Home /News /lifestyle /

OMG! शरीरावर तब्बल 6,37,000 मधमाश्या; VIDEO पाहूनच अंगावर येईल काटा

OMG! शरीरावर तब्बल 6,37,000 मधमाश्या; VIDEO पाहूनच अंगावर येईल काटा

एक जरी मधमाशी (Honeybee) आपल्या शरीरावर बसली तर काय होईल याची कल्पनाही आपण करू शकत नाही. मात्र या व्यक्तीच्या शरीरावर तर लाखो मधमाश्या बसल्या आहेत. त्याचं काय झालं असावं.

    बीजिंग, 28 ऑक्टोबर : मधमाशी (honeybee) फक्त नाव जरी घेतलं तरी भीती वाटते.  ज्या व्यक्तीला आधीच मधमाशी चावली असेल, ती व्यक्ती तर त्या वेदना कधीच विसरू शकत नाही. मधमाश्यांचं पोळं हलललं आणि मधमाश्या विखुरल्या की मग तिथं असलेला प्रत्येक जण त्यांच्यापासून वाचण्यासाठी पळ काढतो. मात्र विचार करा एखाद्या व्यक्तीच्या शरीराच्या एखाद्या भागावर नाही तर संपूर्ण शरीरावर मधमाश्या असतील तर... त्या व्यक्तीच्या काय अवस्था झाली असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. मात्र खरंतर एका व्यक्तीला यामुळे काहीही झालं नाही. त्याने सर्वात जास्त मधमाश्या अंगावर घेण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड (guinness world record) केला आहे. चीनमधील एका व्यक्तीची शरीरावर सर्वात जास्त मधमाश्या सर्वाधिक वेळ ठेवण्याच्या विक्रमाची गिनीज बुकमध्ये नोंद झाली आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ 2016 मधील असून सध्या तो व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये चीनमधील Ruan Liangming नावाचा हा व्यक्ती अनेक मधमाश्या अंगावर घेऊन बसलेला दिसून येत आहे. यिचून शहरातील रहिवासी असलेला  Ruan Liangming याने ‘Heaviest mantle of bees या रेकॉर्डची नोंद केली आहे. या रेकॉर्डमध्ये त्याने आपल्या अंगावर 63.7 किलो मधमाश्या बसवल्या होत्या. यामध्ये जवळपास 6,37,000 मधमाश्या होत्या. त्याचबरोबर या सर्व मधमाश्यांमध्ये 60 राणी मधमाश्या देखील होत्या. हा रेकॉर्ड करताना त्यांना कोणतीही जखम झाली नसून अगदी सुरक्षितपणे हा रेकॉर्ड नोंदवला गेला आहे. हे वाचा - OMG! उकळत्या तेलात हात घालून महिला तळतेय पदार्थ; विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO चीनमधील जियांगसी प्रांतातील यिचून शहरातील फेंगसीन कौंटीतील सीजीटीव्ही गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड स्पेसल को-फिल्मिंग सेटवर उघड्या वातावरणात हा विक्रम करण्यात आला होता. गिनीज बुक ऑफ रेकॉर्डच्या सर्टिफिकेशन अधिकाऱ्यांनी सुरक्षित अंतरावरून या विक्रमावर लक्ष ठेवलं होतं. या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसून येतं की, या व्यक्तीच्या अंगावर लाखो मधमाशा बसल्या असून संपूर्ण रेकॉर्ड दरम्यान व्यक्ती शांत आणि संयमी होता. हे वाचा - Guinness Book Record: शरीरभर टॅटू आणि 453वेळा पिअर्सिंग; याचा ‘अवतार’ एकदा बघाच दरम्यान गिनीज बुक ऑफ रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांनी अंगावर बसलेल्या माशांचं वजन नोंदवून नव्या रेकॉर्डची नोंद झाल्याचं सागितलं. त्याने हलकंच आपलं डोकं हलवलं. यामुळे माशा त्याच्या तोंडावरून उडण्यास सुरुवात झाली. या व्हिडिओच्या शेवटी गिनीज बुकचे अधिकारी रुआनला सन्मानचिन्ह देताना दिसत आहेत. मधमाश्या संपूर्ण अंगावर घेऊन रेकॉर्ड करण्याची परंपरा ही 19 व्या शतकापासून सुरू आहे. त्यावर रेकॉर्ड सुधारण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात. यामध्ये काहींना यश येतं तर काहींना अपयश येतं.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: China, World record

    पुढील बातम्या