बीजिंग, 08 जानेवारी : संपूर्ण जग कोरोनाव्हायरस (Coronavirus) महासाथीसाठी चीनला (China) जबाबदार धरत आहे. चीननं मात्र आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. पण चीनमधीलच शास्त्रज्ञ आणि डॉक्टर चिनी सरकारची पोलखोल करत आहे. चीनची कोरोना लस जगातील सर्वात असुरक्षित लस असल्याचं समोर आलं आहे. चीनमधील एका डॉक्टरनंच हा धक्कादायक दावा केला आहे.
चीनमधील डॉक्टर ताओ लिना (Tao Lina) यांनी चीनच्या लशीबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं ही चीनमध्ये तयार झालेली साइनोफार्माची कोरोना लस (Sinopharm COVID-19 vaccine) जगातील सर्वात असुरक्षित लस आहे आणि या लशीमुळे 73 पेक्षाही जास्त साइड इफेक्ट होण्याची शक्यता आले. या लशीचं ट्रायल पूर्ण झालं नाही आणि याचे धक्कादायक दुष्परिणाम आहेत.
डॉ. ताओ यांनी कोरोना लशीबाबत ब्लॉग लिहून शंका व्यक्त केल्या होत्या. हा ब्लॉग चिनी सोशल मीडिया साइट वीबोवर अपलोड केला होता. त्यांचा हा लेखही आता हटवण्यात आला आहे आणि त्याचं कारणही दिलेलं नाही. या पोस्टमध्ये त्यांनी दावा केला होता की. चिनी लशीचं इंजेक्शन घेताच डोकेदुखी, वेदना, हाय ब्लड प्रेशर, डोळ्यांनी नीट न दिसणं, तोडांची चव जाणं, वारंवार लघवी होणं असे 73 दुष्परिणाम होऊ शकतात.
हे वाचा - Corona vaccine घेतल्यानंतरही कोरोना संसर्गाचा धोका आहे का?
दरम्यान चीनी सरकारच्या दबावामुळे डॉ. ताओ यांनी आपलं वक्तव्य मागे घेतलं आहे. डेली मेलच्या रिपोर्टनुसार, ताओ यांनी आरोप केला आहे मीडिया त्यांच्या वाक्यांचा वेगळा अर्थ काढतं आहे. त्यांच्या मते लशीबाबत चिंता आहे पण ती गंभीर नाही. चिनी उपचार खूप सुरक्षित आहेत. असं त्यांनी सांगितलं आणि बेजबाबदारपणे केलेल्या वक्तव्याबाबत त्यांनी माफीही मागितली आहे.
हे वाचा - कोरोना लस घेणारी ही ठरली पहिली बॉलिवूड अभिनेत्री, सोशल मीडियावर शेअर केला अनुभव
नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांना साइनोफॉर्म लशीला सशर्त मंजरी दिली होती. ही लस 79.34टक्के प्रभावी असल्याचा दावा चीननं केला आहे. चिनीन नववर्षाच्या आधी म्हणजे फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत ही लस दिली जाईल. आरोग्य कर्मचाऱ्यांचं सर्वात आधी लसीकरण केलं जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: China, Corona, Corona vaccine, Coronavirus