिरंजीवी सरजा यांचं 2018 मध्ये मेघना राजशी लग्न झालं होतं. दोघंही हिंदू आण ख्रिश्चन रिती-रिवाजाप्रमाणे लग्नाच्या बेडीत अडकले होते.

Published by: Priya Lad
First published: October 22, 2020, 3:51 PM IST

ताज्या बातम्या